Saturday 7 September 2019

वाहतुकीचे नवे नियम त्वरित लागू न करण्याचा पंजाब सरकारचा निर्णय

रस्त्यावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरामध्ये 1 सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू केला आहे. नव्या वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना अधिक दंड भरावा लागत आहे.

त्यामुळे 5 सप्टेंबर 2019 रोजी पंजाब राज्याने नवीन मोटार वाहन नियम त्वरित लागू न करण्याचा निर्णय घेतला. पंजाबसहित इतरही काही राज्यांनी असा निर्णय घेतला आहे, ज्यात राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. दिल्लीने देखील अद्याप नवे नियम अधिसूचित केले नाहीत.

नवे नियम
नव्या मोटार वाहतूक कायद्यातल्या 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे 500 रु.पये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे 25 हजार रु.पये दंड आहे तसेच अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

🔸रस्ते नियमांचा भंग – जुना दंड: 100 रु., नवीन दंड 500 रु.

🔸प्रशासनाचा आदेशभंग - जुना दंड 500 रु., नवीन दंड 2000 रु.

🔸परवाना नसलेले वाहन चालवणे – जुना दंड: 500 रु., नवीन दंड: 5000 रु.

🔸पात्र नसताना वाहन चालवणे - जुना दंड: 500 रु., नवीन दंड: 10000 रु.

🔸वेगमर्यादा तोडणे – जुना दंड: 400 रु., नवीन दंड: 2000 रु.

🔸धोकादायक वाहन चालवणे - जुना दंड: 1000 रु., नवीन दंड: 5000 रु.

🔸दारू पिऊन वाहन चालवणे – जुना दंड: 2000 रु., नवीन दंड: 10000 रु.

🔸वेगाने वाहन चालवणे - जुना दंड: 500 रु., नवीन दंड: 5000 रु.

🔸विनापरवाना वाहन चालवणे – जुना दंड: 5000 रु., नवीन दंड: 10000 रु.

🔸सीटबेल्ट नसणे – जुना दंड: 100 रु., नवीन दंड: 1000 रु.

🔸दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – जुना दंड: 100 रु., नवीन दंड: 2000 रु.

🔸अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – नवीन दंड: 10000 रु.

🔸विमा नसताना वाहन चालवणे – जुना दंड: 1000 रु., नवीन दंड: 2000 रु.

🔸अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा — 25000 रु. दंड व मालक/पालक दोषी: 3 वर्षे तुरुंगवास

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...