Saturday 26 November 2022

गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा

 ♦️परश्न १ ला : - वृषभ पंत ने १० सामन्यात काही सरासरी धावा काढल्या आणि ११ व्या सामन्यात १०८ धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या ६ ने वाढली तर त्याची आता सरासरी धावसंख्या किती असेल ?

१ ) ६०

२ ) ५२

३ ) ५५

४ ) ४८✅


♦️परश्न २ रा : - A आणि B चे मासिक वेतन १४००० रुपये , B आणि C चे १५६०० रुपये व A आणि C चे १४४०० रुपये आहे तर B चे मासिक वेतन किती ?

१ ) १२४००

२ ) १२८००

३ ) १५२००✅

४ ) १६०००


♦️परश्न ३ रा : - एक रेल्वे ताशी १०० किमी वेगाने जाते परंतु प्रत्येक ७५ किमी नंतर ३ मिनिटे थांबते तर रेल्वेला ६०० किमी अंतर पूर्ण करायला किती वेळ लागेल ?


१ ) ६ तास २१ मिनिटे✅

२ ) ६ तास २४ मिनिटे

३ ) ६ तास २७ मिनिटे

४ ) ६ तास ३० मिनिटे


♦️परश्न ४ था : - अहमदाबाद ते मुंबई हे अंतर ६५० किमी असेल व दोन रेल्वे एकाच वेळी अहमदाबाद व मुंबई वरून एकमेकीकडे निघाल्या तर त्या १० तासात भेटतात परंतु जर दुसरी गाडी ४ तास २० मिनिटे उशिरा सुटली तर त्या एकमेकींना दुसऱ्या गाडीच्या वेळेच्या नंतर ८ तासात एकमेकींना भेटतात तर त्या दोन रेल्वेगाड्यातील वेगातील फरक किती चा असेल ?

१ ) ८ किमी/तास

२ ) १२ किमी/तास

३ ) ५ किमी/तास✅

४ ) निश्चित सांगता येत नाही

 


♦️परश्न ५ वा : -  ८६ : २९ : : ९८ : ?

१ ) ३०

२ ) ३२✅

३ ) ३४

४ ) ३६

 

♦️परश्न ६ वा : - A हा B पेक्षा दुप्पट वेगाने काम करत असेल आणि जर A ते काम B पेक्षा २० दिवस लवकर संपवत असेल तर दोघे मिळून तसे तीन काम किती दिवसात संपवतील ?

१ ) ४० दिवसात✅

२ ) ४५ दिवसात

३ ) ४२ दिवसात

४ ) ४८ दिवसात

 

 ♦️परश्न ७ वा : - एका टाकीला ३ नळ आहेत त्यातील २ नळ टाकी अनुक्रमे ३ तास आणि ३ तास ४५ मिनिटात भरतात तर तिसरा नळ टाकी १ तासात रिकामी करतो जर ते नळ अनुक्रमे दुपारी १ वाजता , २ वाजता , तिसरा नळ ३ वाजता सुरू केले तर टाकी किती वाजता रिकामी होईल ?

१ ) ४ : २०

२ ) ४ : ४५

३ ) ५ : २०✅

४ ) ५ : ४५


♦️परश्न ८ वा : - एक नळ रिकामी टाकी २० मिनिटात भरतो तर दुसरा नळ टाकी ५ लिटर प्रति सेकंद दराने रिकामी करतो जर दोन्ही नळ एकत्र रिकाम्या टाकीत सुरू केले तर टाकी १०० मिनिटात रिकामी होते तर टाकीची क्षमता किती लिटर ची असेल ?

१ ) ७५०० लिटर✅

२ ) ६५०० लिटर

३ ) १५०० लिटर

४ ) ६००० लिटर


♦️परश्न ९ वा : - जर एक बस आपल्या सामान्य वेगापेक्षा २/३ पट वेगाने गेली तर ३ तास उशिरा पोहचते जर ती बस सामान्य वेगात गेली असती तर किती तासात निर्धारित ठिकाणी पोहचली असती ?

१ ) ८ तासात

२ ) १० तासात

३ ) १२ तासात

४ ) ६ तासात✅


♦️परश्न १० वा : - सागर एका गावाला चालत जाऊन परत येताना घोड्यावर आला तर त्याला एकूण ५ तास ४५ मिनिटे लागली जर तो दोन्ही वेळेस जाणे आणि येणे घोड्याचा वापर केला असता तर त्याचा २ तास वेळ वाचला असता जर त्याने दोन्ही वेळेस चालतच प्रवास केला असता तर किती वेळ लागला असता ?

१ ) ३.७५ तास

२ ) ३.५ तास

३ ) ७.७५ तास✅

४ ) ११.७५ तास

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...