Ads

05 April 2022

भारत स्वातंत्र्याचा इतिहास

काश्मीरची समस्या :

काश्मीर संस्थानचा राजा हरीसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते.
 काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होतो.
 यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले.
 ऑक्टोबर 1947 मध्ये तर पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला.
 तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरीसिंगाने स्वाक्षरी केली.
 अशा प्रकारे काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले.
 या लष्कराने काश्मीरचा मोठा भाग घुसखोरांच्या हातून परत मिळवला. काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला.

भारतातून फ्रेंच व पोर्तुगीज सत्ताचे उच्चाटन :

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारताचे काही भाग फ्रान्स व पोर्तुगाल यांच्या ताब्यात होते.
 चंदनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे, याणम यांवर फ्रान्सचे, तर गोवा, दीव व दमण, दादरा आणि नगर हवेली यांवर पोर्तुगालचे आधिपत्य होते.
 तेथील भारतीय रहिवासी भारतात सामील होण्यास उत्सुक होते.
 हे प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावेत अशी मागणी भारत सरकारने केली.
 फ्रान्सने 1949 साली चंदनगरमध्ये सार्वमत घेतले. तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला.
 चंदनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले.
 त्यानंतर फ्रान्सने भारताचे इतरही प्रदेश भारत सरकारच्या हाती सोपवले.

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना

धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.
 विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.
 ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते.
 आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती.
 त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते.
 हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते.
 त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता.
 सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला. अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता.
 स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती.
 पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता.
 संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली.
 रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.

ब्राम्हो समाजाची स्थापना :

त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते.
 हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते.
 हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.
 अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.
 वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
 केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती.
 म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.

दुसरा मुघल सम्राट

#_हुमायूँ

हुमायूँ एक मोगल सम्राट होता. त्याचे नाव नसरुद्दीन हुमायूँ होते. त्यांचा जन्म ६ मार्च १५०८ला झाला होता. त्यांच्या जीवनावर हुमायूँनामा हे पुस्तक प्रसिद्ध आहे, ते त्याची बहीण गुलबदन हिने लिहीले होते. हुमायूँचे भारतावर १५३०-१५४० व १५५५-१५५६ साली शासन होते. त्यांचा मृत्यु २२ फेब्रुवारी १५५६ ला झाला. ते ग्रंथालयात हातात पुस्तके घेऊन चालताना नमाजाची बाग ऐकल्यावर वाकताना पाय अडकून पायऱ्यावरुन कोसळले व ३ दिवसांनी मृत्यु झाला.

मागील
बाबर मुघल सम्राट
१५३०–१५३९
पुढील
शेरशाह सूरी
(दिल्लीचा शाह))
मागील
मुहम्मद आदिल शाह
(दिल्लीचा शाह))
मुघल सम्राट
१५५५–१५५६
पुढील सम्राट अकबर

खिल्जी घराण्याचा कर्तबगार सुल्तान


🔹अल्लाउद्दीन खिलजी

सुलतान अल्लाउद्दीन खिलजी
अधिकारकाळ- १२९० ते १३१६
राज्याभिषेक- १२९६
राजधानी- दिल्ली
पूर्ण नाव- अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजीलख्नौती (बंगाल)
मृत्यू- १३१६ दिल्ली
पूर्वाधिकारी- जलालुद्दीन फिरोझ खिलजी
उत्तराधिकारी- कुतुबुद्दीन मुबारक शाह
राजघराणे- खिलजी

अल्लाउद्दीन खिलजी (मृत्यू: इ.स. १३१६) इ.स.च्या तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर ह्याने कारभार चालवला.

अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीवर राज्य करणाऱ्या खिलजी घराण्यातला दुसरा सुलतान होता. पहिला सुलतान त्याचा काका जलालुद्दीन खिलजी. अल्लाउद्दीनने गादीवर येण्यापूर्वी जलालुद्दीनची २२ ऑक्टोबर १२९६ला हत्या केली होती.

