17 August 2019

महागाई घटणे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायकच

ग्राहक किमतीवर आधारित चलनवाढीचा दर (महागाई) जूनच्या ३.१८ टक्क्यांवरून जुलैमध्ये ३.१५ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या चार टक्क्यांच्या महागाई दरापेक्षा हा बराच कमी आहे. साधारणत: एका दशकापूर्वी महागाईचा दर दोन आकड्यांमध्ये होता. मात्र, आता तो जवळपास तीन टक्क्यांच्या आसपास आला आहे. महागाईचा दर कमी होणे अर्थात महागाई घटणे सर्वसामान्य ग्राहकांसाठी जमेची बाजू आहे. कारण, त्यामुळे दैनंदिन जीवनातील गोष्टींसाठी खर्च कमी करावा लागतो. मात्र, अर्थव्यवस्थेचा विचार करता महागाईच्या दरात घट होणे चांगले नाही.

कमी महागाई = कमी उत्पन्न

महागाईचा दर घटल्यास खाद्यपदार्थांच्या किमतीही कमी होतात. किरकोळ महागाई दरामध्ये खाद्यपदार्थांची ५५ टक्के हिस्सेदारी आहे. ही ग्राहकांसाठी खूशखबर आहे. मात्र, ग्रामीण भागावर त्याचे वाईट परिणाम होताना दिसून येतात. यामुळेच शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते. महागाईचा दर कमी झाल्यास सामान्यत: संबंधितांच्या वेतनवाढीलाही मर्यादा पडतात.

कमी उत्पन्न = खर्चांमध्ये मोठी कपात

व्यक्तीच्या उत्पन्नवाढीवर मर्यादा आल्या किंवा ते सुस्त झाल्यास व्याजदरांमध्ये घट होते, व्यक्ती निवृत्तीसाठी अधिक बचत करण्यासाठी तयार होतात आणि गरजेच्या खर्चातही कपात करण्याची वेळ ओढवते. शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या उत्पादनाचीही कमी किंमत मिळते. मात्र, त्यांचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी नागवला जातो. त्यामुळे कर्जे

फेडणे अवघड होऊन बसते. त्यामुळे शेतकरी किंवा ग्रामीण भागातील व्यक्तींना आपोआपच खर्चांमध्ये कपात करण्याची वेळ येते.

अवघड परिस्थिती = कमी मागणी

ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मागणी कमी असल्याने वस्तू आणि सेवांवरही त्याचा प्रभाव पडतो. मागणी कमी असल्याने कंपन्या वस्तूंच्या किमतीत वाढ करू शकत नाहीत. याचाच अर्थ असा की कंपन्या अधिक मजूरी देऊ शकत नाहीत. त्यामुळे उत्पन्नातही घट होते. सध्या देशातील वाहन उद्योगात हेच होत आहे. मागणी कमी असल्याने केवळ ग्राहकांची क्रयशक्तीच कमी न होता गुंतवणूक आणि रोजगारांच्या संधींवरही त्याचा विपरित परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्र यांनी गेल्याच महिन्यात एक ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, 'बऱ्याचदा महागाई कमी असणे चांगले असते. मात्र, सातत्याने रक्तदाब घटणे तब्येतीच्या दृष्टीने फारशी चांगली बाब नसते. बऱ्याचदा महागाई वाढत असेल, तर गुंतवणुकीचे संकेत मिळतात. कमी व्याज दर आणि मागणीत वाढ करण्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.' याचाच अर्थ असा की महागाईचा दर योग्य असणे आवश्यक आहे... जो ग्राहकांना अडचणीत आणणार नाही आणि अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा असावा.

GST संकलनात हे राज्य ठरले अव्वल


▪️2019-20 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक जीएसटी संकलन झाले आहे.

▪️आर्थिक वर्षाच्या चार महिन्यात जीएसटी संकलन 9 टक्क्यांनी वाढला असून तो साडे तीन लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल आहे.

▪️ वस्तू आणि सेवा कर संकलनात राजधानी दिल्ली आणि पश्चिम बंगाल ही दोन राज्ये मागे पडली आहेत.

▪️ज्याठिकाणी वस्तू आणि सेवांचा उपभोग वाढेल त्या राज्यात कर संकलन जास्त होईल, असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे.

💰 GST संकलन
▪ ओडिसा : 20.8
▪ उत्तराखंड : 19.7
▪ बिहार : 17.8
▪ मध्य प्रदेश : 14.6
▪ आसाम : 14.1
▪ उत्तर प्रदेश : 12
▪ पश्चिम बंगाल : 6.4

❇️ केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटवल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तान निषेध व्यक्त करत भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.


