Wednesday 3 April 2024

महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग

1. तांब्याचा उपयोग :

भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.

विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र –  पितळ

धातू व प्रमाण – तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)

उपयोग – भांडी तयार करण्याकरिता

संमिश्र – ब्राँझ

धातू व प्रमाण – तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)

उपयोग – बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता

संमिश्र – जर्मन सिल्व्हर

धातू व प्रमाण – तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%)

उपयोग – हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो.

संमिश्र – बेल मेटल

धातू व प्रमाण – तांबे (78%) व कथील (22%)

उपयोग – घंटया, तास तयार करण्याकरिता

संमिश्र – अॅल्युमिनीयम ब्राँझ

उपयोग – तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता

संमिश्र – गनमेटल

धातू व प्रमाण – तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%)

उपयोग – बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता2. लोखंडाचा उपयोग :

ओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात.

नरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो.

पोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो.

लोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :

संमिश्र – स्टेनलेस स्टील

धातू – लोखंड, क्रोमीअम, कार्बन

उपयोग – तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता

संमिश्र – टंगस्टन स्टील

धातू – लोखंड, टंगस्टन व कार्बन

उपयोग – जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.

संमिश्र – मॅगनीज स्टील

धातू – लोखंड व मॅगनीज

उपयोग – कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता.

संमिश्र – क्रोमीअम स्टील

धातू – लोखंड व क्रोमीअम

उपयोग – बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :

घरातील भांडी, विमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता

चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता

विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.

रुपेरी रंग तयार करण्याकरिता.

अॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र – ड्युरालयुनिम

धातू – अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज

उपयोग – हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता.

संमिश्र – मॅग्नेलियम

धातू – अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम

उपयोग – शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता.

संमिश्र – अॅल्युमिनीअम ब्राँझ

धातू – तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.

संमिश्र – अल्किनो

धातू – अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल

उपयोग – विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.4. जस्ताचे उपयोग :

लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.

विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.

धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.5. पाराचा उपयोग :

हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्‍याचा उपयोग करतात.

बाष्पदीप तयार करण्याकरिता पार्‍याचा उपयोग करतात.

आरसे तयार करण्याकरिता केला जातो.6. सोडीयमचे उपयोग :

सोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.

उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.7. मॅग्नेशियमचे उपयोग :

क्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात.

शोभेच्या दारूमध्ये.

धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.

धातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.8. चांदीचा उपयोग :

दागिने तयार करण्याकरिता

चांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो.

छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता.

विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.


9. सोन्याचे उपयोग :

नाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.10. शिशाचा उपयोग :

मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.

दारूगोळा तयार करण्याकरिता.

विद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता.

विद्युत परीपथकात वितळतार करण्यास.

अणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.

डाग देण्याचा धातू व सहज वितळणारी संमिश्रे तयार करणे.

पुरातनकाळी किल्याच्या भिंती मजबूत करण्याकरिता दोन दगडाच्या जोडात शिशे भरले जात असे.


 महत्त्वाचे धातू आणि अधातु व त्यांचे उपयोग 【भाग-2】


11. कथिलचा उपयोग :

मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता

रंग तयार करण्याकरिता

विद्युत परीपथकामध्ये

मिश्रधातू तयार करण्याकरिता

विद्युत परीपथकात वितळतार तयार करण्याकरिता.


12. गांधकाचे उपयोग :

सल्फ्युरिक अॅसिडच्या उत्पादनकरिता.

आगकाडी उत्पादनात वापरण्यात येणारे अॅटिमनी सल्फाइड तयार करण्याकरिता.

गंधकाची पूड ही कवक नाशक आहे. यामुळे गंधकाची पूड पिकावर धूरळण्याकरिता उपयोगात आणली जाते. तसेच कीटकनाशके आणि कीडनाशके तयार करण्याकरिता गंधकाचा उपयोग केला जातो.

सल्फा ड्रग तयार करण्याकरिता

बंदुकीची दारू आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्याकरिता

रबराचे व्हल्कनायझेन तयार करण्यासाठी.


13. सल्फर डायऑक्साइडचे उपयोग :

सल्फ्युरिक आम्लाच्या निर्मितीकरिता.

साखर, कृत्रिम धागे इत्यादीच्या विरंजनाकरिता.

कागद तयार करण्याकरिता आवश्यक असलेली कॅल्शियम बायसल्फाट सारखी संयुगे तयार करण्याकरिता

द्रवरूप सल्फर डायऑक्साइडचा उपयोग पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाकरिता केला जातो.


14. पिवळा फॉस्फरसचे उपयोग :

तांबडा फॉस्फरस तयार करण्याकरिता. तांबडया फॉस्फरसपासून सुरक्षित आगकाडया तयार केल्या जातात.

अतिशय टणक, न गंजणारे फॉस्फर ब्राँझ मिश्र धातू तयार करण्याकरिता

उंदरासाठी मारण्याकरिता उपयोगी पडणारे झिंक फॉस्फेट विष तयार करण्याकरिता.

