Tuesday 14 January 2020

प्रश्नसंच विषय = इतिहास प्रश्नसंच

1) शिवाजी क्लब (कोल्हापूर) बाबत चुकीचे विधान कोणते?
१) या क्लबची सभासद संख्या ३०० पर्यंत होती.
२) लोकमान्य टिळक व त्यांचा 'केसरी'चा शिवाजी क्लबच्या राष्ट्रवादी चळवळीला पाठिंबा होता.
३) बाबची निर्मिती कशी करावी याची माहिती देणारी भित्तिपत्रके कोल्हापूर शहरात ६ ठिकाणी २५ जुलै १९०८ रोजी शिवाजी क्लबने लावली होती.
४) राजर्षी शाहूंचा शिवाजी क्लबला पाठींबा होता.

१) २,       २) ४,     ३) १,      ४) ४

2) नेता कोण ते ओळखा.
१) अंजुमन-इ-इस्लाम' या संस्थेचे सचिव व पुढे अध्यक्षही होते.
२) उच्च न्यायालयात ते वकील होते.
३) मुस्लीम जमातीतील पडदा पद्धतीस त्यांनी विरोध केला होता. स्वत:च्या मुलीस उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले होते.
४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते समर्थक होते. एवढेच नव्हे तर एका अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

१) बदरुद्दीन तय्यबजी,         २) रहिमतुल्ला सयानी,
३) हबीब अजमल खाँ,         ४) दिनशा वाच्छा

3) सर जॉन माल्कमच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे?

१) १८२७-३० या काळात मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता.
२) जुने जर चांगले असेल तर तो मोडू नये व नवे करण्याची घिसडघाई करू नये हे त्याच्या धोरणाचे सूत्र होते.
3) Political History of India Memoirs of Central India हे दोन ग्रंथ त्याने लिहिले.
४) उद्यानविद्येकडे त्याने लक्ष पुरवले.
५) स्थितिवाद व साम्राज्यवाद या दोन तत्त्वावर त्याचा विश्वास होता.

१)१,३,५,       २) १,२,३,       ३) १,२,३,४,५,      ४)१,२

4) केशवराव जेधे यांच्यासंदर्भात कोणते विधान बरोबर आहे?

१) पुणे नगरपालिकेचे सभासद या नात्याने म. फुले यांचा पुतळा पुणे नगरपालिकेने बसवावा असा ठराव त्यांनी मांडला होता.
२) शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.
३) केशवराव जेधे महाराष्ट्र प्रातिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यावर (१९३७) काँग्रेसच्या सदस्य संख्येत ४ पर वाढ झाली होती.
४) पुणे व बारामती मतदारसंघातून लोकसभेवर ते निवडून गेले होते.
१) १ व ३,     २) १,२,३,४,        ३) १,३,४,      ४) १

5) बेळगाव येथे साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली तिचे सदस्य कोण नव्हते?
१) केशवराव जेधे          २) द. वा. पोतदार      ३) श्री. शं. नवरे,
४) ग. त्र्यं. माडखोलकर    ५) शंकरराव देव     ६) शंकरराव मोरे

उत्तर - 1- ४, 2- १, 3-३, 4 -२, 5-६
==========================

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...