Friday 15 March 2024

भारताची राज्यघटना मधील महत्त्वाचे ६० प्रश्न

१).  राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यीत होतात ?

   अ) कलम – 73 
   ब) कलम – 74   
  क) कलम – 76 
  ड) कलम – 78

   1) अ, ब आणि क 
  2) ब, क आणि ड   
  3) अ, ब आणि ड   
4) ब आणि ड केवळ

  उत्तर :- 4

२).  भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते.

     इंग्लंडमध्ये मात्र :
   अ) प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी असते.

   ब) राजाला न्यायालयात नेता येत नाही कारण “राजा चुक करू शकत नाही.”
        वरील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   1) अ  
   2) ब  
   3) दोन्ही  
   4) एकही नाही

उत्तर :- 3

३). भारताच्या महान्यायवादींसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

   अ) त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही.

   ब) भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.

   क) त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब   
   2) फक्त ब  
   3) ब आणि क   
   4) अ आणि क

   उत्तर :- 1

४). खालील बाबींचा विचार करा.

   अ) भारतीय संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.

   ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने  दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही.

   1) अ व ब दोन्ही बरोबर आहेत.
   2) ब बरोबर व अ चूक आहे.
   3) अ बरोबर व ब चूक आहे.  
   4) अ व ब दोन्ही चूक आहेत.

    उत्तर :- 2

५) . महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणा-या सदस्यांची एकूण सदस्य संख्या ........................ आहे.

   1) 288 
   2) 19   
   3) 48    
   4) 67

   उत्तर :- 4

६). खालील विधाने लक्षात घ्या.

   अ) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहित आहे.

  ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही.

   क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे.

         भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत  ?

   1) अ, ब  
  2) ब, क    
  3) अ, क    
  4) वरील सर्व

   उत्तर :- 3

७) . राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रीपरिषद असते व राष्ट्रपती त्या सल्ल्यानुसार कार्ये पार पाडतात.

   अ) राष्ट्रपती मंत्रीपरिषदेस सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकत नाहीत.

   ब) मंत्रीपरिषदेने सल्ला दिला होता काय याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

   क) संसदेचा सदस्य राहण्यास अनर्ह ठरल्यास व सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने निवडणूक लढविल्यास तो निवडून आल्याचे घोषित होईपर्यंत तो मंत्री म्हणून राहू शकेल.

   1) अ व ब योग्य  
   2) अ, क योग्य 
   3) ब व क योग्य
   4) तिन्ही अयोग्य

    उत्तर :- 4८) . खालील विधाने विचारात घ्या .

   अ) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही.

   ब) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या  प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.

   1) विधान अ बरोबर, ब चुक

   2) विधान अ चुक, ब बरोबर

   3) दोन्हीही विधाने चुकीची 

  4) दोन्हीही विधाने बरोबर

   उत्तर :- 4

९). भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत ?

   अ) मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरीत्या जबाबदार असते.

   ब) प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरीत्या उत्तरदायी नसतो.

   क) पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते.

   ड) अल्पसंख्यांकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात.

   1) अ, ब आणि क   
   2) अ आणि क  
  3) ब आणि ड   
  4) ब, क आणि ड

  उत्तर :- 3

१०) . भारताच्या ॲटर्नी जनरल संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत  ?

   अ) ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात.

   ब) ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात.

   क) ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात.

    1) वरील सर्व विधाने सत्य आहेत.
    2) फक्त अ सत्य आहे.
    3) कोणतेही विधान सत्य नाही.
    4) फक्त अ आणि ब सत्य आहेत.

    उत्तर :- 4

११).  जोडया लावा.

   अ) मूलभूत अधिकार      i) जर्मनीचे वायमर संविधान

   ब) निती निर्देशक तत्वे      ii) कॅनडाचे संविधान

   क) केंद्र सरकारला उर्वरित अधकार    iii) आयरिश संविधान

   ड) आणीबाणी        iv) अमेरिकेचे संविधान

  अ  ब  क  ड

         1)  iv  i  iii  ii
         2)  iv  iii  i  ii
         3)  iv  iii  ii  i
         4)  I  iii  iv  ii

        उत्तर :- 3

१२) भारतीय संविधानाची वैशिष्टये आणि त्यांच्या स्त्रोतांच्या योग्य जोडया लावा.