स्मोक बॉम्ब आणि शोभेची दारू तयार करण्याकरिता

स्फुरदयुक्त खताची निर्मिती करण्याकरिता


15. क्लोरीनचे उपयोग :

कापड, धागे, कागद व कागदाच्या लगदाच, विरंजन करण्याकरिता.

क्लोरीन जंतूनाशक असल्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता या उपयोग केला जातो.

क्लोरोफार्म, एथीलीन क्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड इत्यादि संयुग तयार करण्याकरिता.

कृत्रिम रबर, प्लास्टीक, डी.डी.टी तयार करण्याकरिता.

विरंजक चूर्ण तयार करण्याकरिता.


16. ब्रोमीनचे उपयोग :

ब्रोमाइड क्षार तयार करण्यासाठी ब्रोमीन वापरतात.

रंग व जंतुनाशके तयार करण्यासाठी ब्रोमीनच उपयोग करतात.

फोटोफिल्म तयार करण्याकरिता सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग करतात.

औषध उद्योगांमध्ये सोडीअम व पोटेशियमचे ब्रोमाईड वापरतात.


17. आयोडिनचे उपयोग :

टिंक्चर आयोडीन तयार करण्याकरिता व सिल्व्हर आयोडीन तयार करण्याकरिता.

आयोडिनपासून जंतुनाशक मलमे तयार केली जातात.

कृत्रिम रबर, प्लास्टिक, डी.डी.टी. तयार करण्याकरिता.


18. हिर्‍याचा उपयोग :

दागिण्यातील रत्न म्हणून

कठीण पदार्थातला छिद्र पाडण्यासाठी अवजारे तयार करण्याकरिता व काच कापण्याकरिता.


19. ग्रॅफाईट उपयोग :

विद्युत भट्टीमध्ये इलेक्ट्रोड म्हणून

शिसपेन्सिल तयार करण्याकरिता

उच्च तापमानावर कार्य करणार्‍या यंत्रामध्ये वंगण म्हणून

युरेनियमभट्टीमध्ये न्युट्रॉन शोषक म्हणून


20. कार्बन मोनॉक्साइडचा उपयोग :

कार्बनमोनोऑक्साइड आणि हायड्रोजनचा उपयोग वॉटर गॅस म्हणून करतात.

कार्बनमोनोऑक्साइड आणि नायट्रोजनचा उपयोग प्रोड्यूसर गॅस म्हणून करतात

रंगाच्या कारखाण्यात उपयुक्त असणार्‍या फॉस्जिन वायूच्या उत्पादनाकरिता

फॉस्जिन वायुचा उपयोग युद्धात विषारी वायु तयार करण्याकरिता सुद्धा करतात.


21. कार्बन डायऑक्साइडचा उपयोग :

सोडीयम कार्बोनेट आणि सोडीयम बायकार्बोनेट तयार करण्याकरिता

वायुमिश्रीत जल तयार करण्याकरिता

अग्निशामक दलामध्ये आग विझविण्याकरिता

अन्नपदार्थ टिकविण्याकरिता किंवा त्याची वाहतूक करण्याकरिता शितकारक म्हणून कोरडा बर्फ वापरतात.


22. मिथेनचा उपयोग :

गोबर गॅस आणि नॅचरल गॅसच्या स्वरुपात घरघुती इंधन म्हणून

काजळी आणि कार्बन ब्लॅक तयार करण्याकरिता.

ऊर्जानिर्मिती केंद्रामध्ये इंधन म्हणून

हायड्रोजनचे उत्पादन घेण्याकरिता


23. मिथेनॉलचा उपयोग

प्रयोग शाळेत स्पिरीट लॅम्प करिता इंधन म्हणून.

लाकडावर पॉलिश करण्याकरिता लागणारा द्रावक म्हणून

सुगंधी द्रव्ये तयार करण्याकरिता व कृत्रिम धागे तयार करण्याकरिता.


24. इथिलिनचा उपयोग :

कातकाम आणि धातुंच्या जोडकामाकरिता उपयोगात येणारी ऑक्सि-इथेलीन ज्योत तयार करण्याकरिता.

कृत्रिमरीत्या फळे पिकविण्याकरिता.

प्लास्टिकचे सामान व वस्तू त्याचप्रमाणे पॉलिथीन तयार करण्याकरिता.


25. अॅसिटीक अॅसिडचा उपयोग :

सेल्यु लोज अॅसिडच्या निर्मिती करिता.

कृत्रिम धागे आणि प्लास्टिकचे उत्पादन घेण्याकरिता

लोणची, सॉस, केचप यात परीरक्षक म्हणून अॅसिडपासून तयार केलेल्या व्हिनेगरचा उपयोग करतात.


26. बेंझीनचा उपयोग :

चरबी, राळ, रंगलेप आणि रबर इत्यादि द्रावकाकरिता.

ड्रायक्लीनिंगसाठी

पेट्रोल तुटवड्याच्या काळात मोटारच्या इंधनातील घटक म्हणून

निरनिराळी कार्बनी संयुगे तयार करण्याकरिता.

No comments:

Post a Comment

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...