Wednesday 12 October 2022

चेतासंस्था


मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System):

मध्यवर्ती चेता संस्था मेंदू आणि चेतारज्जू / मेरुरज्जू यांची बनलेली असते.

मेंदू भोवती कर्पर (Cranium) कवटीच्या हाडांचे संरक्षणात्मक आवरण असते.

चेतारज्जूला कशेरुस्तंभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे संरक्षणात्मक आवरण असते.

मध्यवर्ती चेतासंस्था आणि हाडे यांच्या पोकळीत संरक्षणात्मक आवरण असते त्यांना मस्तिष्कावरण (Meaninges) असे म्हणतात.

मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक स्वरूपाचे असते, म्हणजेच शरीरातील सर्व क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय घडवून आणणे.

2. परिघीय चेतासंस्था (Peripheral Nervous System):

परिघीय चेतासंस्थेमध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या सर्व चेतांचा समावेश होतो.

या चेता शरीरातील सर्व अवयवांना मध्यवर्ती चेतासंस्थेशी जोडण्याचे कार्य करतात.

परिघीय चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक प्रकारचे असते.

मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पार चेता (Cranial Nerves) म्हणतात, तर मज्जारज्जूपासून निघणाऱ्या चेतांना मेरुचेता (Spinal Nerves) म्हणतात.

मानवी शरीरात कर्पार  चेतांच्या (Cranial Nerves) 12 जोड्या तर मेरुचेतांच्या (Spinal Nerves) 31 जोड्या असतात.

3. स्वायत्त चेतासंस्था (Autonomous Nervous System):

स्वायत्त चेतासंस्था हि हृदय, फुप्फुस, जठर इत्यादीं अनैच्छिक अवयवांतील चेतांची बनलेली असते.

मानवी शरीरातील अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य स्वायत्त चेतासंस्था करतात.

उदा. रक्तदाबाचे नियंत्रण, पाचकरस स्त्रावण्याची क्रिया, शरीराचे तापमान.

No comments:

Post a Comment

Latest post

24 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 22 मे प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होण...