Wednesday 13 April 2022

भारताचा इतिहास भारत देशाचा इतिहास

भारताचा इतिहास
भारत देशाचा इतिहास

भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. येथील लिखित इतिहास २,५०० वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यांनुसार भारतात ७०,००० वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्त्व आणि इतिहास आहे. भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय. मौर्य साम्राज्य ज्याला गुप्त राज्य असेही म्हटले जाते.हे भारताच्या पहिले प्रभावी असे केंद्रीय शासन होते भारतामध्ये सत्ताही मोठ्या काळापर्यंत टिकून राहिली देशातील ती पहिली केंद्रीकृत अशी सत्ता होते या काळामध्ये राज्यकर्त्यांनी मोठा भूप्रदेश आपल्या अंमलाखाली आणला आणि प्रजा कल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

अजिंठा-वेरूळची लेणी येथील भित्तीचित्रे
मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तिचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ज्ञांनुसार आदिमानवाने भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला. साधारणपणे ९,००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व सिंधू नदीच्या काठावर त्याचे हळूहळू सिंधू संस्कृतीत रूपांतर झाले.[१]. इसवी सन पूर्व ३५००चा सुमार सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हडप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. ह्या शहरांचा शोध दयारामजी सहानी यांनी लावला. काही इतिहासकार मान्य करतात की युरोप व मध्य आशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व त्यानंतर वैदिक काळ सूरू झाला.पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन हडप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ, गुजरातमधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.[२] साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती.हे जनपद म्हणजेच जनसमूह होय.या जनसमूहांच्या प्रमुखा मध्ये रावी नदीच्या तीरावर झालेले "दशरज्ञ युद्ध" प्रसिद्ध आहे.या वैदिक लोकांच्या जनसमुहांबरोबर "दास" किंवा "दस्यू" लोकांचे वास्तव्य होते. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून ते पूर्वेला बिहार, बंगाल,ओडीसा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेत महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापलेला होता संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते त्यातील काही जण पदांमध्ये राजेशाही ही अस्तित्वा मध्ये होती तर काही जणांमध्ये मात्र गणराज्य व्यवस्था होती.त्याकाळी अशी १६ जनपदे अस्तित्वात आलेली होती.गणराज्य असलेल्या जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची गणपरिषद असे परिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारास संबंधीचे निर्णय घेत असत अशा चर्चा ज्या ठिकाणी होत त्या सभागृहाला संतागार असे म्हटले जाई '''गौतम बुद्ध''' नेपाळमधील शाक्य गणराज्यातील राजपुत्र होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी प्रचलनात होते.जन पदांच्या संदर्भातला उल्लेख हा तत्कालीन प्राचीन धार्मिक साहित्यामधून येतो यामध्ये बौद्ध धर्मातील त्रिपिटक आणि जैन धर्मातील ग्रंथ यामध्ये जनपदांचा व गणराज्यांचा उल्लेख आलेला आहे. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता या राज्यातील श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती श्रावस्ती हे कोसल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्रावस्थीमध्ये चेतवणी या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते कोसल राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले.कोसलप्रमाणेच वत्स, अवंती आणि मगध हीदेखील मोठी महाजनपदे अस्तित्वात होती.मगधच्या उत्तरेस लिच्छवीचे व्रुज्जी हे गणराज्य होते.वैशाली ही त्याची राजधानी होती.मगधचा राजा अजातशत्रूने लिच्छवी राज्य जिंकून ते मगधामध्ये विलीन करून घेतले.वत्स महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयागच्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळाचे कौशांबी होईल हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता राजा उदयन नंतर वत्स महाजन पदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही ते अवंती महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतले प्राचीन भारताच्या इतिहासात पदांची स्थान हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहे या काळातील जनपदांच्या उदयातूनच सार्वभौम सत्ता ह्या आकाराला आल्या त्याच्या प्रदेशांमध्ये क्या सत्तांचा मोठा विस्तार घडून आला अनेक वैभव संपन्न असे राज्य देशांमध्ये आकाराला आले.

इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक सम्राट सिकंदर (अलेक्झांडर)च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली.सिकंदराने गंगेच्या खोर्यापर्यतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक क्षात्रप म्हणजे सुभेदार नेमले.भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रीसमध्ये त्याचा म्रुत्यू झाला.सिकंदराच्या म्रुत्युनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणार्या भारतीय प्रदेशात उठाव सुरू झाले. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते.चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्ययांच्या साथीने /मदतीने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.त्याआधी त्याने मगधमधील नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंदाचा पराभव केला. तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू सम्राट अशोकाने कळस गाठला.भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्याचा विस्तार झाला.कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[३] भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.अशोकाच्यानंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरू झाले.शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहद्राता याची त्याचा सेनापती पुष्यमित्र शुग याने हत्या केली आणि शुग घराण्याची सत्ता स्थापन केली.पुढे काही काळानंतर शुग घराण्याचा मंत्री वासुदेव कण्व याने शुग घराण्याच्या राजाची हत्या केली आणि कण्व घराण्याची सत्ता स्थापन केली. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले.सातवाहननांची ची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाले.हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी झाली.महाराष्ट्रातील प्रतिष्ठान(आजचे पैठण) ही त्यांची राजधानी होती. इ.स.९ व्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात गुर्जर प्रतिहारांची राजवट स्थापन झाली.कन्नोज ही त्यांची राजधानी होती. साहित्य,गणित,शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."[४][५] भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतीलपांड्य, चोल साम्राज्य,चेरा,विजयनगरचे साम्राज्य / राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन,यादव,विदर्भ या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खुणावते. अजिंठा, वेरूळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली. चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशियापर्यंत पोहोचला होता.चालुक्य,राष्ट्रकूट,परमार,काकतीय,होयसळ राज्ये उदयास आली. ग्रीकाप्रमाणेच शक,हूण,कुषाणानीही भारतावर आक्रमणे केली.मध्य प्रदेशातील खजुराहो येथील चंडेल राजपूत राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत.

११ व्या शतकात इराणमधील अरब सेनापती मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व तेथील दाहीर राजाचा पराभव करून तो प्रांत काबीज केला. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारताच्या अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका महमूद नावाच्या राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. मंगोल सम्राट तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.अफगाण शासक महंमद घोरीने भारतावर आक्रमण केले.अजयमेरुचा(आजचे अजमेर) एक राजपूत राजा प्रुथ्वीराज चौहानशी त्याचा संघर्ष झाला.आठ युद्धानंतर प्रुथ्वीराज चौहानचा म्रुत्यू झाला.महंमद घोरीने कुतूबुद्दीन ऐबक या आपल्या गुलामास भारताच्या जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले.महंमद घोरी नंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला.महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले.त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले.नंतर त्याचा सेनापती जलालुद्दीन खिलजीने त्याच्याविरुद्ध उठाव करून सत्ता बळकावली/हस्तगत केली.१३व्या शतकात त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला. त्याने अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत शासन केले. यात राजस्थानमधील चित्तोडचा राजपूत राजा रतनसिंग व राणी पद्मावतीचा इतिहास न विसरण्यासारखा आहे. दिल्ली सल्तनत ते मुघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या.महाराष्ट्रात हसन गंगू बहामनी याने बहामनी साम्राज्याची/ राज्याची स्थापना केली.उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात/राज्यात समाविष्ट होता.बहामनी साम्राज्यात/राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात/राज्यात संघर्ष होत.पुढे बहामनी साम्राज्याची/राज्याची पाच शकले झाली.अहमदनगरची निजामशाही,विजापूरची आदिलशाही,गोवळकोंड्याची कुतूबशाही,एलिचपूरची (आजचे अचलपूर) इमादशाही,बिदरची बरीदशाही अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती.त्यांच्यातही साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत असत.या पाचपैकी चार राज्यांनी विजयनगरवर हल्ला करून त्याचा अंत केला.आपापसांतील सत्तासंघर्षात त्यांच्यापैकी एलिचपूर आणि बिदर ही राज्ये कालौघात नष्ट झाली.मुघल बादशाहा/सम्राट शाहजहानने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली.मुघल आणि दक्षिण भारताच्या इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत.मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलासमोर आव्हान उभे केले. पंजाबात महाराज रणजितसिंगगांच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याची/राज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य,स्वराज्य ाची महाराष्ट्रात स्थापना झाली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍:प्रस्थापन करणे हा होता. शहाजहानचा पुत्र मुघल सम्राट औरंगजेबच्या म्रुत्युनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारताच्या विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही तर इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज या तीन परकीय सत्तांचा प्रतिकार केला . त्यापैकी कुतूबशाही आणि फ्रेंचांशी त्यांनी मैत्री करार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर औरंगजेबाने/मुघलानी मराठा राज्यावर आक्रमण केले/हल्ला केला.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलाबरोबर संघर्ष केला.औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले.छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी नेतृत्व केले.मुघल सेनापती दिलेरखानाने मराठ्यांची राजधानी असलेला रायगड वेढा घालून जिंकल्यामुळे राजारामाना रायगड सोडून तामिळनाडूतील जिंजीला पलायन करावे लागले.प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे राजारामाचा म्रुत्यू झाला.औरंगजेबाने संभाजीची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू यांना कैद केले.औरंगजेबाच्या म्रुत्यूनंतर मराठ्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मुघलानी शाहूला व येसूबाईला मुक्त केले/शाहूची व येसूबाईची मुक्तता केली.गादीसाठी शाहू व राजारामाची पत्नी ताराबाई यांच्या युद्धात शाहूने ताराबाईचा पराभव केला.मराठा राज्याची वाटणी झाली.त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू मराठा साम्राज्याचा विस्तार सुरू केला.मराठेशाहीनंतर पेशवे आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी पुण्यात वसवली.महाराष्ट्रात पेशवाईची स्थापना झाली.पेशवे मराठेशाहीचे सत्ताधारी/सत्ताधीश बनले.पहिले बाजीराव पेशवे एक कर्तबगार राजकारणी होते.त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते.पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात अफगाण शासक अहमदशहा अब्दालीशी झालेल्या पानिपतच्या तिसर्या युद्धात दारूण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले. त्याचा सर्वाधिक फायदा युरोपियन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सद्देगिरी,फुटीचे राजकारण करून हळूहळू भारताच्या सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत, कर्नाटकातील म्हैसूरचा सुल्तान हैदर अली व त्याचा मुलगा टिपू सुलतान, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शीख राज्य/साम्राज्य व जाट राज्ये/साम्राज्ये असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले.ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण केले.फ्रान्सने/फ्रेंचानी पॅडिचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी गोवा,दीव,दमण आणि दादरा आणि नगर हवेली हस्तगत केले.भारताच्या त्यांची मांडलिक संस्थाने/राज्ये दत्तक वारस नामंजूर करून खालसा केली.[६]. १८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारकडे गेला.

