०१ मे २०२२

गणेश हरी खरे मराठी इतिहास संशोधक

गणेश हरी खरे
मराठी इतिहास संशोधक

गणेश हरी खरे ‍‌‍‍‍‍‍‍‍‍(जन्म : १० जानेवारी १९०१; - ५ जून १९८५)[१] हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ते क्यूरेटर , चिटणीस व नंतर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

ग.ह. खरे
जन्म नाव
गणेश हरी खरे
टोपणनाव
तात्या
जन्म
१० जानेवारी, इ.स. १९०१
पनवेल, रायगड
मृत्यू
५ जून, इ.स. १९८५
राष्ट्रीयत्व
भारतीय
कार्यक्षेत्र
इतिहास, भारतीय स्वातंत्र्य चळवळ
भाषा
मराठी, इंग्रजी, फार्सी, कानडी, संस्कृत, उर्दू
साहित्य प्रकार
इतिहास
विषय
शिवकाल, पेशवेकाल प्राचीन भारत, मूर्तिशास्त्र
प्रसिद्ध साहित्यकृती
स्वराज्यातील तीन दुर्ग
शनिवारवाडा
ऐतिहासिक फार्सी साहित्य
मूर्तिविज्ञान
आयुष्यक्रम व कार्य
संपादन करा
ग. ह. खरे ह्यांचा जन्म पनवेल इथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. १९२० साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

असहकार चळवळीतील सहभाग
संपादन करा
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी ह्यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी ह्यासाठी खरे ह्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी त्यांचे सहकारी वि. ना. आपटे ह्यांच्यासह खरे ह्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि असहकारितेच्या तत्त्वाप्रमाणे जामीन द्यायचे नाकारल्याने त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदिवासाची शिक्षा देण्यात आली.[१]

बंदिवासातून ११ ऑगस्ट १९२३ रोजी सुटका झाल्यावर खरे ह्यांनी सातारा जिल्ह्या कॉंग्रेसचे एक चिटणीस म्हणून वर्षभर काम केले. १९२४ च्या उत्तरार्धापासून १९२९ च्या प्रारंभापर्यंत साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली.[१]

ह्या काळात खरे ह्यांनी इतिहाससंशोधनासाठी आवश्यक पूर्वतयारी केली. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. तसेच त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू ह्या लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केल्या. त्या लिप्यांतील साहित्य त्यांना वाचता येऊ लागले.

भारत-इतिहास-संशोधक मंडळातील काम
संपादन करा
साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेतील नोकरी सोडल्यावर खरे पुणे येथे आले. भारत-इतिहास-संशोधक मंडळाच्या शिवचरित्र-कार्यालयात मोडी कागदपत्रांच्या लिप्यंतराचे काम त्यांनी काही काळ केेले. ६ महिन्यांनतर त्यांची नेमणूक शिवचरित्र-कार्यालयात करण्यात आली. १९३० साली त्यांची नेमणूक भारत-इतिहास-संशोधक मंडळात करण्यात आली.

भारत-इतिहास-संशोधक मंडळात काम करत असताना खरे ह्यांनी स्वतःच पुस्तकांच्या व फार्सी जाणकारांच्या साहाय्याने फार्सी भाषा व लिपी आत्मसात केली. तसेच कानडी भाषा व लिपी ह्यांचाही अभ्यास केला. जुनी कानडी भाषाही (हळे कन्नड) त्यांना कळू लागली.

खरे ह्यांनी शिवचरित्रसाहित्य खंड ६ (१९३७), खंड ११ (१९५८), खंड १२ (१९६४), खंड १३ (१९६५) ह्यांचे संपादन केले. तसेच त्यांनी ऐतिहासिक फार्सी साहित्याचे ६ खंड संपादित केले. तसेच त्यांचे इतिहाससंशोधनपर लेखन विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले. खरे ह्यांनी विविध ठिकाणी भ्रमंती करून कागदपत्रे व इतर ऐतिहासिक वस्तू ह्यांचा संग्रह करून तो भारत-इतिहास-संशोधक मंडळाला मिळवून दिला. ह्यात सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख ह्यांचा समावेश आहे.[१] त्यांनी ५०हून अधिक पुस्तके आणि इंग्लश व मराठी ह्या भाषांत मिळून सुमारे ३५० लेख लिहिले आहेत.[१]

