Friday 11 October 2019

अवकाश, खगोल संशोधनासाठी ‘सितारा’ प्रकल्प

◾️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयुकाचा पुढाकार

◾️ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आंतरविद्यापीठ खगोल आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) यांनी पुढाकार घेऊन ‘सितारा’  या प्रकल्पाची सुरुवात केली आहे.

◾️आगामी काळातील अवकाश आणि खगोल प्रकल्पातील संशोधनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

◾️सितारा (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-आयुका प्रशिक्षण आणि संशोधन सहकार्य) या प्रकल्पाचे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय विज्ञान प्रशालेत सोमवारी उद्घाटन झाले.

◾️गेल्याच आठवडय़ात विद्यापीठ आणि आयुका यांनी संयुक्त संशोधन प्रकल्प, नवीन अभ्यासक्रम यांसाठी सामंजस्य करार करण्यात आला

◾️या कराराअंतर्गत विद्यापीठाच्या
  📌भौतिकशास्त्र,
  📌इलेक्ट्रॉनिक्स,
  📌तंत्रज्ञान,
  📌 अवकाश विज्ञान आणि
  📌 उपकरणशास्त्र या पाच विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसह आयुका काम करणार आहे.

◾️लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्सर्वेटरी (लिगो) या आंतरराष्ट्रीय प्रकल्पासह इस्रोच्या आदित्य १ या सूर्यमोहिमेतही आयुकाचा सहभाग आहे.

◾️या पाश्र्वभूमीवर, विद्यापीठ आणि आयुका यांनी संयुक्त प्रकल्प हाती घेतला आहे.

◾️आगामी काळात सितारा अंतर्गत पेलोड इंटिग्रेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

◾️त्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर विद्यार्थी छोटे उपग्रह तयार करू शकतील. मात्र, या सेंटरची कल्पना अद्याप प्राथमिक स्तरावर असून, त्यासाठी विविध प्रकारच्या परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत.

◾️केंद्र सरकारच्या ज्ञान समूह प्रकल्पासाठी (नॉलेज क्लस्टर प्रोजेक्ट) पुण्याच्या निवडीची बैठक प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजयराघवन यांच्या उपस्थितीत झाली.

No comments:

Post a Comment

Latest post

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...