प्रस्ताविका/ सरनामा/ उद्देशपत्रिका


              (PREAMBLE)

- सरनामा म्हणजे, "राज्यघटनेची प्रारंभिक माहिती".

- संविधान ज्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे ते तत्वज्ञान सरनाम्यात समाविष्ट आहे.

- जगात सर्वप्रथम "अमेरिका" राष्ट्राच्या घटनेत सरनामा लिहिला गेला.

- भारताने  आपल्या घटनेत सरनामा असावा ही बाब "अमेरिकेकडून" स्वीकारली.

- 1919 चा भारत सरकार कायदा (माँटफर्ड) याला सरनामा होता. मात्र 1935 च्या कायद्याला सरनामा नव्हता.

- पं जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव घटनासमिती समोरचा दिशादर्शक होता.

- हा ठराव घटनासमितीने 22 जानेवारी 1947 ला बिनविरोधपणे संमत केला.

- हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे सरनामा नाही. मात्र सरनामा हा या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे.

- 22 जानेवारी ला उद्दिष्टांचा ठराव जरी संमत झाला असेल. तरी मूळ सरनामा हा  घटना संमत झाल्यावर संमत  करण्यात आला.

- भारतीय सरनाम्याची सुरुवात "आम्ही भारताचे लोक" तर अमेरिकेच्या सरनाम्याची सुरुवात ही आम्ही अमेरिकेचे लोक अशी आहे.

:
1) उद्दिष्टांचा ठराव मांडला ?
    - पं. नेहरू

2) उद्दिष्टांचा ठराव मांडला तो दिनांक ?
    - 13 डिसेंबर 1946

3) उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला?
    - 22 जानेवारी 1947

4) सरनामा असावा हा आदर्श कोणाचा किंवा सरनामा असलेली जगातील पहिले संविधान?
  - अमेरिका

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...