▪️ त्यानंतर भारताने देखील पाकिस्तानला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

▪️अशातच आता भारताने जोधपूरपासून मुनाबावमध्ये चालणारी साप्ताहिक थार लिंक एक्सप्रेस रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️ याआधी भारताने दिल्लीहून लाहोरला जाणारी 'सदा-ए-सरहद' बस सेवा देखील बंद केली होती.

भारत-पाकिस्तान या दोन देशात ही एक्स्प्रेस सुरू होती. 18 फेब्रुवारी 2006 पासून ही गाडी सरू होती. जोधपूरच्या भगतच्या कोठीहून कराची दरम्यान ही रेल्वे सुरू होती.

❇️ तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना करणार बडतर्फ

▪️लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाऱ्या अ,ब,क,ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५ नंतर तिसरा अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे.

▪️सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कडक पाऊल उचलले आहे.

▪️या नियमाची पहिली विकेट गेली आहे.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासकीय नोकरीवर लागतांना द्यावे लागते.

▪️नोकरीत लागतांना शपथपत्रात दोनच अपत्य असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते.

▪️ जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे.

🔸भारतीय क्रिकेट संघाचे आजवरचे प्रशिक्षक🔸

🌺🌺कुस्तीपटू बजरंग पुनियाला 'खेलरत्न पुरस्कार'?🌺🌺

🔰भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. कुस्तीत लागोपाठ चांगले प्रदर्शन करणाऱ्या बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार मिळावा यासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

🔰बजरंग पुनियासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या नावाची शिफारस सुद्धा करण्यात आली आहे. पुनियाने नुकतीच तबिलिसी ग्रां. प्री मध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. यावेळी त्याने इराणच्या पेइमान बिबयानीचा पराभव करून ६५ किलो गटात सुवर्ण पदक पटकावले होते. भारतातील अव्वल कुस्तीपटू बजरंगने चीनमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून आशियात आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले होते. बजरंगने गेल्यावर्षी आशियाई खेळात तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुद्धा सुवर्ण पदक पटकावले होते. १२ सदस्यीय निवड समितीने पुनियाच्या नावाला पसंती दर्शवली आहे. या समितीतीत सर्व सदस्यांनी एकमताने पुनियाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीत बायचूंग भूतिया, मेरी कोम यासारखी क्रीडा क्षेत्रातील नावे आहेत.

🔰१२ सदस्यीय निवड समिती खेलरत्न पुरस्कारासाठी आणखी एका आघाडीच्या क्रीडापटूचे नाव सूचवू शकते. दरम्यान, गेल्यावर्षी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू या दोघांना हा पुरस्कार मिळाला होता.

मदनलाल धिंग्रा


जन्म : १८ सप्टेंबर १८८३

(अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत)

फाशी : १७ ऑगस्ट १९०९

(पेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन, इंग्लंड)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत,
                होमरूल लीग
धर्म : हिंदू
प्रभाव : विनायक दामोदर सावरकर

                  मदनलाल धिंग्रा  हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २०व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.

🕺 सुरुवातीचे जीवन
            त्यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.

👬 सावरकरांशी संबंध
           मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.

🔫 कर्झन वायलीचा खून
                   ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता. या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.

🕯 शेवटचे वक्तव्य
           फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात धिंग्रानी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे.ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वत:चे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे.याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."

💎 नाटक
            मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पाहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे.

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन 🙏
                

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

▪️ महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य
▪️ तामिळनाडू - भरतनाट्यम
▪️ केरळ - कथकली
▪️आंध्रप्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
▪️ पंजाब - भांगडा, गिद्धा
▪️ गुजरात - गरबा, रास
▪️ ओरिसा - ओडिसी
▪️ जम्मू आणि काश्मीर - रौफ
▪️ आसाम - बिहू, जुमर नाच
▪️ उत्तराखंड - गर्वाली
▪️ मध्यप्रदेश - कर्मा, चार्कुला
▪️ मेघालय - लाहो
▪️ कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
▪️ मिझोरम - खान्तुंम
▪️ गोवा - मंडो
▪️ मणिपूर - मणिपुरी
▪️ अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
▪️ झारखंड - कर्मा
▪️ छत्तीसगढ - पंथी
▪️ राजस्थान - घूमर
▪️ पश्चिम बंगाल - गंभीरा
▪️ उत्तर प्रदेश - कथक

