Monday 7 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा.
     शहाण्याला .................. मार.

   1) काठीचा    2) हंटरचा   
   3) चाबकाचा    4) शब्दांचा

उत्तर :- 4

2) ‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

   1) दोडक्यावानी फुगणे    2) दोन बोटे स्वर्ग उरणे
   3) दोन हात करणे    4) दगडाखालून हात काढून घेणे

उत्तर :- 2

3) अनेक गोष्टीत एकाचवेळी लक्ष देणा-यास ....................... म्हणतात.

   1) कामसू    2) अष्टावधानी   
   3) कार्यरत    4) चौकस

उत्तर :- 2

4) खालील पर्यायी उत्तरातील शुध्द पर्यायी शब्द सांगा.

   1) अग्नीहोत्री    2) अग्निहोत्री   
   3) आग्नीहोत्री    4) आग्निहोत्री

उत्तर :- 2

5) संयुक्त स्वर म्हणजे –

   1) सर्व स्वर एकत्र करणे        2) सर्वांनी मिळून आवाज काढणे
   3) दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले    4) –हस्व उच्चार असलेले

उत्तर :- 3

6) पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – ‘आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले.’

   1) कर्तरी प्रयोग    2) कर्मणी प्रयोग   
   3) भावे प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 3

7) खाली दिलेल्या सामासिक शब्दातील ‘मध्यमपदलोपी समास’ ओळखा.

   1) साखरभात    2) पीतांबर   
   3) खरेखोटे    4) गल्लोगल्ली

उत्तर :- 1

8) स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.

   1) अवतरण    2) संयोग     
   3) अपसरण    4) स्वल्पविराम

उत्तर :- 3

9) ‘धोंडा’ शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

   1) तत्सम    2) देशी     
   3) परभाषेतील    4) यापैकी कोणत्याच नाही

उत्तर :- 2

10) ‘सूर्य अस्तास गेला’ याचा व्यंग्यार्थ कोणता ?

   अ) सध्या स्नानाची वेळ झाली        ब) अभ्यासाची वेळ झाली
   क) चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली    ड) गुरे घरी घेण्याची वेळ झाली

   1) सर्व चूक          2) सर्व बरोबर
   3) फक्त अ, ब बरोबर आणि बाकी दोन्ही चूक    4) फक्त अ, ब चूक आणि बाकी दोन्ही बरोबर

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...