Sunday 10 April 2022

सामान्य ज्ञान


❇️❇️केरळमध्ये देशातले पहिले ‘जेंडर डेटा हब’ उभारले जाणार❇️❇️

⭕️यूएन विमेन या संघटनेच्या मदतीने देशातले पहिले ‘जेंडर डेटा हब’ याची स्थापना करण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे.

⭕️‘जेंडर डेटा हब’ म्हणजे यूएन विमेन या संघटनेच्यावतीने महिला सशक्तीकरणासाठी चालविले जाणारे उपक्रम राबविण्यासाठी उपलब्ध असलेले स्थायी ठिकाण होय.

⭕️‘जेंडर डेटा हब’चे कार्यक्षेत्र दक्षिण आशिया पुरता निश्चित केले गेले आहे. म्हणजेच त्याठिकाणी दक्षिण आशियातल्या महिलांसाठीच्या जेंडर पार्कसाठी क्षमता-निर्मिती आणि प्रकल्प विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची रचना केली जाणार.

🔴केरळमधले जेंडर पार्क

⭕️केरळमध्ये स्त्री-पुरुष समानता आणि सशक्तीकरणाच्या दिशेने कार्य करण्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकाराने 2013 साली जेंडर पार्कची स्थापना करण्यात आली.

⭕️ते संशोधन, धोरण विश्लेषण, क्षमता विकास, पुरस्कार, सामाजिक आणि आर्थिक उपक्रम राबविण्याचे एक व्यासपीठ आहे.
ते स्त्री-पुरुष समानतेसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यामध्ये मदत करण्यास संबंधित हस्तक्षेप तयार करण्यासाठी कार्य करते.
यूएन विमेन विषयी

⭕️‘युनायटेड नेशन्स एंटिटी फॉर जेंडर इक्वलिटी अँड द एम्पोवेरमेंट ऑफ विमेन’ किंवा ‘यूएन विमेन’ ही जागतिक पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची एकी संघटना आहे. त्याची स्थापना 2 जुलै 2010 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर (अमेरिका) येथे आहे.


____________________________________

🦋🦋देशातील गुणवत्ताधारक परराष्ट्रांच्या सेवेत.🦋🦋

🧩नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गेल्या २० वर्षांतील उच्च गुणवत्ताधारक (टॉपर्स) सध्या कुठे आहेत, असा प्रश्न कुणाला पडला असेल तर त्याचे उत्तर, ‘‘त्यापैकी निम्म्याहून अधिक परदेशात विविध महत्त्वाच्या पदांवर आहेत,’’ असे मिळते.

🧩कोणी न्यू यॉर्कमध्ये कर्करोगतज्ज्ञ आहे, कोणी जगप्रख्यात मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) पीएचडी फेलो आहे, कोणी हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहे, तर कोणी सिंगापूरमध्ये निधी व्यवस्थापक आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ११ गुणवत्ताधारक ‘गुगल’मध्ये कार्यरत आहेत.

🧩‘सीबीएसई’ आणि ‘सीआयएससीई’ या केंद्रीय शिक्षण मंडळांनी १९९६ ते २०१५ या काळात घेतलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांत देशात प्रथम आलेल्या ८६ विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केले. त्यातील हे निष्कर्ष आहेत.

🧩निम्म्याहून अधिक उच्च गुणवत्ताधारक सध्या परदेशात वास्तव्य करीत आहेत आणि अमेरिका हे त्यांनी निवडलेले ठिकाण आहे. त्यापैकी बहुतेकजण आयआयटीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान पदवीधारक आहेत. त्यांच्यापैकी निम्मे गुणवत्ताधारक हे महानगरांबाहेर वाढलेले आहेत. त्यापैकी एक अल्पसंख्यांक समाजातील आहे, परंतु त्यांत दलित आणि आदिवासींमधील एकाचाही समावेश नाही. विशेष म्हणजे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींना परदेशात जाण्याची संधी कमी मिळते.



