Wednesday 16 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालील गाळलेल्या जागी (वाक्यात) योग्य वाक्यप्रकार लिहा.
     ‘लहान मुलांच्या भांडणात मोठया माणसांनी विनाकारण ................... कटाक्षाने टाळावे.’

   1) वडयाचे तेल वांग्यावर काढणे      2) वर्दळीवर येणे
   3) येळकोट करणे        4) रागाच्या आहारी जाणे

उत्तर :- 2

2) ‘भीतीपोटी प्रत्येक गोष्टीस नकार घंटा वाजविणार घाबरट मनुष्य’ – या वाक्यबंधासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा.

   1) शुक्राचार्य    2) शिराळशेट    3) रडतराऊत    4) पाताळयंत्री

उत्तर :- 3

3) पुढील पर्यायातून अचूक शब्द ओळखा.

   1) चतुष्पाद    2) चतु:ष्पाद    3) चतु:पाद    4) चतुश्पाद

उत्तर :- 1

4) अनुनासिकाला काय म्हणतात ?

   1) अनुस्वार    2) शब्द      3) व्यंजन    4) विशेषण

उत्तर :- 1

5) ‘मन्वंतर’ या जोड शब्दाची संधी करा.
   1) मन + अंतर    2) मन्व + अंतर    3) मनु + अंतर    4) मन व अंतर

उत्तर :- 3

6) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
    ‘वानर’ वडावर चढले.

   1) भाववाचक    2) विशेषनाम    3) सामान्यनाम    4) धातुसाधित नाम

उत्तर :- 3

7) ‘काही लक्षात येत नाही’ अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा.

   1) आत्मवाचक    2) अनिश्चयवाचक    3) प्रश्नार्थक    4) संबंधी

उत्तर :- 2

8) जे शब्द क्रियापदाची व नामाची विशेष माहिती सांगतात त्यांना ................ म्हणतात.

   1) शब्दयोगी अव्यये  2) उभयान्वयी अव्यये  3) विशेषणे    4) शब्दसिध्दी

उत्तर :- 3

9) ‘सांजावले’, ‘मळमळते’, ‘उजाडले’ हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

   1) संयुक्त क्रियापदे  2) भावकर्तृक क्रियापदे  3) धातुसाधित क्रियापदे  4) सकर्मक क्रियापदे

उत्तर :- 2

10) अचूक वाक्य ओळखा.

   1) सर्वच क्रियाविशेषणे अव्यय असतात.
   2) काही क्रियाविशेषणे विकारीही असतात.
   3) क्रियाविशेषणे ही एकाक्षरी नसतात.
   4) क्रियाविशेषणे ही क्रियेच्या कर्त्याविषयी माहिती देतात.

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

सरनाम्यासंबंधित खटले

☀️प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता. ☀️याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे खटले :- ⭐️1) बेरूबारी युनियन खटला (1960):...