मानसन्मान[१]
संपादन करा
इंडियन हिस्टॉरिक कमिशनवर भारत-इतिहास-संशोधक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ३० वर्षे सहभाग
इंडियन हिस्टरी कॉंग्रेसच्या १९५१ च्या अधिवेशनात मध्ययुगीन शाखेचे अध्यक्षपद
पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाद्वारे डॉक्टरेट पदवीसाठीचे मार्गदर्शक व परीक्षक
न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेच्या १९७४ च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद
पुणे विद्यापीठाद्वारे १९८४ साली सन्माननीय डी लिट् पदवी
जानेवारी १९८५ च्या धारवाड येथील पुराभिलेख परिषदेत सत्कार
ग्रंथसंपदा
संपादन करा
लाठी शिक्षक भाग १ ; सातारा; वि. शं. वैद्य; आनंद; सातारा; शके १८४९ (१९२८)
शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड १ (अंशतः) (१९३०)
शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २ (अंशतः) (१९३०)
जोशी, शंकर नारायण; खरे, गणेश हरी (१९३०). शिवचरित्र साहित्य खंड ३. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.
दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १ ; पुणे; द. वा. पोतदार; गं. ना. मुजुमदार; आर्यभूषण; पुणे; १९३०; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ३४
श्रीक्षेत्र आळंदी ; पुणे; श्रीपाद रघुनाथ राजगुरू; राजगुरू; पुणे; शके १८५३ (१९३१); भारत-इतिहास-संशोधक मंडळ पुरस्कृत ग्रंथमाला : २७
मंडळांतील नाणी ; पुणे; द. वा. पोतदार; आर्यभूषण; पुणे; १९३३; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ३७
दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड २ ; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९३४; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ४१
भोर संस्थान ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय प्रदर्शिका ; पुणे; द. वा. पोतदार; आर्यभूषण; पुणे; १९३५
शिवचरित्रसाहित्य खंड ६ (१९३७)
श्रीविठ्ठल आणि पंढरपूर ; पुणे; गणेश हरि खरे; प्रतिभा; पुणे; शके १८६० (१९३८)
मूर्तिविज्ञान ; पुणे; गणेश हरि खरे; जनार्दन सदाशिव; पुणे; १९३९
शिवचरित्रवृत्तसंग्रह खंड २ (फार्सी विभाग); पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९३९; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ५२
शिवचरित्रवृत्तसंग्रह खंड ३ (फार्सी विभाग); पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९४१; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ५३
ऐतिहासिक आख्यायिका ; पुणे; वि. गं. केतकर; लोकसंग्रह; पुणे; १९४४; स्वाध्यायमाला (प्रथमविभाग)
हिंगणे दप्तर खंड १ ; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; जनार्दन सदाशिव; पुणे; १९४५; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ७०; श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर स्मारक ग्रंथमाला : क्र. १; पर्ण १