   अ) एकेरी नागरिकत्व    i) ब्रिटीश राज्यघटना

   ब) मूलभूत हक्क      ii) फ्रान्स राज्यघटना

   क) स्वातंत्र्य, समता, बंधुता  iii) कॅनेडियन राज्यघटना

   ड) उर्वरित अधिकार    iv) अमेरिकेची राज्यघटना
  अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii
         2)  i  iv  ii  iii
         3)  iii  i  iv  ii
         4)  i  iii  iv  ii

     उत्तर :- 2

१३). राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?

   1) बिहार 
   2) केंद्रीय प्रांत 
   3) बाँम्बे    
   4) पंजाब

   उत्तर :- 2

१४) . सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा .

   अ) समतेचे तत्व  
   ब) स्वातंत्र्याचे तत्व  
   क) संघराज्य  
   ड) समाजवादी संरचना
   इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार 
  फ) धर्मनिरपेक्षता

   1) अ, ब, क, ड, इ, फ 
   2) अ, क, इ, फ  
   3) अ, ब, क, ड, फ 
   4) अ, ब, क, इ, फ

    उत्तर :- 2

१५) खालील विधानांचा विचार करा.
   अ) डॉ. बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

   ब) श्री. एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.

   1) ब बरोबर आहे 
   2) अ बरोबर आहे   
   3) दोन्ही बरोबर आहेत
   4) दोन्ही चूक आहेत

    उत्तर :- 2

१६) .भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते ?

   1) विधानसभा, विधानपरिषद, राज्यपाल

    2) राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा

   3) विधानसभा, राष्ट्रपती, राज्यपाल

   4) राज्यसभा, विधानपरिषद, लोकसभा

   उत्तर :- 2

१७) . राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ...................... अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.

   1) तीन 
   2) दोन   
   3) चार  
   4) पाच

उत्तर :- 2

१८) . सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पध्दतीचे विधिमंडळ असते ?

     1) व्दिगृही   
      2) एकगृही   
      3) बहुगृही
      4) यापैकी नाही

      उत्तर :- 1

१९) . संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर .....................  महिन्यांपेक्षा कमी असावे.

   1) दोन   
   2) तीन   
   3) चार   
   4) सहा

   उत्तर :- 4

२०) . दोन्ही विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा :

   अ) 1976 सालच्या एक घटनादुरुस्तीव्दारे मतदार संघांची पुनर्रचना 2001 च्या जणगणनेपर्यंत तहकूब करण्यात आली.

   ब) परिसिमन आयोगाद्वारे 2003 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या मतदार संघामध्ये 2004 सालच्या सार्वत्रिक निवडणूका पार  पडल्या.

   1) दोन्ही विधाने चुकीची आहेत. 

   2) विधान (अ) चुकीचे आहे.

   3) विधान (ब) चुकीचे आहे.   

   4) दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि         (ब) हा (अ) चा परिणाम आहे.

उत्तर :- 3

२१) संसदेकडे खालीलपैकी कोणाला पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत ?

   अ) महालेखापाल 

  ब) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

   क) मुख्य निवडणूक आयुक्त 

   ड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

   1) अ, ब, क आणि ड   
   2) अ, ब आणि ड  
   3) अ, ब, क  
   4) अ, क आणि ड

उत्तर :- 1

२२) महिलांच्या लोकसभेतील प्रतिनिधीत्वासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

   अ) पहिल्या लोकसभेत केवळ 4.4% महिला सदस्या होत्या.

   ब) 16 व्या लोकसभेत त्या सहापट वाढल्या आहेत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे/ त  ?

   1) अ    
   2) ब    
   3) अ, ब   
   4) यापैकी नाही

    उत्तर :- 1

२३) पुढीलपैकी कोणत्या राज्यांची लोकसभेच्या जागांमध्ये एक जागा निर्धारित करण्यात आली आहे.

