Thursday 21 April 2022

लक्षात ठेवा

1)अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या.

अ) तिच्या घुसणे पासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येतो जर त्याला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर

ब)राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्याची लिखित स्वरूपात शिफारस केली असेल तर

a) विधान अ बरोबर

b) विधान ब बरोबर

c) दोन्ही विधाने बरोबर

d) दोन्ही विधाने चुकीची

उत्तर – d) दोन्ही विधान चुकीचे

2)राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो?

a) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार

b) राज्यपाल उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार

c) उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती कडून

d) संबंधित राज्याच्या राज्यपाल आपण होऊन

उत्तर – a) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार

3)भारतीय निर्वाचन आयोग बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?


a) केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही.


b) मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे.

c) मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत.

d) जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो.

उत्तर – b) मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे.

4)भारतीय राजशिष्टाचार अनुसार पदनाम श्रेणी मध्ये राज्यात खालीलपैकी कोणाची स्थान सर्वात वरचे आहे?

a) उपपंतप्रधान

b) माजी राष्ट्रपती

c) घटक राज्याचे राज्यपाल

d) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

उत्तर – c) घटक राज्याचे राज्यपाल

5)महाराष्ट्राच्या राज्यपालांचे बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

a) ते अँग्लो-इंडियन समाजातील एकाच विधानपरिषदेवर नामनिर्देशित करू शकतात.

b) ते अँग्लो-इंडियन जमातीमधील किमान दोघास विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात.

c) त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 (2) नुसार विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे.

d) ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 व खालील सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत.

उत्तर – c) त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 (2) नुसार विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे.

6)एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर……

अ) राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या 2/3 सदस्यांनी तसा ठराव केला.

ब) राज्यपाल यांच्यामते राज्यांमध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे.

क) विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला.

ड) राज्य कायदे मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केला.

a)अ आणि ब

b)अ,ब आणि ड

c)ब आणि क

d)अ आणि ड

उत्तर – (c) ब आणि क

7)खालील समित्या त्यांच्या गठीत क्रमानुसार लावा.

अ) जी.व्ही.के. राव समिती

ब) बलवंतराय मेहता समिती

क) अशोक मेहता समिती

ड) के संथानम समिती

a) ब क ड अ

b) ब अ ड क

c) ब अ क ड

d) ब ड क अ

उत्तर -(b) ब अ ड क

8)भारतीय बँक, बँकांचा इतिहास, Banks Information In Marathi

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) पंचायतीमध्ये अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षित जागा आहेत परंतु महिलांसाठी नाहीत.

ब) विसर्जन झाल्यावर निवडून आलेल्या पंचायतीला पूर्ण कार्यकाल उपभोगता येत नाही फक्त उर्वरित कार्य कालच उपभोगता येतो.

a) फक्त अ

b) फक्त ब

c) अ आणि ब

d) दोन्ही नाही

उत्तर – (b) फक्त ब

9)भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन…… सुचविते.

A.कायद्याची आणि कार्यकारी देशांची घटनात्मक घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार.

B.कायदेमंडळात द्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार.

C.कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्यास अगोदर पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार

D.आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणांमध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार.

उत्तर – A

10)खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचलन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही?

a) लोकसभा निवडणुका

b) राज्यसभा निवडणूका

c) स्थानिक स्वशासन निवडणुका

d) राष्ट्रपती निवडणूक

उत्तर – स्थानिक स्वशासन निवडणुका.

11)राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो?

अ) पाच वर्षे

ब) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत

क) राज्यपालांची इच्छा असेपर्यंत

ड) मुख्यमंत्र्यांची इच्छा असेपर्यंत

a) अ आणि ब

b) अ आणि क

c) अ आणि ड

d) ब आणि क

उत्तर – अ आणि ब

12)भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे?

a) 550

b) 250

c) 100

d) 60 ते 500

उत्तर – (d) 60 ते 500

13)खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

अ)कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ या दक्षिणेला ज्या पैकी केवळ दोन राज्यात विधानपरिषद आहे.

ब) विधान परिषदेत कमीत कमी 60 सदस्य असू शकतात.

a) केवळ अ

b) केवळ ब

c) अ आणि ब दोन्ही

d) अ आणि ब दोन्ही नाही

उत्तर – a) केवळ अ

14)स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे?

a) केंद्र सूची

b) राज्य सूची

c) समवर्ती सूची

d) पंचायत राज्य सूची

उत्तर – राज्य सूची

15)कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला?

a) 72वी   b) 73वी   c) 74वी  d) 75 वी

उत्तर – b) 73वी

16)73 व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायतराज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे?

a) २५ वर्षे

b) १८ वर्षे

c) २१ वर्षे

d) ३० वर्षे

उत्तर -c) २१ वर्षे

17)ग्राम सभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?

a) १८

b) २१

c) २३

d) २५

उत्तर – a) १८

18)बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती?

a) लोकशाही विकेंद्रीकरण यासाठी उपाय योजना सुचविणे.

b) सामुहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कार्यक्षमता आणण्याकरता उपाय योजना सुचविणे.

c) तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणे.

d) तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे.

उत्तर – b) सामुहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कार्यक्षमता आणण्याकरता उपाय योजना सुचविणे

19)राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदीबाबत कोणते विधान बरोबर नाही?

a) अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात.

b) त्यांच्या सेवाकाळात नुकसान कारक होईल अशा प्रकारे सेवा अटित बदल करता येत नाही.

c) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा कडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही.

d) राज्यपाल दोषी असणाऱ्या ची सेवा तात्पुरती स्थगित करू शकतात परंतु बडतर्फीचे अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.

उत्तर – c) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश याकडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही.

20)पंचायत राज्याच्या क्षेत्रात 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती तरतूद सुचवलेली नाही?

a) महिला उमेदवारांना सर्व स्तरावर एक-तृतीयांश आरक्षण.

b) राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी.

c) निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर दोन पेक्षा जास्त अपत्ये असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील.

d) पंचायत राज्य संस्था जर विसर्जित झाल्या तर सहा महिन्याच्या कालावधीत निवडणुका झाल्या पाहिजेत.

उत्तर – c) निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर दोन पेक्षा जास्त अपत्ये असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो. 2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट...