०९ ऑक्टोबर २०२०

भूकंप


◾️‘भू’ म्‍हणजे जमीन व ‘कंप’ म्‍हणजे थरथर. भूकंप म्‍हणजे जमिनीचे थरथरणे. 


◾️भकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरांत प्रचंड ताण निर्माण होत असतो. 


◾️हा ताण विशिष्‍ट मर्यादेपलीकडे गेल्‍यावर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो. 


◾️ज‍या ठिकाणी तो मोकळा होतो, तेथे ऊर्जेचे उत्‍सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. त्‍यामुळे भूकवच कंप पावते, म्‍हणजेच भूकंप होतो.  


◾️  भकवचात ज्‍या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो, त्‍या ठिकाणाला ‘भूकंपाचे केंद्र’ किंवा ‘भूकंपनाभी’ असे म्‍हणतात. 


◾️या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात. 


◾️भकंपकेंद्रापासून ऊर्जालहरी ज्‍या ठिकाणी सर्वप्रथम पोहचतात त्‍या ठिकाणी भूकंपाचा धक्‍का सर्वप्रथम बसतो. 


◾️भपृष्‍ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्‍हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास (नाभीस) लंबरूप असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...