Friday, 10 June 2022

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच –

   1) धरसोड करणे    2) टंगळमंगळ करणे    3) सोडून देणे    4)  पुढे पुढे जाणे

उत्तर :- 2

2) ‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) परात्म      2) ऐतखाऊ      3) घरकोंबडा    4) एकलकोंडा

उत्तर :- 3

3) खालील शब्दांमधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा.

   1) अमिबा      2) अमीबा      3) अब्मिबा    4) अम्बिमा

उत्तर :- 1

4) खालील स्वर कोणत्या गटात मोडतात ? – अ, आ, इ, ई, उ, ऊ ...............

   1) सजातीय      2) विजातीय      3) संयुक्त      4) –हस्व

उत्तर :- 1

5) खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

   1) कवीश्वर      2) दुरात्मा      3) सज्जन    4) गणेश

उत्तर :- 3

6) योग्य पर्याय निवडा.

   अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
   ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.

   1) अ      2) दोन्ही      3) ब      4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

7) ‘सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमाने वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.

   1) भाववाचक    2) सामान्यनाम    3) क्रियावाचक    4) धातुसाधित

उत्तर :- 1

8) सर्वनामाचे एकूण मूळ ............ प्रकार पडतात. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा.

   1) नऊ    2) तीन      3) चार      4) सात

उत्तर :- 1

9) ‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे ?

   1) सर्वनाम साधित विशेषण    2) धातुसाधित विशेषण
   3) अव्ययवसाधित विशेषण    4) नामसाधित विशेषण

उत्तर :- 4

10) ‘तू एवढया भाकरी कराव्यात’ – या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.

   1) आख्यात    2) वाख्यात    3) ताख्यात    4) लाख्यात

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

22 मे 2023 रोजी आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस साजरा केला जातो.

◆ प्रत्येक वर्षी 22 मे रोजी, पृथ्वीच्या विविध परिसंस्थेची समज वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक जैविक विविधतेचा दिवस म्ह...