21 July 2020

महाराष्ट्र वनक्षेत्र विशेष

◾️ अति घनदाट वने 8721 चौरस किलोमीटर

◾️मध्यम घनदाट वने 20572 चौरस किलोमीटर

◾️खुली वने 21485 चौरस किलोमीटर

◾️राज्यांच्या राज्याच्या क्षेत्रफळाची वनांचे प्रमाण 16. 50 %

◾️ नोंदणीकृत वनक्षेत्र मध्ये देशात दुसरा क्रमांक
_____________________________
.     🔰सर्वाधिक वनक्षेत्र असलेली राज्य 🔰
_______________________________

📌 मध्य प्रदेश  77482 चौ. किमी

📌 अरुणाचल प्रदेश  66688 चौ. किमी

📌  छत्तीसगड  55611 चौ. किमी

📌 ओडिसा  51619 चौ. किमी

📌 महाराष्ट्र  50778 चौ. किमी

_______________________________
 _____

संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी


🍀सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन म्हणजेच CBDTने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी आहे. 

🍀देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि दिल्ली ही दोन राज्ये देशाला आर्धा इनकम टॅक्स देतात.

🍀सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (सीबीडीटी)च्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2017-18 मध्येही इनकम टॅक्स कलेक्शनमध्ये पूर्वेकडील राज्यांनीच बाजी मारली आहे.

🍀 2017-18 या आर्थिक वर्षात प्रमुख 5 राज्यांनी दिलेले योगदान (टक्केवारीमध्ये)-

महाराष्ट्र - 38.3%
दिल्ली -13.7%
कर्नाटक - 10.1%
तमिलनाडु - 6.7%
गुजरात - 4.5%

🍀सर्वाधिक आयकर जमा करणारी पूर्वेकडील प्रमुख 5 राज्ये:

मिझोराम - 41%
नागालँड - 32.1%
सिक्किम - 26%
त्रिपुरा - 16.7%
मेघालय - 12.7%

🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀

महाराष्ट्र बद्दल माहिती


◾️ महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ लोकसंख्येच्या👩‍👩‍👧‍👦 बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.💰💰

◾️ देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३🚂🚃 रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.

◾️ महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर 🏬🏢आहे

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते🛤🛣 असणारे राज्य आहे.

◾️ ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.

◾️ महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.

◾️ महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा.

◾️ एकूण राष्ट्रीय औद्योगिक 🏭 उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.

◾️ माहाराष्ट्रातील ३३,५०० चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली🌾 आहे.

◾️ भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर 💰बाजार मुंबईत आहे.

◾️ कोळसानिर्मित 🧱व अणुनिर्मित🛢 वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.

◾️ महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे.

◾️ राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.☀️🌧🌪

◾️ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.

◾️ औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर ⛩ ओळखले जाते. या शहराभोवती एकूण ५२ प्रवेशद्वार बांधण्यात आले होते

◾️ युनिस्कोने जागतिक वारसा हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार जागा महाराष्ट्रात आहेत.
📌 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
📌 अजंठा लेणी,
📌 वेरुळ लेणी आणि
📌 एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.

◾️ शेखरु म्हणजेच Indian giant squirrel 🐿 या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे.

◾️  हिरव्या कबुतराला म्हणजेच Green Imperial Pigeon 🕊 राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

◾️ महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.🐅

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच

चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसतो?
1)59%✅
2)48%
3)49%
4)9%

सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो?
1)9 मिनिट
2)8 मिनीट✅
3) 7 मिनिट
4)5 मिनिट

मुचकुंदी प्रकल्प कोणत्या दोन राज्यात आहे?
1)आंध्रप्रदेश ओरिसा ✅
2)महाराष्ट्र मध्य प्रदेश
3)छत्तीसगड मध्यप्रदेश
4)महाराष्ट्र तेलंगणा

उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
1) तापी✅
2) गोदावरी
3) नर्मदा
4) गंगा