भोर संस्थान ऐतिहासिक-स्थल-दर्शन ; स्टेट प्रेस, भोर; १९४५
पंढरपूरचा विठोबा ; पुणे; वि. गं. केतकर; लोकसंग्रह; पुणे; १९४७; स्वाध्यायमाला (प्रथमविभाग) पुष्प १२०वे
हिंगणे दप्तर खंड २ (१९४७)
तुलादानविधि ; पुणे; रा. ज. देशमुख; आर्यभूषण; पुणे; १९४८
सिंहगड (इतिहास, वर्णन, उपसंहार); पुणे; वि.सी. चितळे; जनार्दन सदाशिव; आर्यभूषण; मौक्तिक; पुणे; १९४८
दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड ३ ; पुणे; भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९४९
शनिवारवाडा ; पुणे; वि.सी. चितळे; जनार्दन सदाशिव; आर्यभूषण; मौक्तिक; पुणे; १९४९
Exploration at Karad , 1949
खरे, गणेश हरी (१९५०). पेशवे दप्तर पत्रे कालनिर्णय सुधारणा. पुणे.
Shanivarvara Palace , 1950
इतिहासकर्ते मराठे , १९५१
विजयनगरसम्राट कृष्णदेवराय , १९५१
संशोधकाचा मित्र , १९५१
इतिहासभ्यासवर्ग व्याख्याने , १९५२
सिंहगड (हिंदी) , १९५३
सर ऑरेल स्टीन , १९५३
शिवचरित्र संशोधनवृत्त रा.श. २७९ , १९५३
शिवचरित्र संशोधनवृत्त रा.श. २८२ , १९५६
शनिवारवाडा (हिंदी) , १९५७
शिवचरित्र साहित्य खंड ११ , १९५८
महाराष्ट्राची चार दैवते , १९५८
आज्ञापत्र , १९६०
खरे, गणेश हरी (१९६०). भारत इतिहास संशोधक मण्डलस्थ हस्तलिखितग्रन्थानुक्रमणिका. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.
शिवचरित्र साहित्य खंड १२ , १९६३
शिवचरित्र साहित्य खंड १३ , १९६५
Select Articles , 1966
स्वराज्यातील तीन दुर्ग , १९६७
महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग , १९७१
निवडक लेख , १९७२
शिवचरित्र संशोधनवृत्त रा.श. ३०० , १९७३
निवडक लेख भाग २ , १९७२
मुसलमानकालीन महाराष्ट्र , १९७६
मराठी इतिहासाची विस्तृत शकावली खंड पहिला , १९७७
शहाजी शिवाजी संबंध ; टाऊन हॉल कमिटी , पुणे , १९७९
दुर्ग , सह्याद्री विहार मंडळ, १९८०
खरे, गणेश हरी; कुलकर्णी, गोविंद त्र्यंबक (२००१). मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास (इ.स.१२९६-१६३६). मुंबई: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.
खरे, गणेश हरी (१९३४). ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड १. पुणे: चिटणीस, भारत इतिहास संशोधक मंडळ.
खरे, गणेश हरी (१९३७). ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड २. पुणे: चिटणीस, भारत इतिहास संशोधक मंडळ.
खरे, गणेश हरी (१९३९). ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ३. पुणे: चिटणीस, भारत इतिहास संशोधक मंडळ.
खरे, गणेश हरी (१९४९). ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ४. पुणे: चिटणीस, भारत इतिहास संशोधक मंडळ.
ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ५ भाग १ , १९६१
ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ५ भाग २ , १९६९
खरे, गणेश हरी; कुलकर्णी, गोविंद त्र्यंबक (१९७३). ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६. पुणे: चिटणीस,