गट - क - 3 एप्रिल पूर्व परीक्षा चालू घडामोडी उत्तरे


1. कोव्हीड- 19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे ?
(1) अरुंधती रॉय
(2) अमर्त्य सेन
(3) जयती घोष🔰
(4) रघुराम राजन

2. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांटस बसविण्यास मंजूरी देण्यात आली. पी.एस.ए. (PSA) चा विस्तार काय आहे ?
(1) प्रेशर स्विंग अॅडसॉर्पशन
(Pressure Swing Adsorption)🔰
(2) प्रेशर स्लिप अॅडजेस्टमेंट
(3) प्रायमरी स्टोअरेज अॅडमिनीस्ट्रेशन
(4) प्रायमरी स्लिप अॅडजेस्टमेंट

3. ए.के.-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेटप्रुफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे ?
(1) बिपीन रावत
(2) वेदप्रकाश मलीक
(3) अनुप मिश्रा 🔰
(4) रंजन मथाई

Que.4 .'माय पॅड माय राईट' या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?
(1) गुजरात
(2) तामिळनाडू
(3) त्रिपुरा🔰
(4) उत्तर प्रदेश

Que. 5.खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे ?
(1) इटली
(2) फ्रान्स
(3) ऑस्ट्रेलिया🔰
(4) स्पेन

Que.6
30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे ?
(1) बांग्लादेश
(2)कॅनडा
(3) भारत
(4) चीन🔰

Que.7 .कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह 'आर्क्टिका एम. प्रोषित केला आहे ?
(1) रशिया🔰
(2) जपान
(3) चीन
(4) जर्मनी

Que. 8.
कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या मास्याला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले ?
(1) आसाम
(2) सिक्किम🔰
(3) ओडीशा
(4) मणिपूर

Que. 9.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यानों का स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?
(1) ऑकुस ( AUKUS)🔰
(2) इन्डपॅक
(3) युसा
(4) यापैकी नाही

Que.10
'द बॅटल ऑफ रेझांग ला' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
(1) संतोष यादव
(2) कुलप्रित यादव🔰
(3) नेहा सिंग
(4) विजयद

11. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(1) इंग्लंड
(2) कॅनडा🔰
(4) फ्रान्स
(3) अमेरिका

12. ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ट्रॅक येथे आहे.
(4) चेन्नई
(1) पुणे
(2) इंदौर🔰
(3) मुंबई

13. कोणत्या राज्याने आय.एल.जी.एम.एस. (ILGMS) नावाचे पोर्टल सुरू केले आहे?
(1) आसाम
(2) ओडीशा
(3) केरळ🔰
4) ओडिशा

14. भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(1) अशोक सिंग
(2)  धुर्ती बॅनर्जी 🔰
(4) दृष्टी धमिजा
(3) स्नेहा अग्रवाल

15. इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?
(1) अमेरिका
(2) ऑस्ट्रेलिया🔰
(3) जर्मनी
(4) इंग्लं



जगातील सर्वात मोठे आणि मातीचे प्रकार व स्थान

* खंड - आशिया

* विस्तारित देश - रशिया

* लोकसंख्येचा देश - चीन

* द्विपसमूह - इंडोनेशिया

* त्रिभूज प्रदेश - सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]

* वाळवंट - सहारा

* महासागर - पॅसिफिक

* द्विपकल्प - अरेबिया

* बेट - ग्रीनलँड

* खंडद्वीप - ऑस्ट्रेलिया

* समुद्र - दक्षिण चिनी समुद्र

* उपसागर - हडसनचा उपसागर

* आखात - मेक्सिकोचे आखात

* नदी व खोरे - अमेझॉनचे खोरे

* पर्वतराजी - हिमालय

* मैदानी प्रदेश - पश्चिम सायबेरिया

* गोड्या पाण्याचे सरोवर - सुपीरिअर

* ज्वालामुखी - मौना लोआ, हवाई बेटे.

