Friday 9 July 2021

मिल्खा सिंग यांची कारकीर्द

 


- मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेबर 1929 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. 

- मिल्खा सिंग भारतीय सैन्यातही कार्यरत होते, त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले खेळ सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. 

- आशियातील सर्वश्रेष्ठ खेळाडूत यांची गणना केली जाते. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.

- सिंग यांनी 1958 टोकियो येथे आयोजित आशियाई खेळ स्पर्धेत 400 मीटर मध्ये सुवर्ण पदक जिंकले.

- 1958 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 200 आणि  400 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी. 

- 1958 मध्ये इंग्लंडमधील कार्डिफ येथे आयोजित तत्कालिन ब्रिटीश साम्राज्य आणि राष्ट्रमंडल खेळात ऐतिहासिक 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी ही त्यांची विशेष कामगिरी आहे. 

- राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण तर एका सिल्व्हर पदकाची कमाई, कटक (200 मीटर सुवर्ण 1958), कटक (400 मीटर सुवर्ण 1958) आणि कलकत्ता (400 मीटर सिल्व्हर 1964)

- आशियाई स्पर्धेत चार वेळा सुवर्णपदक विजेते, टोकियो (200 मीटर 1958), टोकियो (400 मीटर 1958), जकार्ता (400 मीटर 1962) आणि जकार्ता (4 × 400 मीटर रिले 1962)

- ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, मेलबर्न (1956), रोम (1960) आणि टोकियो (1964). 

- 1960 च्या रोम ऑलिंपिकमध्ये स्पर्धेत 0.1 सेकंदाच्या फरकामुळे मिल्खाजी पदक जिंकू शकले नव्हते पण 400 मीटर धावण्यातील यांचा वेळ 38 वर्षापर्यंत राष्ट्रीय विक्रम राहिला होता, जो 1998 मध्ये पराजित सिंग यांनी मोडला.

- मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून 46.6 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर 200 मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ 21.6 सेकंदात पूर्ण केली. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.

- 1962 मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर आणि 4×400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. 

- पाकिस्तानमध्ये एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानचा खेळाडू अब्दुल खालिक याचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी राष्ट्रपती जनरल आयुब खान यांनी मिल्खा सिंग यांना फ्लाईंग सिख या नावाने गौरविले. 

- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मिल्खा सिंग यांचा विक्रम 50 वर्षांहून अधिक काळ कायम राहिला होता. 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कृष्णा पूनियाने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकून हा विक्रम मोडित काढला.

- भारताचे प्रसिद्ध गोल्फपट्टू जीव मिल्खा हे मिल्खा सिंग यांचे पुत्र आहेत.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...