   अ) मिझोराम  
   ब) नागालँड   
   क) त्रिपुरा  
   ड) सिक्कीम
   इ) गोवा 
  फ) चंदीगढ   
  ज) मणीपूर

   1) अ, ब, क, ड, इ
   2) अ, ब, ड, फ 
   3) अ, ब, ड  
   4) ब, क, ड, ज

   उत्तर :- 3

२४). लोकसभेविषयी कोणती विधाने  सत्य आहेत ?

   अ) ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे.

   ब) केवळ तिलाच केंद्रपातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे.

   क) ती सर्वस्वी सार्वभौम आहे.

   ड) ती जनतेला उत्तरदायी आहे.

   1) अ आणि ब  
   2) ब, क आणि ड  
   3) अ, ब आणि ड
   4) अ आणि ड

   उत्तर :- 4

२५). बिनविरोध निवडून येणा-या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण  ?

   1) विजयालक्ष्मी पंडित
   2) इंदिरा गांधी   
   3) शीला दक्षित  
   4) मीरा कुमार

   उत्तर :- 4

२६).  देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.

   1) राज्य विधिमंडळ 
   2) कार्यकारी मंडळ  
   3) संसद 
   4) न्यायमंडळ

    उत्तर :- 3

२७) सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.

   1) संसद सदस्य    
   2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
   3) विद्यापीठाचे कुलगुरू
   4) चौकशी आयोगाचे प्रमुख

उत्तर :- 1

२८) घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर  होऊ शकते ?

   1) 2016 
   2) 2021   
   3) 2026   
   4) 2031

    उत्तर :- 3

२९) .  विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
     कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

   1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.

   4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर
आहे.

उत्तर :- 2

३०) .  राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

   1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा

   2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा

   3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला

   4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

    उत्तर :- 1

३१).  खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ?

   1) घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली.

   2) 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली.

   3) 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली.

   4) राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्षे 11 महिने 17 दिवस म्हणजे जवळपास तीन वर्ष लागले.

उत्तर :- 1

३२).  भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते ?

   1) डॉ. राजेंद्र प्रसाद   
   2) डॉ. बी. आर. आंबेडकर
   3) जे.बी. कृपलानी 
   4) सरदार वल्लभभाई पटेल

    उत्तर :- 1

३३).  संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ............ च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले ?

   1) अमेरिका  
   2) ऑस्ट्रेलिया 
   3) जर्मनी  
   4) फ्रान्स

   उत्तर :- 2

३४) . भारतीय संविधान हे “भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल” असे कोणी म्हटले ?

   1) पंडित नेहरू
   2) मान्वेंद्रनाथ रॉय
   3) महात्मा गांधी 
   4) डॉ. आंबेडकर

   उत्तर :- 3

३५).  खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्टये आहे ?

   1) भारत धार्मिक राज्य आहे 
   2) भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे
   3) भारत भांडवलशाही राज्य आहे                          
   4) भारत सर्वकषवादी राज्य आहे

   उत्तर :- 2
३६) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारुपाचे अनुकरण केले आहे.

   ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.

   क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.

         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) फक्त अ   
   2) अ व ब 
  3) अ व क 
  4) अ, ब आणि क

उत्तर :- 2

३७) खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मुलभूत वैशिष्टये समजता येतील ?

   अ) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व 
   ब) न्यायालयीन पुनर्विलोकन
   क) कल्याणकारी राज्य 
    ड) घटनादुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार

     1) अ, ब, क 
     2) अ, ब
     3) अ, ब, ड
     4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4

३८) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

      1) पंडित जवाहरलाल नेहरू
     2) सच्चिदानंद सिन्हा
     3) डॉ. राजेंद्र प्रसाद 
    4) डॉ. बी. आर. आंबेडकर

    उत्तर :- 4

३९) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

     1) डॉ. बी. आर. आंबेडकर
     2) डॉ. राजेंद्र प्रसाद
     3) जवाहरलाल नेहरू
     4) बी. एन. राव

उत्तर :- 4

४०). संघीय शासन व्यवस्थेमध्ये  ?