* समुद्रभरती - फुंडीचे आखात

* खाऱ्या पाण्याचे सरोवर - कास्पियन समुद्र

* नदी मुख - ऑब नदीचे मुख

* वाळूचे बेट - फ्रेझर आयर्लंड

* लॅगुन - लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील

* अरण्य - सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया

* सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण - कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका

* बंदर - न्यूयॉर्क

* विस्तारित शहर - लंडन

♻️ महत्त्वाचे आहे नक्की वाचा

🔸१) पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर ....
- १४,९६,००,००० कि. मी.

🔹२) प्रकाशाचा प्रतिसेकंद वेग ....
- २,९९,७९२ कि. मी.

🔸३) सूर्यकुलातील सर्वांत लहान, परंतु वेगवान ग्रह
- बुध

🔹४) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठा असलेला .... हा ग्रह सूर्यकुलातील सर्वांत मोठा ग्रह आहे.
- गुरु

🔸५) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठ्या असलेल्यागुरुचे वस्तुमान पृथ्वीच्या .... इतके आहे.
- ३१८ पट

● मातीचे प्रकार व स्थान ●

◆गाळाची मृदा
सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.

◆काळी मृदा
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.

◆तांबडी मृदा
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.

◆वाळवंटी मृदा
राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.

◆गाळाची मृदा
नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.


📚 *स्पर्धा परीक्षा : भूगोल*

स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने भूगोल विषयातील काही महत्वाच्या सागरी संज्ञांविषयी आज आपण माहिती घेऊयात.

▪️सागर :जमिनीने पूर्णः किंवा अंशतः वेढलेल्या खा-या पाण्याचा जलभाग म्हणजे सागर किंवा समुद्र होय.

▪️महासागर : दोन खंडांदरम्यान पसरलेला खा-या पाण्याचा विस्तीर्ण साठा म्हणजे महासागर होय.

▪️उपसागर :सर्वसाधारणपणे जमिनीने तीन बाजूंनी  वेढला गेलेला सागराचा लहान भाग म्हणजे उपसागर होय.

▪️आखात :जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग, म्हणजे आखात होय.

▪️सरोवर : भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरीत्या तयार झालेला जलाशय म्हणजे सरोवर होय.

▪️जलावरण : पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेला भाग, म्हणजे जलावरण होय.

▪️खाडी : समुद्राचे पाणी नदीच्या मुखातून जेथेपर्यंत  नदीत शिरते, त्या नदीच्या भागाला खाडी म्हणतात.

▪️सागरी मैदान :सागरतळाचा सपाट व सखल भाग म्हणजे सागरी मैदान होय.

▪️गर्ता :सागरातील अरुंद व अतिखोल भागास गर्ता म्हणतात.

▪️ सागरी डोह :सागरतळावर काही ठिकाणी खोल,अरुंद आणि तीव्र उतारांची सागरी भूरूपे आढळतात. त्यातील कमी खोलीच्या अरुंद व तीव्र उतारांची सागरी भूरूपे म्हणजे सागरी डोह होय.

इतिहासातील महत्वाची पुस्तके

                                          
📚   माय इंडियन इयर्स -
✍️ लॉर्ड हर्डिंग्ज

📚   वर्तमान रणनीती -
✍️ अविनाश भट्टाचार्य

📚   बॉम्ब पोथी -
✍️ सनापती बापट

📚   गांधीइझम:अॅन अॅनालिसिस -
✍️ फिलीप स्प्रेट

📚  द अवेकनिंग ऑफ इंडिया -
✍️ रम्से मॅकडोनाल्ड

📚  काँग्रेस मिनिस्ट्रीज अॅट वर्क -
✍️ आचार्य जुगलकिशोर

📚  दी वे आऊट, 1943 -
✍️ सी. राजगोपालाचारी

📚  गव्हर्नमेंट ऑफ इंडिया -
✍️ सी.पी. इल्बर्ट

📚  इडियन अनरेस्ट -
✍️ वहॅलंटीन चिरोल

📚   इडिया अॅज आय नो इट -
✍️ मायकेल ओडवायर

📚  भारतीय मुसलमान, इंडिया अंडर ड क्वीन -                                                                                                     ✍️ विल्यम हंटर

