Thursday 5 September 2019

शास्त्रज्ञ आणि शोध किंवा सिद्धांत

● झकॅरीस जॅन्सन: 1590 मध्ये सूक्ष्मदरर्शकाचा सर्वप्रथम शोध लावला

● राॅबर्ट हूक: 1665 मध्ये बुचाच्या पातळ कापातील मृत पेशींचा शोध लावला

● ल्युवेन्हाॅक: 1674 मध्ये जीवाणू, आदीजीव, शुक्राणू इ. जीवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले.

● राॅबर्ट ब्राऊन: 1831 मध्ये पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शविले

● जोहॅनिस पुरकिंजे: पेशीतील तरंगत्या द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले.

● एम. जे. शिल्डेन: पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे असा सिद्धांत 1838 मध्ये मांडला

● थिओडाॅर शाॅन: वनस्पती वा प्राणी सर्व सजीव हे अनेक पेशींनी बनलेले असतात, असा सिद्धांत 1839 मध्ये मांडला

● राॅफल्ड विरशाॅ: सर्व पेशींचा जन्म हा त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशींपासून होतो, असा सिद्धांत 1855 मध्ये मांडला.

No comments:

Post a Comment

Latest post

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे

◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️ ▶️ 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ▶️ ...