बीपिन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. तीन महिन्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये ही समिती सरकारला आपला अहवाल सोपवेल. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत देशाचे २६ वे लष्करप्रमुख आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये ते निवृत्त होतील. तेच देशाचे पहिले सीडीएस असू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. सीडीएस तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना वरिष्ठ असतील कि तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांच्या समान त्यांचा दर्जा असेल ते अजून स्पष्ट झालेले नाही. सीडीएसचा कार्यकाळ किती असेल ते सुद्धा अजून स्पष्ट नाही असे हिंदुस्थान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

संरक्षण तज्ञांनी आतापर्यंत अनेकवेळा सीडीएस नियुक्तीची मागणी केली होती. १९९९ साली पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची शिफारस करण्यात आली होती. सीडीएस पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करेल. तिन्ही सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या उद्देशाने या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

♦️भारतातील पहिला बेट जिल्हा : माजुली बेट आसाम

● आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 400 km2 क्षेत्रफळ असणाऱ्या माजुली बेटाला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला 29 जून 2016 ला मान्यता देण्यात आली.

● पूर्वी माजुली बेट हे आसाम मधील जोरहाट जिल्ह्याचा उपविभाग होता.

● एखाद्या बेटाला जिल्ह्याचा दर्जा देण्याची हि भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

● हा आसाम मधील 34 वा जिल्हा असेल.

● हे बेट ब्रम्हपुत्रा नदीच्या मध्यात तयार झालेले डेल्टा क्षेत्र आहे.

● हे नदीच्या मध्यात तयार झालेले जगातील सर्वात मोठे डेल्टा क्षेत्र आहे.

● या बेटाच्या उत्तरेला सुबानसिरी नदी,दक्षिणेला मुख्य ब्रम्हपुत्रा नदी व ईशान्येला ब्रम्हपुत्राची वितरिका खेरकाटीय सुली.

● या बेटावर मिशिंग जमातीची संख्या जास्त आहे.

● समाजसुधारक संत श्रीमंता शंकरदेवा यांनी 15 व्या शतकात सुरू केलेल्या आसामी नववैष्णव संस्कृतीचे मुख्य क्षेत्र

● माजुली बेट जैवविविधतेने संपन्न आहे.

● जमिनीच्या धूप होण्याचे प्रमाण बेटावर जास्त आहे.1891 मध्ये याचे क्षेत्रफळ 1250 km2 होते आता ते 400 km2 च्या आसपास आहे.
_______________

♦️आझाद हिंद फौज ♦️

★ निशान- तिरंगी ध्वज 

★ अभिवादनाचे शब्द- जय हिंद

★ घोषवाक्य- चलो दिल्ली

★ समर गीत- कदम कदम बढाये जा

★ भारतीयांना आव्हान - तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा .

★ 1943 च्या अखेरीस अंदमान व निकोबार बेटे जिंकून नेताजींनी त्यांचे अनुक्रमे "शहीद" व "स्वराज्य" असे नामकरण केले.

यावर्षी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली आहे.

🌹🌳🌴चालु घडामोडी🌴🌳🌹

👉माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीत ‘वतन’ या देशभक्तीपर गाण्याचे प्रकाशन केले.

👉डिजिटल व्यवहाराची छत्री संस्था एनपीसीआयने म्हटले आहे की आधार सक्षम पेमेंट सिस्टमने यंदा जुलै महिन्यात 200 दशलक्ष व्यवहारांची मैलाचा टप्पा ओलांडला आहे.

👉भारतीय रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अज्ञात वाहनांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन “नंबर प्लेट” ही विशेष मोहीम सुरू केली. डीजी / आरपीएफ, श्री.अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली.

👉केंद्र सरकारने एक मोबाइल ॲप लाँच केले ज्याद्वारे शहरी नगरपालिका संस्था लोकांना घरातील कचरा उचलण्यास सक्षम करतील. स्वच्छ नगर ॲपद्वारे या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना नागरी संस्थांना पैसे द्यावे लागतील.

👉फ्रान्स सरकारने भारतीय शेफ प्रियांम चटर्जी यांना नवी दिल्लीत ‘शेवालीर दे ल ऑर्ड्रे ड्यू मृते एग्रीकोलेटो’ देऊन गौरविले. कोलकाता येथील चॅटर्जी हे पहिले भारतीय झाले आहेत ज्यात भारतातील गॅस्ट्रोनॉमिक दृश्यासाठी पुनरुज्जीवन करण्याच्या त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून हा सन्मान प्राप्त झाला आहे.