📚  ह वेअर दी शुद्रास?, बुद्ध अँड हिस धम्म -
✍️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖                                                

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती आणि महाराष्ट्र - जलाशय व धरणे

जमात                  राज्य

अबोर                  अरुणाचल प्रदेश
आपातनी             अरुणाचल प्रदेश
आओ                  नागाल्यांड
अंगामी                 नागाल्यांड
कोल                   छत्तीसगढ
कोटा                   तामिळनाडू
मुंडा                    झारखंड
कोलाम                आंध्र प्रदेश
छुतीया                आसाम
चेंचू                     आंध्र प्रदेश
गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा                     छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ
बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट                    हिमाचल प्रदेश
लेपचा                  सिक्कीम
वारली                  महाराष्ट्र
चकमा                  त्रिपुरा
गड्डी                     हिमाचल प्रदेश
जयंती                  मेघालय
बोदो                    आसाम
खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया                 त्रिपुरा
मोपला                  केरळ
भुतिया                  उत्तरांचल
जारवा                   छोटे अंदमान
कुकी                    मणिपूर
कुरुख                  झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश
डाफला                अरुणाचल प्रदेश
कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र
हो                       छोटा नागपूर
मुरीया                  बस्तर छोटा नागपूर
संथाल                  वीरभूम,झारखंड
गुज्जर                  हिमाचल प्रदेश
खोंड                     ओरिसा
मिकिर                  आसाम
उरली                  केरळ
मीना                    राजस्थान
ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

❌ 🏊‍♀महाराष्ट्र - जलाशय व धरणे🏊 ❌
----------------------------------------------
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर

9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे


1.त्र्यंबकेश्वर- जिल्हा-- नाशिक

2.घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा ---औरंगाबाद

3.भीमाशंकर- जिल्हा --पुणे

4.परळी वैजनाथ- जिल्हा बीड

5.औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🎯महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा 🎯

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) तेलंगना-गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात – पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

६) गोवा- सिंधुदुर्ग.
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

सराव प्रश्न उत्तरे

1) 2020 या वर्षी कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : स्टॉप द पँडेमीक: सेफ्टी अँड हेल्थ अॅट वर्क कॅन सेव्ह लाईव्ह्ज

2) कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण’ याचे मुख्यालय आहे?
उत्तर : गांधीनगर

3))कोणत्या मंत्रालयाने ‘आयडीयाथॉन’ नावाने कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : जल शक्ती मंत्रालय

4)) GI टॅग प्राप्त झालेले ‘चक-हाओ’ हे काय आहे?
उत्तर : मणीपूरचा काळा तांदूळ

5) कोणत्या संस्थेनी "अतुल्य" नावाचे मायक्रोवेव्ह निर्जंतुकीकरण यंत्र विकसित केले?
उत्तर : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी

6) कोणत्या विभागाने ‘यश’ नावाने एका कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : विज्ञान व तंत्रज्ञान विभाग

7) CSIR याच्या कोणत्या संस्थेनी ‘किसान सभा’ नावाचे अ‍ॅप तयार केले?
उत्तर : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था

8) कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने ‘आयुरक्षा’ कार्यक्रम आयोजित केला?
उत्तर : दिल्ली

9). कोण ‘राष्ट्रीय पायाभूत पाइपलाइन’ संदर्भात नेमलेल्या कृती दलाचे प्रमुख होते?
उत्तर : अतनू चक्रवर्ती

10).कोणता देश जगातला सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी सराव आयोजित करतो?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