शंकर नारायण जोशी मराठी इतिहाससंशोधक

शंकर नारायण जोशी
मराठी इतिहाससंशोधक

शंकर पुरुषोत्तम जोशी याच्याशी गल्लत करू नका.
शंकर नारायण जोशी उर्फ शंकर नारायण वत्स ऊर्फ शंकर नारायण वत्स जोशी (जन्म : वाई, १९ फेब्रुवारी १८८९) हे एक मराठी इतिहाससंशोधक होते. ते पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यरत होते.

शं.ना.जोशी

शं.ना.जोशी
जन्म नाव
शंकर नारायण जोशी
जन्म
१९ फेब्रुवारी , इ.स. १८८९
वाई, सातारा
शिक्षण
इंग्रजी तिसरी इयत्ता
राष्ट्रीयत्व
भारतीय
कार्यक्षेत्र
इतिहास संशोधन
भाषा
मराठी संस्कृत
साहित्य प्रकार
इतिहास
चळवळ
मुळशी सत्याग्रह
प्रसिद्ध साहित्यकृती
अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास काळातील राज्यकारभाराचा अभ्यास
शिवचरित्र साहित्य खंड ३, ८
वडील
नारायण जोशी
पत्नी
अन्नपूर्णाबाई जोशी
शिक्षण
संपादन करा
शं.ना.जोशीचे पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पाचवडला झाले. पुढे इंग्रजी शिक्षण कुरूंदवाड व जमखंडी संस्थानच्या हायस्कूल मधे सुरू होते , पण इंग्रजी तिसऱ्या इयत्तेत शिकत असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले . त्यामुळे शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ते पाचवडला येऊन शेती करु लागले. शेती व पुढे सुरू केलेला मागाचा कारखाना यात मन रमेना म्हणून १९१० सेली भाऊशास्त्री लेले यांच्याकडे लेखनाचे काम सुरू केले. सोबत प्राज्ञपाठ शाळेत संस्कृतचे अध्ययन सुरू केले. १९१३ साली शं.ना.जोशी पुण्यात आले. ज्ञानप्रकाश व आर्यभूषण छापखान्यात मुद्रिते तपासन्याचे काम त्यांनी सुरू केले. पुढे त्यांचा लोकमान्य टिळकांशी संबंध आला व टिळकांच्या दौऱ्यात स्वयंसेवक म्हणून जोशींनी काम केले. पुढे मुळशी सत्याग्रहात जोशींनी हिरिरीने भाग घेतला.
शं.ना.जोशी ह्यांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील वाईचे. जोशींच्या घराण्यात सराफीचा व्यवसाय होता , त्यावरून हुंडीवाले जोशी ह्या नावाने ते त्यांचे घराणे प्रसिद्ध होते. जोशी उपनामांची अनेक घराणी होती , त्यामुळे ते स्वतःला वाईकर वत्स गोत्री जोशी म्हणवून घेत असत. वत्स , वत्स जोशी , जोशी वत्स , वाईकर अशी अनेक उपनामे त्यांच्या लेखांमधे व ग्रंथात आढळतात.

इतिहास संशोधन
संपादन करा
आर्यभूषण छापखान्यात मुद्रित संशोधक म्हणून काम करत असताना इतिहास विषयक साहित्य वाचल्याने ते इतिहास अभ्यासाकडे वळले. १९१६ मध्ये न.चिं.केळकराच्या सांगण्यावरून ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करु लागले. तेथील संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली ते इतिहास अभ्यास करु लागले.
इतिहास विषयक सूची व शकवल्या तयार करण्याचे किचकट काम उत्तम प्रकारे करत असत. त्यांनी शिवाजी व संभाजी महाराज , माधवराव पेशवे , आंग्रे, नाना फडणीस, रायगड ह्यांच्या शकावल्या प्रसिद्ध केल्या. मध्ययुगीन ग्रामव्यवस्था , वतनदार व राज्यव्यवस्था ह्याविषयी त्यांनी संशोधन करून अनेक शोधनिबंध लिहिले व ते भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात प्रसिद्ध केले. शिवाजी महाराजांच्या राज्य कारभारावर अभ्यास करून पुणे विद्यापीठासाठी त्यांनी सहा व्याख्याने दिली व ती व्याख्याने पुढे पुस्तकरुपाने प्रसिद्धही करण्यात आली. सातारा जिल्ह्याच्या मराठी आवृत्ती साठो त्यांनी जिल्ह्याचे ऐतिहासिक संशोधन केले. ठिकठिकाणी दौऱ्यावर असताना इतिहास विषयक रसाळ भाषेत ते उत्तम व्याख्याने देत असत. तसेच ऐतिहासिक व्यक्तीच्या चरित्र विषयक अनेक भाषणे जोशींनी पुण्याच्या नभोवाणी केंद्रावरून केली.

सामाजिक व राजकीय सहभाग
संपादन करा
पाचवडला असताना त्यांनी खेडेगावांमधे अनेक शाळा काढल्या. जोशींनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला होता , तेव्हा मुळशी पेट्याच्या इतिहासावर एक निबंध लिहून तो प्रकाशित केला. मुळशी सत्याग्रहासाठी जोशींना तीन महिन्यांची शिक्षाही झाली होती. कांग्रेसच्या अधिवेशनात ते सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून जात असत व तेथे स्वयंसेवकाचे कामही करत असत. तसेच सन्मित्र समाज मेळाव्यातही ते जात असत.