कोकणाची सरासरी रुंदी............की. मी आहे.
1)30 ते 50
2)35 ते 55
3)30 ते 60✅
4)15 ते 30

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत?
1)चंद्रपूर
2) भंडारा
3) गडचिरोली ✅
4) गोंदिया

बिग- बॅग थेअरी प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत सर्वप्रथम ....... प्रस्तावित केला  होता?
1)अल्बर्ट आईन्स्टाईन
2)जॉर्जस लिमैत्रे✅
3)आयसॅक न्यूटन
4)स्टिफन हॉकिंग

असा कोणता देश आहे ज्यात कोणताही खानिज आढळत नाही?
1) फ्रान्स
2)पेरू
3)स्विझर्लांड ✅
4)स्वीडन

पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
1) नागपूर ✅
2) औरंगाबाद
3) बुलढाणा
4) नाशिक

पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधील सरासरी अंतर किती आहे?
1)150 दशलक्ष किमी✅
2)150 लक्ष किमी
3)150 प्रकाश वर्ष
4)150 कोटी किमी

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणते डोंगर स्थित आहे?
सातपुडा....

(1)⚛ भारताच्या पहिल्या महिला पुर्ण वेळ स्वतंत्र संरक्षण मंत्री कोण ?
⏩⏩ निर्मला सीतारामन

(2)⚛ RBI चे पहिले गव्हर्नर कोण होते?
⏩⏩ओसबर्न स्मित

(3)⚛  . ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
(1) लाला लजपतराय
 (2)सुभाषचंद्र बोस
(3) बाळ गंगाधर टिळक✅✅✅
(4) रामनाथ गोयंका

(4)⚛कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटन असतो*_
1.लाकूड✅✅✅
2.पाणी
3.धातू
4.स्फोटके

⚛(5)अंतराळातल्या उपग्रहांना सेवा देण्यासाठी प्रथमच कोणते अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले?

(A) ISA-1
(B) MEV-1✅✅✅
(C) Miraj VI
(D) MES-1

(6)⚛: कोणत्या खेळाडूने 59व्या राष्ट्रीय खुल्या क्रिडा स्पर्धेत महिलांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले?

(A) अन्नू राणी✅✅✅
(B) शर्मिला कुमारी
(C) प्रिती सिंग
(D) अंजू राणी

(7)⚛ १८५७ च्या उठावानंतर कोणत्या दिवशी भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली?*_
1.१ डिसेंबर १८५९
2.१ डिसेंबर १८५८
3.१ नोव्हेंबर १८५७
4.१ नोव्हेंबर १८५८✅✅✅

(8)⚛ पुढीलपैकी इस्राईल ची राजधानी कोणती आहे?
1)जेरुसलेम✅✅✅
2)बीजिंग
3)काबूल
4)तेहरान

(9)⚛: सतार या वाद्यासाठी कोणत्या महान व्यक्तीचे नाव प्रसिद्ध आहे?
उस्ताद अमजदअली खाँ
सादिक अली खाँ
पं. शिवकुमार शर्मा
पं. रविशंकर✅✅✅

(10)⚛: पुढीलपैकी अफगाणिस्तानची राजधानी कोणती आहे?
1)जेरुसलेम
2)बीजिंग
3)काबूल✅✅✅
4)तेहरान

भारतात 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक- विवो स्मार्टफोन निर्माता कंपनी.



स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोनं भारतातच मोबाईल फोन विकसित करण्यासाठी इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसंच कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या वाढवून 50 हजार करण्यात येणार आहे. “कंपनीनं भारतात 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

याद्वारे कंपनीची मोबाईल उत्पादन क्षमता सध्याच्या 3.3 कोटी युनिट्सवरून 12 कोटी युनिट्सपर्यंत  वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे,” अशी माहिती विवो इंडियाचे संचालक (ब्रँड स्ट्रॅटेजी) निपुण मारया यांनी दिली.