11). छत्रपती शाहू महाराजांनी विधवांचा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा ज्या वर्षी केला ते वर्ष निवडा?
A) इ.स १९१८
B) इ.स १९१७
C) इ.स १९१९
D) इ.स १९१६      
Correct Answer A

12). छत्रपती शाहू महाराजांनी आर्य समाजाकडे हस्तांतरित केलेले विद्यालय कोणते?
A) व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूल
B) फर्ग्युसन कॉलेज
C) राजाराम महाविद्यालय
D) वरीलपैकी सर्व
Correct Answer C

13).छत्रपती शाहू महाराजांनी 'महार वतन' ही पद्धत कोणत्या वट हुकूमाद्वारे बंद केली ?
A) २५ जुलै १९१८
B) २४ जुलै १९१८
C) २६ जून १९१८
D) २५ जून १९१८
Correct Answer D

14). गंगाराम कांबळे यांना चहाचे दुकान खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सुरु करून दिले?
A) डॉ. भीमराव आंबेडकर
B) महात्मा फुले
C) राजर्षी शाहू महाराज
D) लोकमान्य टिळक
Correct Answer C

15).१९४७ पूर्वी कोणत्या संस्थानामध्ये नोकऱ्यांसाठी मागास्वर्गी यांना राखीव जागा देण्याची तरतूद केली होती?
A) सातारा
B) कोल्हापूर
C) सोलापूर
D) सांगली
Correct Answer B

16) राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिवस हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
A) महाराष्ट्र दिन
B) लोकशाही दिन
C) राष्ट्रीय एकात्मता दिन
D) सामाजिक न्याय दिन
Correct Answer D

17).शाहू महाराजांचे यांचे निधन कधी झाले?
A) ६ मे १९२२
B) १० मे १९२२
C) ८ मे १९२२
D) ९ मे १९२२
Correct Answer A

18). छत्रपती शाहू महाराज यांना कोणत्या विद्यापीठाने सन्मानाने एल.एल.डी पदवी दिली ?
A) कॅब्रिज विद्यापीठ
B) पुणे विद्यापीठ
C) मुंबई वियापीठ
D) नवी कोलंबिया विद्यापीठ
Correct Answer A

19)राजर्षी शाहू महाराज यांनी शक्तीचे शिक्षण कोणत्या वर्षी कोल्हापूर संस्थानामध्ये सुरु केले ?
A) इ.स. १९१७ ’
B) इ.स. १९१८
C) इ.स. १९१९
D) इ.स. १९१५
Correct Answer A

20) छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?
A) उदय
B) जयसिंगराव
C) यशवंत
D) जयाजीराव
Correct Answer C


🎯QUESTIONS AND ANSWERS  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖                                                            1) अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा.
               प्रकल्प              राज्य
         1) कल्पक्कम    अ) तमिळनाडू
         2) काक्रापार      ब) गुजरात
         3) रावतभाटा    क) महाराष्ट्र
         4) नरोरा         ड) राजस्थान
                             इ) उत्तर प्रदेश
   1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ     
   2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
   3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब     
   4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ

उत्तर :- 1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2) ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या चारही संयुजा एकेरी बंधाने समाधानी असतात ते म्हणजे
   1) संतृप्त हायड्रोकार्बन   
   2) असंतृप्त हायड्रोकार्बन   
   3) विवृत्त हायड्रोकार्बन  
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3) खालीलपैकी कोणत्या संघात बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
   1) मोलुस्का    2) आथ्रोपोडा  
   3) दोन्ही        4) दोन्ही  नाही

उत्तर :- 3 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4) फोटोव्होल्टाइक घटात सौर प्रकाशाचे रूपांतर कोणत्या स्वरूपात होते ?
   1) रासायनिक ऊर्जा   
   2) नैसर्गिक वायू   
   3) विद्युतधारा     
   4) भू – औष्णिक ऊर्जा

उत्तर :- 1 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5) खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते ?
   1) अल्केन       2) अल्कीन  
   3) अल्काइन    4) वरील सर्व
  
उत्तर :- 1.