Wednesday 3 April 2024

जीवनसत्त्व ड


» या जीवनसत्त्वात ‘ड२’ आणि ‘ड३’ असे प्रकार आहेत. 


» ‘ड२’ जीवनसत्त्वाची रासायनिक नावे अरगोकॅल्सिफेरॉल, कॅल्सिफेरॉल, व्हायोस्टेरॉल अशी आहेत. 


» ‘ड३’ जीवनसत्त्वाचे नाव कोलेकॅल्सिफेरॉल आहे. 


» सर्व प्राण्यांच्या त्वचेमध्ये ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल हा पूर्वगामी ‘ड३’जीवनसत्त्व घटक असतो. 


» कोवळ्या सूर्यप्रकाशात अतिनील किरणांमुळे त्याचे कोलेकॅल्सिफेरॉलमध्ये रूपांतर होते. 


» अरगट आणि यीस्ट या कवकांत अरगोस्टेरॉल असते.


» ड जीवनसत्त्व वनस्पतींमध्ये अत्यल्प प्रमाणात असते. 


» सर्व प्राण्यांत ते अल्प प्रमाणात असून जठर आणि यकृतात असते. 


» शार्क व कॉड माशांच्या यकृतापासून मिळविलेल्या तेलात ते असते. 


» रोजच्या आहारातून ड जीवनसत्त्व पुरेसे मिळत नाही. म्हणून यकृत तेल वापरल्यास किंवा उन्हात बसल्यास ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघते. 


» प्रौढ व्यक्तीला दररोज १५ मिग्रॅ. ड जीवनसत्त्व आवश्यक असते. 


» त्याचे कार्य आणि परावटू ग्रंथीतील पॅराथॉर्मोन संप्रेरकाचे कार्य एकमेकांस पूरक असते. 


» कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांच्या चयापचयावर ड जीवनसत्त्वाचे नियंत्रण असते. 


» शरीरातील हाडे आणि दात यांच्या जडणघडणीवर ड जीवनसत्त्वाचा परिणाम होतो. त्यामुळे कॅल्शियम, फॉस्फरस या दोन्हींच्या अभिशोषणात वाढ होते. 


» ड जीवनसत्त्व रक्तातील फॉस्फेटची पातळी नियमित राखते.


» ड जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लहान मुलांच्या बरगडया, मनगट, पाय यांच्या हाडांमध्ये बदल होतात. 


» शरीरातील लांब हाडांच्या टोकाशी कूर्चा तयार होते, हाडे वाकल्यामुळे बरगडया व पायांना बाक येतो, कवटीच्या हाडांचे कॅल्सीभवन होत नाही आणि दात किडतात. या लक्षणांना मुडदूस विकार म्हणतात. 


» ड जीवनसत्त्वाच्या अभावे प्रौढांना अस्थिमार्दव विकार होतो. त्यामुळे हाडांतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन हाडे ठिसूळ होतात.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...