Saturday, 2 April 2022

सराव प्रश्नमालिका

1. सलील
रवत
दुध
पाणी
विष

● उत्तर - पाणी

2. आहो! किती छान खेळलास. अधोरेखित शब्दाची जात ओळखा
केवलप्रयोगी अव्यय
उभयान्वयी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
शब्दयोगी अव्यय

● उत्तर - केवलप्रयोगी अव्यय

3. विरूध्दार्थी लिंग ओळखा (बोका)
भाटी
बोकी
बोके
यापैकी नाही

● उत्तर - भाटी

4. धुर म्हणजे विस्तवाचा धूर तर धुरा म्हणजे काय
जमीनीचा सारा
गवताचा भारा
जबाबदारी
यापैकी नाही

● उत्तर - जबाबदारी

5. तीव्र
सौम्य
शांत
मंद
प्रखर

● उत्तर - सौम्य

6. कुऱ्हाडीचा दांडा ...... काळ.
गवतास
आप्तास
गोतास
जिवास

● उत्तर - गोतास

7. 'दूरदर्शनवरील ती मालिका तितकीशी चांगली नव्हती' या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
दूरदर्शनवरील ती मालिका वाईट होती
दूरदर्शनवरील ती मालिका समाधानकारक नव्हती
दूरदर्शनवरील ती मालिका बरी होती
दूरदर्शनवरील ती मालिका फारच वाईट होती  

● उत्तर - दूरदर्शनवरील ती मालिका बरी होती

8. ‘तळे राखी तो पाणी चाखी’ या म्हणीचा योग्य अर्थ दया .
तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही
तळेराखणारा मनुष्य पाणी पितोच
ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते,तो त्या वस्तू चा उपभोग घेतोच
तळेराखणारा अधिकाराचा वापर करतो

● उत्तर - ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते,तो त्या वस्तू चा उपभोग घेतोच

9. अकरावा रुद्र म्हणजे ...
अतिशय शूर माणूस
अतिशय तापट माणूस
बुध्दीवान माणूस
अत्यंत चपळ माणूस

● उत्तर - अतिशय तापट माणूस

10. शुध्द शब्द ओळखा
शारिरीक
शारीरिक
शारीरीक
शारिरिक

● उत्तर - शारीरिक   

No comments:

Post a Comment

Latest post

राज्यसेवा पूर्व झाली.. आता combine गट ब ची तयारी !!

दि. 5 जानेवारी 2024 ला आपण आतुरतेने वाट पाहणाऱ्या combine गट ब ची पूर्व परीक्षा होत आहे.. या निमित्ताने विद्यार्थी म्हणून आपली भूमिका कशा पद...