भारतातच डिझाईन केलेला आणि भारतातच निर्मिती केलेला विवोचा पहिला फोन 2020-21 च्या दरम्यानच लाँच होणार आहे.

कंपनीनं आपल्या ग्रेटर नॉयडा येथील प्रकल्पाच्या विस्तारासाठी 7 हजार 500 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचीही घोषणा केली. भारतीय बाजारपेठेत विवोचा हिस्सा तब्बल 21 टक्के आहे आणि ती दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनीही ठरली आहे.

जयंत विष्णू नारळीकर

भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक
जन्म - जुलै १९, १९३८
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

🔸संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
साहित्यातील भर
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

🔸विज्ञानकथा पुस्तके
अंतराळातील भस्मासुर
अभयारण्य
टाइम मशीनची किमया
प्रेषित
यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
व्हायरस

🔸इतर विज्ञानविषयक पुस्तके
आकाशाशी जडले नाते
गणितातील गमतीजमती
युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
सूर्याचा प्रकोप
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
Seven Wonders Of The Cosmos

🔸आत्मचरित्र
चार नगरांतले माझे विश्व

🔸पुरस्कार
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

चंद्रावर मानवाने पाऊल ठेवण्याच्या घटनेला 51 वर्षे पूर्ण

🔸NASA (अमेरिका) च्या 'अपोलो 11' यानाच्या सहाय्याने नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या ऐतिहासिक घटनेला 20 जुलै 2020 रोजी 51 वर्षे पूर्ण झाली...

🔸या यानामध्ये आर्मस्ट्राँग यांच्यासोबत एडविन अॉल्ड्रीन आणि मायकेल कॉलिन्स हे सहकारीही उपस्थित होते...

🔸आर्मस्ट्राँग नंतर अॉल्ड्रीन यांनीही चंद्रावर पाऊल ठेवले.कॉलिन्स यांच्यावर 'अपोलो 11' या यानाच्या नियंत्रणाची जबाबदारी होती...

🔸'अपोलो 11' यानाच्या लुनार मॉडेलचे नाव 'द ईगल' असे होते...

🔸हे यान 21 तास 31 मिनिट चांद्रभूमीवर होते.हे यान 24 जुलै 1969 रोजी आपली मोहिम संपवून पृथ्वीवर परतले होते...

🔸 चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर आर्मस्ट्राँग यांचे शब्द होते-"मानवाचं हे लहानसं पाऊल,मानवजातीसाठी मोठी झेप ठरेल"...

महान क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त


🔸कानपूरात शिकत असताना भगतसिंग यांच्याशी त्यांची ओळख झाली.त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते सुरुवातीला कानपूरमध्ये 'हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' या क्रांतीकारी संघटनेत कार्य करू लागले...

🔸या संघटनेत काम करत असतानाच त्यांनी बाँब बनविण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक बाँब बनविण्याचा कारखाना गुप्तपणे चालू करण्यात आला...

🔸लाहोर येथे सायमन आयोगाविरुद्ध निदर्शने करताना झालेल्या जबर लाठीहल्ल्यात ज्येष्ठ क्रांतिकारक लाला लजपतराय हे जखमी होऊन पुढे त्यांचे निधन झाले (१९२८).

🔸या घटनेमुळे ब्रिटिशांच्या विरोधात देशभर तीव्र असंतोषाची लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाठीहल्ल्याचा मुख्य सूत्रधार पोलीस अधिकारी स्कॉट याचा खून करण्याचे ठरविले...

🔸तथापि या हल्ल्यात स्कॉट ऐवजी दुसरा पोलीस अधिकारी साँडर्स मारला गेला.तेव्हा लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतल्याची पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली...

🔸त्यातच ब्रिटिश सरकारला अनिर्बंध सत्ता व अधिकार मिळवून देणारी दोन अन्यायकारक विधेयके (Trade Dispute Bill व Public Safety Bill) ब्रिटिश सरकार लादणार होते...

