Tuesday 21 February 2023

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारली आहे?

१. जापान ची घटना 

२. आयरिश घटना

३. ऑस्ट्रेलियाची घटना 

४. वायमार प्रजासत्ताक ची घटना✅


2. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नाही?

१. के एम मुंशी 

२. एन माधवराव 

३. टी टी कृष्णमाचारी 

४. जे बी कृपलानी✅


3. खाली दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा.

१. संविधान सभेत एकूण 379 सदस्य होते

२. संविधान सभेच्या निर्मितीची रचना ऑगस्ट ऑफर मध्ये करण्यात आली 

३. संविधान सभेच्या निवडणुकांमध्ये दहा जागा अपक्षांना मिळाल्या 

४. 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले✅


4. खालील विधानांचा विचार करा..

अ) भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही 

ब) सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही

१. फक्त अ बरोबर

२. फक्त ब बरोबर

३. दोन्ही चूक

४. दोन्ही बरोबर✅


5. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ) संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे घेण्यात आली.

ब) संस्थानिकांना मिळालेल्या 93 जागा भरू शकल्या नाहीत कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला.

१. फक्त अ बरोबर

२. फक्त ब बरोबर✅

३. दोन्ही चूक

४. दोन्ही बरोबर


6. समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कितव्या घटना दुरुस्तीने प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आले?

१. 41

२. 43

३. 44

४. यापैकी नाही✅


7. घटनेच्या संघ राज्य शासन व्यवस्थेवर विविध तज्ञांची मते खाली दिलेली आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

१. अर्ध संघराजीय - के सी व्हेयर

२. सहकारी संघराज्य - ग्रेन विल ऑस्टिन 

३. वाटाघाटीचे संघराज्य - मॉरीस जोन्स 

४. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य - एच सी मुखर्जी✅


8. 42 वी घटनादुरुस्ती किती सली संमत करण्यात आली?

१. 1974

२. 1975

३. 1976 ✅

४. 1977 


9. घटनेच्या सरनाम्यातून खालीलपैकी काय दिसून येते?

1. साध्य करावयाचे आदर्श

2. शासन व्यवस्था 

3. सत्तेचा स्त्रोत

१. फक्त 1

२. फक्त 2

३. 1, 2

४. 1, 2, 3✅


10. राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांची भूमिका दिसून येते?

१. राज्यघटनेचा सरनामा✅

२. मार्गदर्शक तत्त्वे 

३. मूलभूत कर्तव्य

४. आणीबाणीच्या तरतुदी१९२६) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारुपाचे अनुकरण केले आहे.

   ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.

   क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.

         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) फक्त अ  

  2) अ व ब    

3) अ व क    

4) अ, ब आणि क

उत्तर :- 2


१९२७) खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मुलभूत वैशिष्टये समजता येतील ?

   अ) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व 

   ब) न्यायालयीन पुनर्विलोकन

   क) कल्याणकारी राज्य 

    ड) घटनादुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार

   1) अ, ब, क    

2) अ, ब     

 3) अ, ब, ड    

4) अ, ब, क, ड

उत्तर :- ४


१९२८) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

   1) पंडित जवाहरलाल नेहरू 

   2) सच्चिदानंद सिन्हा

   3) डॉ. राजेंद्र प्रसाद     

 4) डॉ. बी. आर. आंबेडकर

उत्तर :- 4१९२९) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर   

 2) डॉ. राजेंद्र प्रसाद

   3) जवाहरलाल नेहरू    

  4) बी. एन. राव

उत्तर :- 4


१९३०) संघीय शासन व्यवस्थेमध्ये  ?

   1) सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते    

  2) सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते

   3) यामध्ये केवळ एकच सरकार असते  

  4) यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात

उत्तर :- 2


२०२१) खालीलपैकी किंमतवाढीस कोणते एक कारण नाही ?

