Friday 9 October 2020

वाचा :- UAE चे Moon Mission



अलीकडेच संयुक्त अरब अमिरातीने (UAE) 2024 मध्ये मानवरहित अवकाशयान चंद्रावर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.


ठळक बाबी


रोव्हरचे नाव : रशीद , युएईचा मूळ संस्थापक असलेल्या यांच्या नावावरून शेख रशीद बिन सईद अल मकतूम ठेवले जाईल.


उद्दीष्ट: हा रोव्हर अशा चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेईल ज्या भागाचा  शोध मानवी मोहिमांनी यापूर्वी घेतला नाही.


चंद्रावर रोव्हर उतरवण्यास संयुक्त अरब अमिरातीला यश आल्यास अशी कामगिरी करणारा चौथा देश ठरणार आहे. अमेरिका, सोव्हिएत युनियन रशिया आणि चीन या देशांनाच अशी कामगिरी करता आली आहे


विशेष म्हणजे ,चंद्रावर अंतराळयान उतरवण्याचा प्रयत्न भारताने केला पण तो यशस्वी झाला नाही. भारताप्रमाणेच इस्त्राईल आणि जपाननेही प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.


चंद्रयान -3 नावाच्या मिशनची योजना भारताने आखली आहे. ती 2021 च्या सुरूवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.


नासाचा आर्टेमिस प्रोग्राम


आर्टेमिस प्रोग्रामद्वारे, नासाला 2024 पर्यंत माणसाला  (एक स्त्री आणि एक पुरुष) चंद्रावर पाठवायचे आहे. या मिशनचे लक्ष्य चंद्रच्या दक्षिण ध्रुवासह चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीरांना उतरवायचे आहे(लँडिंग करण्याचे आहे).


UAE चे अंतराळ अभियान


 जुलै २०२० मध्ये युएईने जपानमधून ‘अमल (होप)’ नावाचे यान मंगळावर  पाठवले 


यामुळे मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...