Saturday 18 May 2024

Aspirant to Officer

"एक SERIOUS ATTEMPT लागतोच पोस्ट काढायला..It's your Turn Now"


माझी Score मध्ये झालेली सुधारणा

2019 राज्यसेवा 447

वरून

2020 राज्यसेवा 534.5 = 87.5 Marks 


Seriousness आणि योग्य  Approach वापरून मागे झालेल्या चुका शोधून त्या जवळपास कमी करून 87.5 मार्क्स ने next attempt ला सुधारणा केली होती..

🔴माझ्या Common mistakes आणि त्यावरील उपाय--

❌Phone अती वापर सर्वात मोठी mistakes 

✔️Action - 2020 ला phone घरीच ठेवला फक्त दुपारी आणि रात्री चेक करायचो..


__


❌Exam विषयी आणि Content विषयी मार्केट ने निर्माण केलेली अनावश्यक भीती..

✔️Action - Result पण आहे आणि Approach पण Simple आहे अश्यांकडूनच मार्गदर्शन घेतले फाफट पसारा सांगणाऱ्यांपासून लांब राहिलो..senior शी consult करून Internet वापरलेच पाहिजे ही अनावश्यक भीती काढून टाकून 100 % प्रिंट मटेरियल वर विश्वास ठेऊन तेच चांगले केले..

_


❌शिस्त कमी -- 

✔️Action - दिवसाची सुरवात वेळेवर होईल याची काळजी घेतली म्हणजे बाकी  दिवस चांगला जातो..

उठायचा कंटाळा - Used my friend style to wake up..(एका झटक्यात पटकन उठून wash basin ला जाऊन तोंडावर पाणी मारणे) 

उगाच बेड वर रेंगाळत बसू नये..

_


❌PYQ ANALYSIS केले नव्हते- 

✔️action - जबरदस्त strong केले..लॉजिक approch Tricks develop केल्या..

____


❌Revision कमी - 

✔️आवश्यक तिथे नोट्स काढून घेतल्या..(not 100%) त्यामुळे Revision होण्यास मदत झाली.


शेवटच्या Revision ला जास्त वाचण्याचा मोह आवरला.. त्यामुळे परीक्षाभिमुख Content चांगला Revise झाला..

___


❌Consistency नव्हती --

✔️Action - self Audit आणि स्वतः चा Productivity chart तयार करून त्यातून सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला..

___


✔️Positive भीती तयार केली--

"आत्ता कंटाळा केला की अजून एक वर्ष या Process मध्ये घालवावे लागेल परत तोच अभ्यास करावा लागेल  म्हणून हाच शेवटचा अभ्यास करू परत अभ्यासच नको.."


असे स्वतः ला सांगून एक positive भीती तयार केली..

_


✔️Most Important - पहिले planning खुप करायचो Execution नीट नव्हते होत..

यावेळेस Execution वरच विशेष भर दिला.


वैयक्तिक स्तरावर चांगला Score येण्यासाठी काय काय करू शकता...


🌷DAILY टार्गेट -

आपल्या क्षमते नुसार SET करणे आणि ते ACHIEVE करण्याचा प्रयत्न करणे.. 


🌷ACCOUNTABILITY -

कुणाला तरी आपण जबाबदार असावे..जमल्यास आपल्या मित्र मैत्रीणीना , even घरच्यांना 😜आपले आजचे, Weekly audit share करा..

(Productivity chart आणि weekly Analysis share केले आहे अगोदर)


🌷रोज चुका कमी करणे - audit मधून स्वतःच्या चुका ओळखणे आणि त्या सुधारणे..


🌷PYQ paper-  पेपर वेळ लावून solve करणे त्यातील आपल्या चुका ओळखणे ..

त्या चुका कश्या सुधारता येतील त्यावर Action काय घ्यावी हेही लिहून काढणे. पुढील पेपर सोडविण्यापूर्वी त्या चुका Action Item परत वाचणे आणि नंतर paper solve करणे..तसेच चुका कमी झाल्या का याचे विश्लेषण करणे..


🌷Tips & Tricks- PYQ वरून माहिती नसलेले प्रश्न सोडविण्यासाठी tips, tricks आणि logic विकसित करणे..


🌷Revision - ठराविक काळाने करणे..ढोबळ नियम :  आज जे वाचलेले ते परत एकदा किमान 15 दिवसाच्या आत नजरेखालून जायला पाहिजे.. Reference साठी आपला कुठलाही REVISION plan ऐका..No comments:

Post a Comment

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...