_________________________________

🌺🌺जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई .🌺🌺

🦋यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी आणि मौर्य अशा विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स एसयूव्ही, कार, मोटरसायकल आणि अन्य गाड्यांच्या नंबर प्लेटसवर लावले जातात. त्यातून एक प्रकारचं सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न  दिसतो.

🦋पण आता उत्तर प्रदेशच्या वाहतूक विभागाने  अशा प्रकारे नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगणाऱ्या गाड्यांवर कारवाई सुरु केली आहे.

🦋तर पंतप्रधान कार्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतर वाहतूक विभागाने हे पाऊल उचलले आहे.

🦋तसेच उत्तर प्रदेशत आता जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्या जप्त करण्यात येणार आहेत.

______________________________

🌹🌹ICC च्या संघात भारतीयांचा बोलबाला.🌹🌹

🔷आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. दशकातील सर्वोत्तम 11 खेळाडूंची आयसीसीनं निवड केली आहे.

🔷तर अभिमानाची बाब म्हणजे या तिन्ही संघाचं नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे आहे.
एकदिवसीय आणि टी-20 संघाचं कर्णधारपद धोनीकडे सोपवण्यात आलं आहे. तर कसोटी संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली आहे.

🔷तसेच तिन्ही संघामध्ये स्थान पटकावणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे. विराट कोहलीला टी-20, एकदिवसीय आणि कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे.


_______________________________

💢💢भारतातला पहिला लिथियम शुद्धीकरण कारखाना गुजरातमध्ये उभारला जाणार💢💢

☄बॅटरी निर्मितीत उपयोगात येणाऱ्या लिथियम धातूच्या शुद्धीकरणासाठी भारतातला पहिला लिथियम शुद्धीकरण कारखाना गुजरात राज्यात उभारला जाणार आहे.

☄त्याठिकाणी बॅटरीच्या कार्यक्षतेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या गुणवत्तेची सामुग्री तयार करण्यासाठी लिथियम धातूवर प्रक्रिया केली जाणार आहे.
लिथियम बॅटरी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा करण्यास त्या प्रकल्पाची मदत होणार आहे, ज्यामुळे विजेरी वाहनांच्या उत्पादनाला चालना मिळणार.
प्रकल्पाला लागणारे लिथियम धातुक ऑस्ट्रेलियाकडून आयात केले जाणार आहे.
लिथियम हा एक दुर्मिळ घटक आहे, जो सहसा भारतात आढळत नाही. वर्तमानात भारत चीनकडून लिथियम आयन बॅटरी आयात करतो.

☄चीन, हाँगकाँग आणि व्हिएतनाम हे लिथियमचे अग्रगण्य आयातदार आहेत. जगात लिथियमच्या उत्पादनात ऑस्ट्रेलिया (52.9 टक्के) अव्वल ठरतो. त्याच्यापाठोपाठ चिली (21.5 टक्के), चीन (9.7 टक्के), अर्जेन्टिना (8.3 टक्के), झिम्बाब्वे (2.1 टक्के) या देशांचा क्रम लागतो.

❄️नव्या वर्षात देशासाठी हा संकल्प करा; पंतप्रधान मोदी यांचं देशवासीयांना आवाहन.❄️

🍀पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत जनता कर्फ्यू, करोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भारतात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात असं म्हणत उद्योगपतींनी पुढे येण्याचं आवाहन केलं. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांना नव्या वर्षानिमित्त संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे.

🍀वर्षाच्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले,”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असं मोदी म्हणाले.

🍀पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत ‘व्होकल फॉर लोकल’वर जोर दिला. मोदी म्हणाले,”व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचं आहे.

🍀प्रत्येकजण नव्या वर्षात काही संकल्प करतो. यावेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्यक करावा,” असं आवाहन मोदी यांनी केलं आहे. “देशाच्या सन्मानार्थ सामान्य माणसांमध्ये झालेले बदल आपण अनुभवले आहेत. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही बघितला आहे. असंख्य आव्हानं होती, संकटं पण आले. करोनामुळे जगभरात पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या. पण भारतानं प्रत्येक संकटात नवीन गोष्टी आत्मसात केल्या,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...