इ.स. १९३७ साली महात्मा गांधी सोबत पंडित जवाहरलाल नेहरू
लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मध्ये टिळकांच्या मृत्युनंतर गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अंहिसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या.तसेच काही सशस्त्र क्रांतीकारी संघटनाही उभ्या राहिल्या.[७] सरते शेवटी दुसर्या महायुद्धानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.[८] आधुनिक भारताचे निर्माते व अद्वितीय बहुआयामी विद्वान असलेल्या कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या तब्येतीची पर्वा न करता अत्यंत मेहनतीने ३ वर्षामध्येच जगातील सर्वात महान व मोठे असे भारताचे संविधान लिहिले. घटनाकार बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय राज्यघटना’ संविधान समितीला सुपूर्द केली. आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटनेची अंमलबजावणी सुरू झाली, भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे.भारत संघराज्य बनले.भारतात १९५६ नंतर भाषावार प्रांतरचना झाली.फ्रान्सने आपल्या ताब्यातील भारतीय वसाहती वसाहतीमध्ये सार्वमत घेऊन भारताकडे सोपवल्या.पोर्तुगीजांशी भारताला लढावे लागले.१९६१मध्ये भारताने आपले लष्कर पाठवून गोवा,दीव,दमण आणि दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केले.

 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मीर,पंजाबमध्ये १९८० च्या दशकात झालेला हिंसाचार व ईशान्येकडील आसाम,मणिपूर,मिझोराम,नागालैंड राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरिबीमुळे आदिवासी भागांत सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारताच्या आतंकवाद/दहशतवाद ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासुन भारताच्या विविध शहरात आतंकवादी/दहशतवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून १९६२,१९४७, १९६५,१९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे. इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने राजस्थानातील पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून स्वतःला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगीकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे.खासकरून सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणीय कामगीरी केली.[१०] गोल गम इस्लामिक आर्किटेक्चर.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...