Sunday, 12 March 2023

राज्यघटनेविषयी महत्वाची माहिती :

भारतीय राज्यघटनेची निर्मिती :

 

कॅबिनेट मिशन योजने प्रमाणे जुलै 1946 मध्ये प्रांतिक कायदेमंडळातर्फे संविधान सभा निर्माण झाली. ही संविधान सभा सार्वभौम नव्हती. मात्र 14 ऑगस्ट 1947 मध्ये ती सार्वभौम झाली.

प्रा. एन. श्रीनिवासच्या मते भारतीय संविधान 1935 च्या कायद्याची पुनरावृत्ती आहे.

भारतीय संविधानने अंतिम सत्ता जनतेला दिली आहे.

घटना समितीची निर्मिती 6 डिसेंबर 1946 रोजी झाली.

घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी तात्पुरते अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

घटना समितीमधील प्रमुख सदस्य - डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर. बॅ. जयकर, कन्हैयालाल मुन्सी, गोविंद वल्लभ पंत, हंसाबेन मेहता, सरोजीनी नायडू, राजकुमारी अमृता कौर.

22 जानेवारी 1947 रोजी पंडित नेहरूंनी घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली.

29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन झाली.

मसुदा समितीचे सदस्य - के.एम. मुन्सी, गोपाल अय्यंगार, डी.सी. खेतान, एन. माधवराव, मोहम्मद सादुल्ला, अल्लादी कुलस्वामी अय्यर.

भारतीय राज्यघटना लिहिण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. (1082 दिवस)

घटना निर्मितीचा खर्च = 63 लाख 96 हजार 729 रु.

22 जुलै 1947 रोजी भारताने तिरंगी झेंडा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने राज्यघटना स्वीकार केली.

26 जानेवारी 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.  

भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :


जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.

अतिशय लांबलचक व क्लिष्ट अशा स्वरूपाची आहे.

या राज्यघटनेत कलम - 395, प्रकरण - 22, परिशिष्ट - 8, व जोडपत्र - 1 अशी सुरूवातीस स्थिती होती.

1985 मध्ये कलम 395 प्रकरण - 22, परिशिष्ट - 12, जोडपत्र अशी स्थिती होती.

एक प्रधान पक्ष व बहुपक्ष पद्धती.

मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वे याची तरतूद.

निधर्मी राष्ट्राची कल्पना आहे.

स्वतंत्र्य न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे.

एकेरी नागरिकत्व आहे.

संसदीय शासनपद्धती या तत्वाचा अवलंब केला आहे.

राष्ट्रगीत - 'जन गण मन'

राष्ट्रीयगीत - 'वंदे मातरम'

बिद्रवाक्य - 'सत्यमेव जयते'

राष्ट्रीय फूल - 'कमळ'

राष्ट्रीय पक्षी - 'मोर'

राष्ट्रीय प्राणी - 'वाघ'

निरनिराळ्या राज्यघटनांच्या भारतीय राज्यघटनेवर पडलेला प्रभाव

संसदीय शासनपद्धती - इंग्लंड

संघराज्यात्मक स्वरूप - अमेरिका

मार्गदर्शक तत्वे - आयरिश (आर्यलंड)

मूलभूत हक्क - फ्रान्स आणि अमेरिका

राष्ट्रपती अधिकार - इंग्लंडचा राजा आणि फ्रान्सचा अध्यक्ष

घटना दुरूस्ती - दक्षिण अफ्रिका

आणीबाणी - जर्मनी

समाजवाद - रशिया

मूलभूत कर्तव्ये - जपान

संघसूची, राज्यसूची - ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा समवर्ती सूची

कायद्याचे राज्य - इंग्लंड

न्यायालयीन पुनर्विलोकन - अमेरिका                 

भारताच्या राज्यघटनेतील तरतुदी :


भाग  -   कलम   -  तरतुदी

I.  - 1-4 -  केंद्र-राज्ये आणि त्यांच्या सीमा व भूप्रदेश

II. - 5-11 - नागरिकत्व

III. - 12-35 - मुलभूत हक्क

IV. - 36-51 - मार्गदर्शक तत्वे

IVA. - 51-अ - मुलभूत कर्तव्ये

V. - 52-78 - राष्ट्रपती, उपराष्ट्रपती

      79-122 - संसद

      123  - राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार

      124-151 - सर्वोच्च न्यायालय

VI. - 152  - घटक राज्य प्रशासन

    153-167 - राज्यपाल

    168-213 - राज्य विधिमंडळ

    213 - राज्यपालांचे वैधनिक अधिकार

    214-232 - उच्च न्यायालये

    233-237 - कनिष्ठ न्यायालये

VII. - 238 - निरसन (सातवी घटनादुरूस्ती 1956)

VIII. - 239-242 - केंद्रशासित प्रदेश

IX. - 243 - निरसन (सातवी घटनादुरूस्ती 1956)

X. - 244 - अनुसूचित व आदिवासी प्रदेश  

XI. - 245-255 - केंद्रराज्य प्रशासकीय संबंध  

XII. - 264-291 - केंद्रराज्य आर्थिक संबंध

    292-293 - उसनवारी व आर्थिक संबंध

    294-300 - मालमत्ता, करार, देणी, दायित्व, दावे

XIII. - 301-307 - देशांतर्गत व्यापार, वाणिज्य व व्यवहार

XIV. - 308-314  - प्रशासकीय सेवा

    315-323 - लोकसेवा आयोग

XIVA. - 323-अ  - प्रशासकीय लवाद

XV. - 324-329 - निवडणुका

XVI. - 330-342 - विशिष्ठ घटकांसाठी खास तरतुदी

XVII. - 343-344 - केंद्राची भाषा

    345-347 - प्रादेशिक भाषा

    348-349 - सर्वोच्च व उच्च न्यायालयाची भाषा

XVIII. - 352-360 - आणीबाणीच्या तरतुदी

XIX. - 361-367 - किरकोळ तरतुदी

XX. - 368 - घटनादुरुस्ती

XXI. - 369-392 - तात्पुरत्या, सांस्कृतिक व खास तरतुदी

XXII. - 393-395 - घटनेचे नाव, सुरुवात, अंमलबजावणी

परिशिष्ट्ये (Schedules) :


सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

तलाठी विशेष

१) सर्वनामाचा प्रकार ओळखा : पुस्तके कोणी नेली ? अ) पुरुषवाचक सर्वनाम ब) दर्शक सर्वनाम क) सामान्य सर्वनाम  ड) प्रश्नार्थक सर्वनाम ===========...