🔸या विधेयकांना विरोध करण्यासाठी व लालाजींच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी दिल्लीच्या कें.विधानसभेत बाँब टाकण्याचे ठरविले...

🔸सभागृहात ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जातून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी कोणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या सभागृहात बाँब फेकला,हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके भिरकावली...

🔸त्यांच्या निषेधपत्रात ‘बहिऱ्या झालेल्या लोकांसाठी हा मोठा आवाज असून खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी बलिदान चालू आहेʼ,असा मजकूर होता...

🔸त्यानंतर पळून न जाता दोघेही ‘इन्किलाब जिंदाबादʼ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले...

🔸भगत व दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.तर तत्पूर्वीच्या लाहोर येथील साँडर्स हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवून भगतसिंग आणि त्यांचे सहकरी सुखदेव, राजगुरू यांना पुढे फाशीची शिक्षा सुनावली...

🔸आपल्याला फाशी झाली नाही म्हणून बटुकेश्वर दत्त दु:खी होते.परंतु क्रांतिकारक फासावर लटकूनच नाही,तर जिवंतपणी कारागृहात मरणयातना भोगूनसुद्धा लढा देतात, अशा शब्दांत भगतसिंगांनी त्यांची समजूत घातली...

🔸अंदमानच्या कारागृहातही दत्त यांनी उपोषण करून इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवला...

🔸महात्मा गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली (१९३८)...

🔸छोडो भारत आंदोलनात भाग घेतल्यावरून पुन्हा त्यांना 4 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली.या दरम्यान त्यांना क्षयरोगाचाही सामना करावा लागत होता.पुढे १९४५ साली त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली...

🔸भारतीय स्वातंत्र्यानंतर ते राजकीय प्रसिद्धीपासून दूरच राहिले.अंजली या युवतीशी त्यांनी विवाह केला (१९४७) व पाटणा येथे स्थायिक झाले..

🔸दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावरील अंत्यसंस्कार हे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिस्थळाशेजारी हुसेनीवाला (पंजाब) येथे करण्यात आले...

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन:-

📚अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते.

📚 कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत.

📚सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.

📚त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरु केले होते.

📚‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरु केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.

📚त्यांची भाषा प्रभावी आणि परखड होती. कुर्बान हुसेन हे एका सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आले. ते गिरणी कामगार होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते, ते सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जे सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते.

📚 सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले.

माता मृत्यूदर कमी असणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र दुसरा (प्रथम केरळ).

माता मृत्यू दर(MMR) :-

- प्रति एकलाख जिवंत जन्मापैकी
- २०१४-१६ मध्ये १३०,
   २०१५-१७ मध्ये १२२ तर
   २०१६-१८ मध्ये ११३.

- WHO SDG नुसार हे प्रमाण २०३० पर्यंत "७०" उद्दिष्ट.

-  सर्वात कमी(कंसातील आकडे मागील वर्षाचे)
  १ केरळ- ४३,
  २. महाराष्ट्र- ४६(५५),
  ३. तमिळनाडू - ६०,
  ४. तेलंगणा- ६३
  ५. आंध्रप्रदेश- ६५.

- सर्वाधिक-
1.आसाम- २१५,
२. उत्तर प्रदेश- १९७,
३. मध्य प्रदेश- १७३,
4.राजस्थान-१६४,
5.छत्तीसगड-१५९.

- प्रमाण वाढले 👉 केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड.

- प्रमाण खूप कमी झाले 👉 राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा

चालू घडामोडी


.........................................................
• सीमा रस्ते संस्था (BRO) ने................हा पूल पूर्णपणे बदलण्यासाठी ‘प्रोजेक्ट अरुणक’ आरंभ केला
- डापोरीजो पूल (अरुणाचल प्रदेशातल्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात).

• केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने EPF ग्राहकांकडून तीन महिन्यांपर्यंत मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेच्या रकमेपर्यंत किंवा EPF खात्यात सदस्याच्या जमा असलेल्या रकमेच्या ____पर्यंत, जे कमी असेल, आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली
- 75 टक्के.

