Saturday 23 April 2022

मानव विकास निर्देशांक व इंदिरा आवास योजना (IAY)

🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲:
मानव विकास निर्देशांक (Human Development Index)

> प्रकाशन : UNDP

> पहिला HDI : 1990

> रचना: महबूब–उल–हक व अमर्त्य सेन

> आयाम

दीर्घ व निरोगी जीवन (जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान)

ज्ञानाची सुगमता (शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे,अपेक्षित शिक्षणाची वर्षे)

चांगले राहणीमान (जीएनपी-पीपीपी,आधारभूत वर्ष 2005)

> गुनांकन :
0-1 (0 = अपूर्ण मानव विकास, 1 = पूर्ण मानव विकास )

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम

योजनेची सुरुवात 2 ऑक्टोंबर 1980

योजनेत कार्यवाई 6 वी पंचवार्षिक योजना

लक्ष रोजगार निर्मिती करणे

उद्देश ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगाराच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करण्याबरोबरच गावांमध्ये स्थिर व उत्पादक साधनसामग्री निर्माण करणे त्याचबरोबर ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत  बनवण्यासाठी सामुदायिक परिस्थिती निर्माण करणे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या पन्नास 50% भागीदारीतून लागू करण्यात आला सन 1989 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जवाहर रोजगार योजनेत विलीन करण्यात आला.

________________________________

इंदिरा आवास योजना (IAY)

1985-86 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. एप्रिल 1989 पासून तिची अंमलबजावणी जवाहरलाल रोजगार योजनेचा भाग म्हणून करण्यास सुरुवात झाली. 1 जानेवारी 1966पासून

भारत सरकारने तिला स्वातंत्र्य दर्जा दिला आहे.

या योजेनेअतर्गत अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व मुक्त वेठबिगर या गटांतील दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबीयांना घरे बांधण्यासाठी/सुधारण्यासाठी वित्तीय सहाय्य दिले जाते.

ही केंद्र पुरस्कार योजना असून वित्तीय संसाधनांची विभागणी केंद्र व राज्यांमध्ये 75:25 प्रमाणात केली जाते.पूर्वात्तर राज्यांसाठी हे प्रमाण 90:10 असे आहे.

टिकाऊ पदार्थाची घरे बांधण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल 2010 पासून प्रत्येक घराची किमत प्रत्येकी रु. 45000 इतकी निश्चित केली आहे. राज्य शासनाने ही किंमत प्रत्येकी रु. 70,000 एवढी सुधारित केली आहे.

मूल्यवर्धित करप्रणाली
(Value Added Tax:VAT)

VAT प्रणालीचे प्रतिपादन 1918 मध्ये एफ्. वान. सिमेस यांनी केले.

भारतात VAT ची शिफारस राष्ट्रीय विकास परिषदेने 1956-57 मध्ये केली.

→ 1976 च्या एल. के. झा. समितीच्या शिफारशीनुसार उत्पादन शुल्कासाठी MANVAT पद्धत लागू.

VAT चा मर्यादित प्रमाणावर वापर करणारा पहिला देश : फ्रान्स

संपूर्ण VAT चा वापर करणारा पहिला देश : ब्राझील

वस्तूच्या विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर तिचे मूल्य जेवढ्या प्रमाणात नफ्याचे मार्जिन म्हणून वाढविले जाते तेवढ्या मूल्यवर्धनावरच विक्री कर आकारला जातो. त्यामुळे VAT ला Multi-point
levy Tax' म्हणतात.

_______________________________

🔸जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतातील  गरिबीत अत्यंत १२.३% ने घट

🔹जागतिक बँकेच्या पॉलिसी रिसर्च वर्किंग पेपरनुसार भारतातील अत्यंत गरिबीचा दर 2011 मधील 22.5% वरून 2019 मध्ये 10.2% वर आला. 

🔸हे देशातील 2011 ते 2019 या कालावधीत अत्यंत गरिबीच्या संख्येत 12.3 टक्के घट दर्शवते. 

🔹शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील घसरण खूपच जास्त होती.

🔸ग्रामीण भागातील गरिबीत 14.7 टक्क्यांनी घट झाली आहे, तर शहरी भागातील दारिद्र्य 7.9 टक्क्यांनी घसरले आहे.

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...