   1) तुटीचा अर्थभरणा    

2) लोकसंख्या वाढ

   3) बेरोजगारीत वाढ    

4) प्रशासकीय खर्चात वाढ

उत्तर :- 3


२०२२) भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्टय कोणते आहे ?

   1) समतोल किंमत रचना   

 2) समन्वित किंमत रचना

 3) 1 व 2 दोन्ही      

4) कोणतेही नाही

उत्तर :- 3


२०२३) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु ...............   टक्के मुले ही कुपोषित आहेत. 

   1) 30 टक्के

    2) 35 टक्के 

   3) 40 टक्के

    4) 45 टक्के

उत्तर :- 3


२०२४) कोणत्या स्थितीमध्ये GDI चे मूल्य HDI च्या मूल्यापेक्षा कमी असणार ?

   1) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जात नाही.  

  2) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जातो.

   3) जेव्हा लैंगिक समता ही संविधानकरित्या सुनिश्चित केली जाते.

   4) वरीलपैकी कोणतेही नाही.

उत्तर :- 2


२०२५) योग्य पर्याय निवडा.

     भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2004 मधील तरतूदी

   अ)वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी.   

  ब) रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे.

   क) रोजगार करणा-या व्यक्तीला किमाल वेतनाची हमी.

   1) वरील सर्व चूक 

   2) वरील सर्व बरोबर    

   3) अ व ब बरोबर    

4) केवळ क बरोबर

उत्तर :- 2२०२६) खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.

   .................. सरकारने ऑगस्ट 2002 मध्ये पहिला राजवित्तीय जबाबदारी कायदा संमत केला.

   1) कर्नाटक  

  2) केरळ      

   3) तामिळनाडू  

  4) पंजाब

उत्तर :- 1


२०२७) बाराव्या वित्त आयोगानुसार केंद्राच्या स्थूल महसुलातील किती टक्के वाटा हा राज्य सरकारांना दिला जातो ?

 1) 38.0%  

 2) 46.0%    

 3) 37.0%    

4) 42.0% 

उत्तर :- 1


२०२८) सार्वजनिक लेखा – समिती त्यांचा अहवाल खालील सभेला तयार करते.

  1) संसद  

  2) राष्ट्रपती    

  3) पंतप्रधान  

  4) वित्त – मंत्री

उत्तर :- 1


२०२९) 1991 नंतर पुढीलपैकी कोणत्या वर्षी परकीय चलन साठयात घट झाली ?

  1) 1993 – 94  

  2) 2000 – 01    

  3) 2007 – 08  

  4) 2008 – 09

उत्तर :- 4


२०३०) अ) जुलै 1991 मध्ये भारतीय रूपयाचे 18 टक्के अवमूल्यन करण्यात आले.

    ब) अवमूल्यनामुळे व्यापारतुट भरून काढण्यास मदत होते.

 1) फक्त अ बरोबर आहे.     

 2) फक्त ब बरोबर आहे.

 3) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. 

 4) अ आणि ब दोन्हीही चूक आहेत.

उत्तर :- 3


१९५१) योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)

  अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे   

  ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

  क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे    ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

1) अ, ब, क, ड    

2) अ, ड, क, ब   

3) अ, ब,  ड, क   

4) अ, ड, ब, क

उत्तर :- 2


१९५२) ‘मुलभूत कर्तव्या’ बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.

   ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

   क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.

   ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  1) अ, ब  

 2) ब, क     

 3) क, ड    

 4) अ, ब, क

उत्तर :- 4


१९५३) खालीलपैकी कशाचा मुलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

   अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.

   ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

   क) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

   ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.


1) अ, ब    

2) ब, क      

3) क, ड      

4) फक्त ड

उत्तर :- 3


१९५४)  भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

  1) डॉ. राजेंद्र प्रसाद   

 2) डॉ. झाकीर हुसेन

  3) आर. व्यंकटरमण्‍  

 4) के. आर. नारयणन्

उत्तर :- 1


१९५५) भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

 1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य  

 2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य

 3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य   

 4) वरील सर्वच

उत्तर :- 4No comments:

Post a Comment

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...