शंकर नारायण जोशी यांचे ग्रंथ
संपादन करा
मुळशी पेट्या संबंधी ऐतिहासिक माहिती , (प्रकाशक - गजानन कानिटकर - मुळशी सत्याग्रह सहाय्यक मंडळ) १९२२
राजवाडे लेखसंग्रह - ऐतिहासिक प्रस्तावना (संपादक - शं.ना.जोशी)
जोशी, शंकर नारायण; खरे, गणेश हरी (१९३०). शिवचरित्र साहित्य खंड ३. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.
राजवाडे लेखसंग्रह - संकीर्ण निबंध भाग १ (संग्राहक - शं.ना.जोशी)
राजवाडे लेखसंग्रह - संकीर्ण निबंध भाग २ (संग्राहक - शं.ना.जोशी)
मङ्गलाष्टके विवाह व मौंजीबन्धन जुनी व नवी दोन पुस्तके एकत्र ( प्रकाशक- केशव भिकाजी ढवळे , मुंबई ) १९३४
परांजपे कुलासंबंधी ऐतिहासिक उल्लेख , १९३५
शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड ३ (शके १३४८ - शके १६०२) - प्रकाशक - पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ, १९३७
शिवचरित्र साहित्य खंड ५
संभाजीकालीन पत्रसारसंग्रह (शके १६०२ - शके १६१०) - प्रकाशक - पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ, १९३७ (नवीन आवृत्ती - ऑगस्ट २०१५)
रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था (प्रकाशक - भारत इतिहास संशोधन मंडळ), १९४०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २५ - बापू गोखले पत्रव्यवहार (सहसंपादक - कृ.वा.पुरंदरे) ,१९४१
जोशी, शंकर नारायण (१९४२). शिवचरित्र साहित्य खंड ८. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.
छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक, स्थळ वढू बुद्रुक - साधार विवेचन , १९४६
सेनापती दाभाडे दफ्तर , भाग १ला (भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक वर्ष ३१ अंक २-३ , १९५१)
ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ३
ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ६
ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ९ - मराठी राजवटींतील कांहीं घाटमार्ग चौक्या व संकीर्ण (भा.इ.सं.मं.त्रैमासिक वर्ष ३५ अंक १-२ , १९५४)
कृष्णदयार्णवकृत हरिवरदा : श्रीमद्‌भागवत दशम स्कंधावरील टीका (पाठभेद, शब्दार्थ, कविचरित्र व विस्तृत प्रस्तावना यांसह) खंड १ला, प्रकाशक - दयार्णव रघुनाथ कोपर्डेकर : पुणे.- १९५५)
जोशी, शंकर नारायण (१९५९). भाऊसाहेबांची बखर (७ वी ed.). पुणे: शं.दा.चितळे.
अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास कालांतील राज्यकारभाराचा अभ्यास (१६०० - १६८०) , पुणे विद्यापीठ, १९५९
डाकिन्यां भिमाशंकरम् मीमाशंकर क्षेत्र (प्रकाशक - वोरा ऍण्ड कंपनी पब्लिशर्स.लि. मुंबई ) , १९५९
मंत्र्युत्तम नाना फडणवीस उत्सवपन्नाशी व शकावली
कृष्णाजी अनंत सभासद विरचित छत्रपती श्रीशिवाजीराजे यांची बखर , १९६०
हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य यांचे आज्ञापत्र आणि राजनीति - (सहसंपादक - ल.म.भिंगारे)  कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे , १९६०
नाना फडणीस यांचे शब्दात पानिपतचा रणसंग्राम ( विवेचक मिमांसा - शं.ना.जोशी , संकलन - प.म.लिमये , श्री.बा.सोहोनी )
मराठेकालीन समाजदर्शन (संपादक - इतिहास संशोधक शंकरराव जोशी सत्कार समिति | शं.ना.जोशी यांच्या निवडक लेखांचा संग्रह), १९६०

प्रल्हाद नरहर देशपांडे

प्रल्हाद नरहर देशपांडे

प्र.न. देशपांडे (१७ सप्टेंबर, १९३६:पंढरपूर, महाराष्ट्र - २७ मे, २००७) हे १९६९ ते १९९६ ह्या काळात विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे येथे इतिहासाचे अध्यापक, संशोधक व विभागप्रमुख होते. धुळे येथील इतिहासाचार्य वि.का.राजवाडे मंडळ या संस्थेचे ते चिटणीस होते. तसेच मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या संशोधक ह्या त्रैमासिकाचे संपादक होते.१९७१ साली त्यांनी 'मराठा फोर्ट्‌स' ह्या विषयावर पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. ते अनेक विद्यापीठांचे व संस्थांचे सदस्य होते. त्यांनी इतिहासविषयक १४ पुस्तके व २ कथासंग्रह लिहिले. अनेक इतिहास परिषदांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे.