      1) सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते

      2) सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते

     3) यामध्ये केवळ एकच सरकार असते

   4) यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात

उत्तर २

४१).  भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ?

   1) डॉ. राजेंद्र प्रसाद 
   2) डॉ. बी. आर. आंबेडकर   
   3) जे. बी. कृपलानी   
  4) सरदार वल्लभभाई पटेल

   उत्तर :- 1

४२) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ........... च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले ?

   1) अमेरिका 
   2) ऑस्ट्रेलिया 
   3) जर्मनी  
   4) फ्रान्स

   उत्तर :- 2

४३) भारतीय संविधान हे “भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल” असे कोणी म्हटले ?

   1) पंडित नेहरू 
  2) मान्वेंद्रनाथ रॉय 
  3) महात्मा गांधी  
  4) डॉ. आंबेडकर

   उत्तर :- 3

४४) खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्टये आहे ?

   1) भारत धार्मिक राज्य आहे
  
  2) भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे

   3) भारत भांडवलशाही राज्य आहे  
 
4) भारत सर्वंकषवादी राज्य आहे

  उत्तर :- 2

४५).  खाली दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्टये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडा ?

   अ) कॅबिनेट व्यवस्था – फ्रान्स 
'   ब) मूलभूत हक्क – सोव्हिएत युनियन
   क) उर्वरित अधिकार – ऑस्ट्रेलिया            ड) मार्गदर्शक तत्वे – जर्मनी

   1) अ आणि ब बरोबर, तर क आणि ड चूक आहेत

   2) अ, क, ड बरोबर, तर ब चूक आहे

   3) सगळे चूक आहेत

   4) क आणि ड बरोबर, तर अ आणि ब चूक आहेत

उत्तर :- 3

४६). खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या ?

   अ) विजया लक्ष्मी पंडीत
    ब) सुब्बलक्ष्मी 
    क) सुचेता कृपलानी  
    ड) सरोजीनी नायडू

   1) अ आणि ब केवळ 
   2) अ, क आणि ड  
   3) ब, क आणि ड    
   4) अ, ब आणि ड

    उत्तर :- 2

४७). भारतातील राष्ट्रपतींव्दारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?

   1) कॅनडा   
   2) ऑस्ट्रेलया  
   3) यू.एस.ए    
   4) वरीलपैकी एकही नाही

    उत्तर :- 1

४८.) भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) संसदीय लोकशाही – ब्रिटीश राज्यघटना    

ब) संघराज्य – अमेरिकेची राज्यघटना

   क) मार्गदर्शक तत्वे – आयर्लंडची
राज्यघटना    

ड) सामायिक सूची – ऑस्ट्रेलियाची

राज्यघटना आता बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.

   1) अ एकमेव बरोबर आहे. 

    2) अ आणि ब बरोबर आहेत.

   3) अ, ब आणि क बरोबर आहेत.  

    4) सर्व बरोबर आहेत.

    उत्तर :- 4

४९).  राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे .

   अ) एकेरी न्यायव्यवस्था  

   ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता

   क) समान अखिल भारतीय सेवा

   1) अ, क   
   2) अ, ब  
   3) ब, क   

   4) वरील सर्व

     उत्तर :- 4

५०). योग्य जोडया लावा.
  तरतूदी        स्त्रोत
         अ) कायद्याचे राज्य    i) ऑस्ट्रेलिया
         ब) घटनादुरस्ती प्रक्रिया  ii) इंग्लंड
         क) समवर्ती सूची    iii) दक्षिण आफ्रिका

     अ  ब  क
         1) ii  iii  i
         2) i  ii  iii
         3) iii  ii  i
         4) iii  i  ii

         उत्तर :- 1

५१) .  भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्या मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?

   1) सत्ता विभाजन 
   2) पक्षविरहीत लोकशाही   
   3) न्यायालयीन स्वातंत्र्य 
   4) लोकशाही विकेंद्रीकरण

   उत्तर :- 4

५२) .   संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते ?

