Thursday 21 April 2022

महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभाग यांच्या प्रशासनासाठी शासनाने महाराष्ट्राची एकूण ६ प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. यालाच “महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग” असे म्हणतात.

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग म्हणजे काय?

महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभाग यांच्या प्रशासनासाठी शासनाने महाराष्ट्राची एकूण ६ प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. यालाच “महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग” असे म्हणतात.


कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे.

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग संपूर्ण माहिती Prashasakiy Vibhag
1. कोकण प्रशासकीय विभाग (Konkan Administrative Department in Marathi):-

कोकण विभाग : मुंबई शहर, पालघर, ठाणे,  मुंबई उप नगर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड


कोकण विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 30728 चौरस किलो मीटर (10%)


कोकण विभागामध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 50

कोकण विभागामधील सर्वांत मोठा जिल्हा : रत्नागिरी

2. नाशिक प्रशासकीय विभाग Nashik Prashasakiy Vibhag (Nashik Administrative Department in Marathi):-

नाशिक विभाग : नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार

नाशिक विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 57493 चौरस किलो मीटर (18.70%)

नाशिक विभागा मध्ये अस्तित्वा मध्ये असणारे एकूण तालुक्यांची संख्या: 54

नाशिक विभागा मधील सर्वांत मोठा जिल्हा: अहमदनगर

3. पुणे प्रशासकीय विभाग (Pune Administrative Department in Marathi):-

पुणे विभाग :  पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर

पुणे विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 57, 275 चौरस किलो मीटर (16. 60%)

पुणे विभागा मध्ये अस्तित्वा मध्ये असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 58

पुणे विभाग मधील सर्वात मोठा जिल्हा : पुणे

4. औरंगाबाद प्रशासकीय विभाग (Aurangabad Administrative Department in Marathi):-

औरंगाबाद विभाग : औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मनाबाद, परभणी आणि हिंगोली

औरंगाबाद विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 64, 813 चौरस किलो मीटर (21. 06%)

औरंगाबाद विभागा मध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 76

औरंगाबाद विभाग मधील सर्वांत मोठा जिल्हा : बीड

5. अमरावती प्रशासकीय विभाग (Amravati Administrative Department in Marathi):-

अमरावती विभाग : अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ

अमरावती  विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 46, 027 चौरस किलो मीटर  (14. 95%)

अमरावती विभागा मध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 56

अमरावती विभागा मध्ये सर्वांत मोठा जिल्हा : यवतमाळ

6. नागपूर प्रशासकीय विभाग (Nagpur Administrative Department in Marathi):-

नागपूर विभाग : नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा

नागपूर विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 51, 377 चौरस किलो मीटर (16. 69%)

नागपूर विभागा मध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 64

नागपूर विभागा मध्ये सर्वांत मोठा जिल्हा : गडचिरोली

प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळा अनुसार क्रमवारी (Sorting of administrative departments by area in Marathi)

औरंगाबाद 64, 813 चौरस किलो मीटर
नाशिक 57, 493 चौरस किलो मीटर
पुणे 57, 275 चौरस किलो मीटर
नागपूर 51, 377 चौरस किलो मीटर
अमरावती 46, 027 चौरस किलो मीटर
कोकण 30, 728 चौरस किलो मीटर
क्षेत्रफळा अनुसार सर्वात मोठे पाच जिल्हे
अहमदनगर : 17, 048 चौरस किलो मीटर
पुणे : 15, 643 चौरस किलो मीटर
नाशिक : 15, 530 चौरस किलो मीटर
सोलापूर : 14, 895 चौरस किलो मीटर
गडचिरोली : 14, 412 चौरस किलो मीटर

क्षेत्रफळाच्या दृष्टी ने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे

मुंबई शहर : 157 चौरस किलो मीटर
मुंबई उपनगर : 446 चौरस किलो मीटर
भंडारा : 3, 896 चौरस किलो मीटर
ठाणे : 4, 214 चौरस किलो मीटर
हिंगोली : 4, 524 चौरस किलो मीटर
महाराष्ट्रा मधील समान नावाचे तालुके असणारे जिल्हे
कळंब : यवतमाळ -उस्मानाबाद
नांदगाव : नाशिक- अमरावती
शिरूर : बीड -पुणे
आष्टी : बीड- वर्धा
खेड :  पुणे- रत्नागिरी
मालेगाव : नाशिक- वाशिम
कारंजा : वाशिम- वर्धा
कर्जत : अहमदनगर -रायगड
सेलू : परभणी- वर्धा
महाराष्ट्रा मधील सर्वाधिक तालूक्यांची संख्या असणारे जिल्हे कोणते (Districts with highest number of talukas in Maharashtra in Marathi)

नांदेड आणि  यवतमाळ : प्रत्येकी 16 तालुके
नाशिक, चंद्रपुर, जळगाव, आणि रायगड: प्रत्येकी 15 तालुके
पुणे, अहमदनगर आणि  नागपूर : प्रत्येकी 14 तालुके
कोल्हापूर आणि  गडचिरोली : प्रत्येकी 12 तालुके

No comments:

Post a Comment

Latest post

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे

◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️ ▶️ 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ▶️ ...