प्र.न. देशपांडे

प्र.न. देशपांडे
जन्म नाव
प्रल्हाद नरहर देशपांडे
जन्म
१७ सप्टेंबर इ.स. १९३६
पंढरपूर
मृत्यू
२७ मे इ.स. २००७
शिक्षण
एम.ए., पीएच.डी.
राष्ट्रीयत्व
भारतीय
साहित्य प्रकार
इतिहास, कथालेखन
वडील
नरहर देशपांडे
देशपांडे यांनी वि.का.राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या २१ खंडी ग्रंथसंचाचे पुनःसंपादन करून ही पुस्तके ११ खंडांत परत प्रकाशित केली.

पुस्तके
संपादन करा
आज्ञापत्र
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०१ शिवकाल (मूळ खंड आठवा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०२ शिवकाल (मूळ खंड पंधरावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०३ शिवकाल (मूळ खंड १६, १७, १८), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०४ शिवकाल (मूळ खंड विसावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००४
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०५ शिवकाल (मूळ खंड एकविसावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००४
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०६ (मूळ खंड पहिला), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०७ (मूळ खंड ०२, ०५), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०८ शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड तिसरा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०९ शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड चौथा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १० शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड चौथा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ११ शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड सहावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांचा उदय आणि उत्कर्ष
महाराष्ट्र संस्कृती
स्वराज्याचे शिलेदार
रायगड दर्शन, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग मुंबई , १९८१ , १९९५
राजगड दर्शन, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग मुंबई , १९८१
छत्रपती शिवाजी महाराज, (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, २००२)
छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, राजवाडे संशोधन मंडळ धुळे, १९८३, २०१०

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहासकार, लेखक, वक्ते

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहासकार, लेखक, वक्ते

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जन्म : २४ जून १८६३; - ३१ डिसेंबर १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
Vishwanath Kashinath Rajwade 2003 stamp of India.jpg
जन्म नाव
विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
जन्म
२४ जून इ.स. १८६३
वरसई, रायगड जिल्हा
मृत्यू
३१ डिसेंबर इ.स. १९२६
धुळे
भाषा
मराठी
साहित्य प्रकार
इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास
जीवन
संपादन करा
वि. का. राजवाडे यांचा जन्म महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. [१]

बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले.

१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.

३१ डिसेंबर १९२६]] रोजी राजवाडे यांचे निधन झाले.

राजवाडे म्हणायचे - ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेलाो नाही.

राजवाडे ह्यांचे जन्मवर्ष
संपादन करा
राजवाडे ह्यांच्या जन्माच्या वर्षाबाबत थोडा गोंधळ झालेला दिसतो. त्यांच्याविषयीच्या विविध लेखनांत त्यांचे जन्मवर्ष वेगवेगळे दिलेले आढळते[२].

राजवाडे ह्यांच्या मृत्यूनंतर द. वा. पोतदार ह्यांनी केसरीत लिहिलेल्या लेखात त्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८६ अशी नोंदवलेली आढळते[३]. ह्यानुसार इ. स. १२ जुलै १८६४ हा दिनांक[४] मिळतो.

मात्र राजवाड्यांच्या स्मृत्यर्थ प्रकाशित झालेल्या ब्राह्मण-पत्रिकेच्या राजवाडे तिलांजली अंकात वा. दा. मुंडले ह्यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार राजवाडे ह्यांनी मुंडल्यांना आपला जन्मशक १७८५ असा सांगितला होता. त्याबाबत मुंडले ह्यांनी पोतदार ह्यांच्याकडे विचारणा केली आणि राजवाड्यांचे थोरले बंधू वैजनाथपंत राजवाडे ह्यांच्याकडे त्यांना विचारणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारणा केली असता राजवाडे ह्यांची एक जन्मपत्रिका वैजनाथपंत ह्यांनी पोतदारांना उपलब्ध करून दिली. ती मुंडले ह्यांच्या लेखात छापली असून त्यावर राजवाड्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८५ अशी नोंदवलेली आहे[५]. इसवी सनानुसार हा दिनांक २४ जून १८६३ असा आहे[६]. दत्तोपंत पोतदार ह्यांनीही नंतरच्या काळात ह्याच तिथीचा उल्लेख केलेला आढळतो [७].