👉बांगलादेशात प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय ड्रोनच्या उड्डाणांवर ढाका येथे बंदी घालण्यात आली आहे.

👉गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जीआरएसई) ने भारतीय तटरक्षक दलासाठी ((ICG) पाचवा फास्ट पेट्रोल वेसल (FPV) लॉंच केला आहे.

👉कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने जाहीर केले की 2020  मध्ये बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला टी -20 क्रिकेटचा समावेश निश्चित झाला आहे.

👉कुस्तीपटू दीपक पुनिया याने तब्बल 18 वर्षांनी भारताला ज्युनिअर गटातील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा पराक्रम केला आहे.

👉न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रेन्डन मॅक्युलमची आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

👉PUBG हा गेम खेळणाऱ्या प्रोफेशनल प्लेयर्ससाठी PUBG Nations Cup ही स्पर्धा दक्षिण कोरियाच्या सियोल शहरात तीन दिवस आयोजित  केली होती.

👉हि स्पर्धा जिंकून रशिया PUBG गेममधील पहिला वर्ल्ड चँपियन झाला आहे.

👉बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे 72 व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे.

👉छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.

👉पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने स्मार्ट मोबिलिटीच्या अंतर्गत ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात नव्याने 50 स्मार्ट ई-बस दाखल करण्यात आल्या. तसेच पीएमपीच्या 50 सीएनजी बसदेखील यावेळी ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या

👉भारताच्या अपंग क्रिकेट संघाने वर्ल्ड टी-20 सीरिज क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडलाच हरवून विजेतेपदाचा मान मिळवला.

👉मुंबई शहर व उपनगराच्या किनारपट्टीला लवकरच 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राचे कवच मिळणार आहे. हे क्षेपणास्त्र रडारशी संलग्न असेल. या संबंधीच्या खरेदीला अलीकडेच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

👉भारतीय हवाई दल (IAF)  विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना स्वातंत्र्य दिनी वीर चक्र शौर्य पदक देण्यात येईल.

👉व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरचे सर्वाधिक प्रलंबीत फीचर्स, फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन अखेरीस अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाले आहे. हे वैशिष्ट्य सध्या ज्यांनी अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅपच्या बीटा प्रोग्राममध्ये नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे.

👉पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने अभिनेत्याच्या जीवनावरील पुस्तकाची घोषणा केली, श्रीदेवी यांच्या नावाचे“श्रीदेवीः गर्ल वुमन सुपरस्टार” हे पुस्तक तिच्या 56 व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध झाले.

👉कर्नाटकमधील आयटी, बीटी आणि एस अँड टी विभागाने कर्नाटक इनोव्हेशन टेक्नॉलॉजी सोसायटी (KITS) च्या माध्यमातून ई-स्टेप सुरू केले आहे. विद्यार्थ्यांचे स्टार्ट-अप सक्षम बनविण्यासाठी पुढाकाराचा प्रसार करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.

👉कर्नाटकमधील आयटी, बीटी आणि एस अँड टी विभागाने कर्नाटक इनोव्हेशन टेक्नॉलॉजी सोसायटी (KITS) च्या माध्यमातून ई-स्टेप सुरू केले आहे. विद्यार्थ्यांचे स्टार्ट-अप सक्षम बनविण्यासाठी पुढाकाराचा प्रसार करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.

👉दिग्गज भारतीय धावपटू पी.टी. उषा, भारताच्या महान खेळाडूंपैकी एक. ती एशियन अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन (एएए) अ‍ॅथलीट्स कमिशनच्या सदस्या म्हणून नियुक्त झाली आहे.

👉नवी दिल्ली आणि उत्तर अमेरिका जोडणारी एअर इंडिया लवकरच उत्तर ध्रुवावर उड्डाण करणारी पहिली भारतीय विमान कंपनी बनणार आहे.

👉केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामांसाठी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020 (SS 2020) लॉंच केले आहे.

🌺🌺 अतनू चक्रवर्ती 🌺🌺

🔰 केंद्र सरकारने भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव पदावर असलेले अतनू चक्रवर्ती यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक केली आहे. चक्रवर्ती यांची ही नियुक्ती सुभाष चंद्र गर्ग यांच्या जागेवर करण्यात आली

🔰 अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला (Justice Narayan Shukla) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जस्टिस एसएन शुक्ला (Justice Narayan Shukla) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विद्यमान न्यायमूर्तींची सीबीआय चौकशी होणार आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयाला फायदा होईल असे आदेश दिल्याचा जस्टिस शुक्ला यांच्यावर आरोप आहे.