Tuesday 22 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) माणसाने स्वार्थ व ............... चा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) आप्पलपोटी      2) प्रपंच     
   3) परमार्थ      4) पोटार्थ

उत्तर :- 3

2) समानार्थी म्हण शोधा. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’

   1) खाऊ जाणे तो पचवू जाणे    2) जशी कुडी तशी पुडी
   3) यापैकी नाही        4) अंथरुण पाहून पाय पसरावे

उत्तर :- 3

3) ‘धिंडवडे निघणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?

   1) फजिती होणे      2) मिरवणूक निघणे 
   3) वडे तळणे      4) बोबडी वळणे

उत्तर :- 1

4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ चा शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा.

   1) तितिक्षा      2) गरीब     
   3) दयाळू      4) मायाळू

उत्तर :- 1

5) शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

   1) महात्म्य      2) माहात्म्य   
   3) माहात्म      4) महात्म

उत्तर :- 2

6) शब्दाचा अर्थ व्यक्त करण्याच्या ................... शक्ती असतात. या वाक्यातील गाळलेला शब्द निवडा.

   1)  तीन    2) अनेक     
   3) दोन      4) चार

उत्तर :- 1

7) ‘पंकज’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

   1) चिखलात पडलेला    2) चिखलाने माखलेला 
   3) चिखलात जन्मलेला    4) चिखलाशी संबंध नसलेला

उत्तर :- 3

8) दिलेल्या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द निवडा. – ‘तडाग’

   1) निर्झर    2) जलाशय   
   3) तळे      4) सरोवर

उत्तर :- 1

9) खालीलपैकी कोणत्या विधानात ‘नावडतीचे मीठ अळणी’ या म्हणीचा अर्थ सापडतो ?

   1) नावडती माणसे शुध्द मनाची असतात    2) क्षुल्लक कारणांवरून दुस-यास दोष देणे
   3) अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही    4) मीठ कमी खाणारे अप्रिय ठरतात

उत्तर :- 3

10) ‘विचार न करता एखाद्याच्या मागून जाणे, परंपराशरणता’
     हा अर्थ सुचविण्यासाठी योग्य वाक्प्रचार वापरा.

   1) गतीवर येणे      2) गतानुगतिक   
   3) गण्यावरावण्याचे प्रसंग    4) गणचौथ पुजणे

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...