ह्याव्यतिरिक्त १२ जुलै १८६३[८] आणि २४ जुलै १८६३[९] असे दोन दिनांक राजवाडे ह्यांचे जन्मदिनांक म्हणून नोंदवलेले आढळतात. मात्र त्यांचे आधार नोंदवलेले आढळत नाहीत[१०]. त्यामुळे उपलब्ध पुरावे पाहता आषाढ शु. ८, शके १७८५ (२४ जून १८६३) हाच दिनांक राजवाडे ह्यांचा जन्मदिनांक असावा असे म्हणता येते.

राजवाड्यांचा दरारा
संपादन करा
महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले.

राजवाड्यांचे लेखन आणि प्रस्तावना
संपादन करा

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे मोडी लिपीतील हस्ताक्षर
राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचे संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता.

राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकांबद्दल म्हणता येईल.

प्रतिभाशक्ती आणि आत्मविश्वास
संपादन करा
राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभाशक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्‍वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयाससुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.

प्रकाशित साहित्य
संपादन करा
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १ -मराठी भाषा व व्याकरण
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड २ -मराठी ग्रंथ व ग्रंथकार
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ३ -संस्कृत भाषा विषयक
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ४ -अभिलेख संशोधन
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ५ -मराठी धातुकोष
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ६ -व्युत्पत्ती कोष
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ७,८ -समाजकारण व राजकारण
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ९ - आत्मवृत्त व लेख
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १० -प्रस्तावना खंड
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ११ -इतिहास
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १२ -संपादक राजवाडे
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १३ -समग्र संत साहित्य
खानदेशातील घराणी
तीर्थरूप शहाजीराजे भोसले यांचे चरित्र
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १ ते २२ (संपादन आणि प्रस्तावना)
राजवाडेनामादिशब्द व्युत्पत्तिकोश
राजवाडे लेखसंग्रह (संपादक - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी; साहित्य अकादमी प्रकाशन)
राधामाधवविलासचंपू (संपादन आणि प्रस्तावना)
संस्कृत प्रतिशब्दशः भाषांतर
संस्कृत भाषेचा उलगडा
ज्ञानेश्वर नीति कथा
ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता) : अध्याय १ (२३ पानी प्रस्तावनेसह), ४, १२
ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण
संस्थात्मक कार्य
संपादन करा
भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (संस्थापक)
वि.का. राजवाडे यांच्यावरील पुस्तके
संपादन करा
ब्राह्मण पत्रिकेचा राजवाडे तिलांजली अंक (राजवाडे यांच्या मृत्यूसंबंधी प्रमुख वर्तमानपत्रांचे व प्रसिद्ध पुरुषांचे अभिप्राय; दुर्मीळ छायाचित्रे)
राजवाडे यांचे चरित्र व राजवाड्यांच्या दोन तपांचा विद्वत्सहवास (लेखक - भा.वा. भट)
राजवाड्यांचा रामदास : (राजवाडे लेखसंग्रहाअंतर्गत, संपादन द.वा. पोतदार)
इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र (लेखक - साने गुरुजी)
वि.का.राजवाडे यांचे इतिहास संशोधन मंडळ
संपादन करा
इतिहास संशोधनासाठी वि.का. राजवाडे यांनी पुणे येथे 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले.
वि.का.राजवाडे यांचे इतिहासातिल कार्य
संपादन करा
मानवी इतिहास काल व स्थल यांनी
बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार* विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे.

काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी
सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते.

             _अंतिम चित्रण
इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण
अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले.
त्यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन.
केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धेयांच्याच हकिकती नव्हेत’’, असे त्यांचे मत होते.
अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.