Saturday 26 November 2022

गणित मैत्री प्रश्नमंजुषा

🎈परश्न १ ला : -  ७८ या त्रिकोणी संख्येचा पाया किती ?

(१) १३

(२) १२✅

(३) ०६

(४) २६


🔸🔹🔹🔸


🎈परश्न २ रा : -  दोन संख्यांचा गुणाकार ४३३५ असून , त्यांचा ल. सा. वि.२५५ आहे.तर त्या संख्यांचा म. सा. वि. किती ?

(१) ३४

(२) १३

(३) १९

(४) १७✅


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ३ रा : -  दोन संख्यांचा म. सा. वि. २५ व ल. सा. वि. ३५० आहे , तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

(१) ४५

(२) १७५

(३) ३५

(४) ५०✅


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ४ था : -  तीन अंकी लहानात लहान अशी संख्या कोणती , की जिला ५ , १२ व १५ या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी ४ उरतात ?

(१) १२०

(२) १२४✅

(३) २४०

(४) १८०


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ५ वा  : -  एका संख्येतुन ८ वजा करून ८ ने भागल्यास उत्तर २ येते , तर त्या संख्येतुन ४ वजा करून ५ ने भागल्यास उत्तर काय येईल ?

(१) २

(२) ३

(३) ४✅

(४) ६



🎈परश्न ६ वा  : -  गुरुनाथने १२००० रु.भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला . ४ महिन्यानंतर दिनानाथने काही रक्कम गुंतवून भागिदारी स्विकारली . वर्षाअखेर त्या धंद्यात झालेल्या २२०० रु. नफ्यापैकी दिनानाथला १००० रु. मिळाले ; तर दिनानाथने किती रक्कम गुंतवली होती ?

(१) १२००० रु.

(२) १८००० रु.

(३) १५००० रु.✅

(४) १०००० रु.


🔸🔹🔹🔸


🎈परश्न ७ वा  : - एका परीक्षेत ३०% विद्यार्थी गणितात नापास झाले . २०% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व १०% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले , तर दोन विषयाच्या या घेतलेल्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?


(१) ४०%

 २) ३०%

(३) ७०%

(४) ६०%✅


🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈


 🎈परश्न ८ वा : -  एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी ४९५ रुपयांस विकले . तेव्हा त्याला एकात खरेदीच्या १०% नफा व दुसर्‍यात १०% तोटा झाला . तर त्या व्यवहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला ?

 (१) ना नफा ना तोटा

(२) १% नफा

(३) १% तोटा✅

(४) ०.१% तोटा


🔸🔹🔹🔸


🎈परश्न ९ वा  : -   १ मार्च १९९७ रोजी शनिवार होता . तर १ जुलै १९९७ रोजी कोणता वार असेल ?

(१)  बुधवार

(२) गुरुवार

(३) मंगळवार✅

(४) सोमवार


🔸🔹🔹🔸


🎈परश्न १० वा  : - एका चौरसाची बाजु ८ सेमी आहे व दुसर्‍या चौरसाचा कर्ण ८ सेमी आहे , तर दोन चौरसांच्या क्षेत्रफळांमध्ये किती चौ.सेमी चा फरक  असेल ?

(१) १६

(२) ३२✅

(३) ०८

(४) २४

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...