   अ) संयुक्त राज्य अमेरिका 
   ब) यू.एस.एस. आर
   क) चीन प्रजासत्ताक 
   ड) ऑस्ट्रेलियाचे सरकार

   1) अ, ब, ड 
  2) अ, क, ड 
  3) अ, ब, क  
  4) ब, क, ड

  उत्तर :- 2

५३).   जोडया लावा. (संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष)

   अ) संघ अधिकार समिती      i) जे.बी. कृपलानी 

   ब) वित्त व स्टाफ समिती      ii) एच.सी. मुखर्जी

   क) अल्पसंख्याक उपसमिती    iii) राजेंन्द्र प्रसाद

   ड) मुलभूत अधिकार उपसमिती    iv) जवाहरलाल नेहरु

  अ  ब  क  ड

         1)  i  iv  ii  iii
         2) i  ii  iii  iv
         3) iv  iii  ii  i
         4) iv  ii  iii  i

उत्तर :- 3

५४).  कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?

   1) शीख 
  2) ख्रिश्चन  
  3) अनुसूचित जाती  
  4) अनुसूचित जमाती

   उत्तर :- 1

५५) . संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती  जुळत नाही  ?

  समित्या      अध्यक्ष
         1) सुकाणू समिती         -   डॉ. राजेंद्र प्रसाद

         2) कामकाज समिती         -   के.एम. मुन्शी

         3) मुलभूत हक्क उपसमिती -  जे.बी. कृपलानी

         4) अल्पसंख्याक उपसमिती -  मौलाना अबुल कलाम आझाद

उत्तर :- 4

५६) . भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा.

   अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी

   ब) एकात्म न्यायसंस्था

   क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा

   ड) एकेरी नागरिकत्व

        वरील विधानापैकी कोणते बरोबर आहे/ आहेत ?

   1) अ   
   2) अ, ब   
   3) अ, ब, क
   4) सर्व

   उत्तर :- 4

५७).  भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा :

   अ) संघराज्याची दुय्यम वैशिष्टये  असलेले एकात्म राज्य          i) सर आयव्हर जेनिंग्ज

   ब) पूर्णपणे संघराज्यही नाही पूर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हींचा संयोग असलेले    ii) ग्रॅनव्हीले ऑस्टीन

   क) प्रबळ केंद्रिकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य            iii) दुर्गा दास बसु

   ड) एकात्म किंवा अद्भूत प्रकारचे संमिश्र राज्य              iv) के.सी. व्हिअर

  अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii
         2)  i  ii  iii  iv
         3)  iii  iv  ii  i
         4)  ii  i  iv  iii

         उत्तर :- 1

५८) .  घटना समितीमध्ये ब्रिटीश भारतातील, चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते ?

   1) 290 – ब्रिटीश भारत, 6 – चीफ कमिशनर प्रांत, 93 – भारतीय संस्थाने

   2) 292 – ब्रिटीश भारत, 4 – चीफ कमिशनर प्रांत, 93 – भारतीय संस्थाने

   3) 296 – ब्रिटीश भारत, 4 – चीफ कमिशनर प्रांत, 89 – भारतीय संस्थाने

   4) 296 – ब्रिटीश भारत, 6 – चीफ कमिशनर प्रांत, 87 – भारतीय संस्थाने

उत्तर :- 2

५९)  ‘कॅबिनेट मिशन योजना’ संदर्भात जुळणी करा :

   अ) निवडावयाची एकूण सदस्य संख्या  i) 292

   ब) संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी    ii) 4

   क) उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी    iii) 93

   ड) प्रांतांचे प्रतिनिधी      iv) 389
  अ  ब  क  ड
         1)  iv  iii  ii  i
         2)  i  ii  iii  iv
         3)  ii  i  iv  iii
         4)  iii  iv  i  ii

      उत्तर :- 1

६०).  राज्यघटनेच्या मसुद्यावर ‘वकिलांचे नंदवन’ अशी टिका केली जाते, त्याची कारणे अशी आहेत.

   1) मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांनाच परिचित आहे.

   2) तरतुदीमागील ध्वन्यर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीलाच समजू शकतो.

   3) मसूदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात.

   4) मसुदा समितीतील सातपैकी तीन सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते.
    
   वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...