• पहिल्यांदाच, भारतीय स्टेट बँकेने (SBI)................. इतक्या रकमेचे ग्रीन बॉन्ड उभारले आहेत जे SBIच्या लंडन शाखेत सिंगापूर SGX वर सूचीबद्ध केले जातील
- 100 दशलक्ष डॉलर.

• नवी दिल्लीच्या AIIMS संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले टेलीमेडिसिन केंद्र, ज्याद्वारे तज्ञ डॉक्टर देशभरातल्या तज्ञांशी संपर्क साधतील
- CoNTeC (कोविड-10 राष्ट्रीय दूर-सल्लामसलत केंद्र).

• 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी बांगलादेशाच्या मुक्तिसाठी चालविण्यात आलेल्या हवाई मोहिमांमध्ये नेतृत्व करणारे निवृत्त एअर वाइस-मार्शल........... यांचे 29 मार्च रोजी निधन झाले
– चंदन सिंग राठौड.

• .................या राज्य विधानसभेने 30 मार्च 2020 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला त्याच्या एकत्रित निधीतून 1.55 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे विनियोजन विधेयक एकमताने मंजूर केले
- ओडिशा.

• ..............या भारतीय संस्थेने विलगीकरण केलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी ‘कोरोनटाईन’ (CORONTINE) नावाचे एक व्यासपीठ तयार केले
- भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई.

• ICICI लोंबार्ड कंपनीने ................. या व्यापारी देयक व्यासपीठासह भागीदारीत दुकानदारांसाठी 'कोविड-19 संरक्षण विमा' सेवा सुरू केली
– भारत पे.

• जगातले सर्वात थंड महाद्वीप जिथे शास्त्रज्ञांनी सन 2019-20 उन्हाळ्यात प्रथमच उष्णलहरीच्या घटनेची नोंद केली
- अंटार्क्टिका.

• लिबियावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शस्त्रास्त्र बंदीची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ................ या देशाने भूमध्य समुद्रात ‘ऑपरेशन इरिनी’ नावाने नौदल मोहीम सुरू करण्याची घोषणा केली
– युरोपिय संघ.

• सध्या चालू असलेल्या देशव्यापी बंदीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उत्पादनांचा पुरवठा सुलभ करण्यासाठी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) यांच्या वतीने घेण्यात आलेला पुढाकार
- 'फूड सोल्जर प्रोजेक्ट'.

• .............या राज्य सरकारने कोविड-19 संकटातून निघण्यासाठी व्यवसाय आणि लोकांना मदत करण्यासाठी पुढील पाच वर्षात वीज दरात सरासरी 8 टक्के कपात करण्याची घोषणा केली – महाराष्ट्र.

• आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिन
- 31 मार्च.

• तामिळनाडूच्या करुर शहरात दैनंदिन किरकोळ व्यवहार करण्यासाठी ‘एन्कासू’ नावाचे भारताचे पहिले प्री-पेड कार्ड सादर करणारी ......... ही बँक होय
– करुर वैश्य बँक.

• 'लाइफलाईन उडान फ्लाइट्स' उपक्रमाच्या अंतर्गत सतत वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी भारत आणि........... या देशात "कार्गो एअर ब्रिज" उभारण्याची सरकारने घोषणा केली
- चीन.

• 31 मार्च 2020 रोजी झालेल्या आभासी “जी-20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्री बैठक” याचे अध्यक्षपद ........... होते
- सौदी अरब.

• संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) या गटाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘ठराव 2518’ मंजूर केला
- शांती सैनिक.

•  ‘द डेथ ऑफ जीसस’ या कादंबरीचे लेखक
- जे. एम. कोएत्सी.

• वाहनांसाठी ई-पास देण्याकरिता ...........या राज्य सरकारने ‘प्रग्यान अॅप’ सुरू केले
- झारखंड.