◆ जागतिक रजोनिवृत्ती दिन दरवर्षी 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
◆ जागतिक रजोनिवृत्ती दिन 2026 ची थीम 'Chronic Pain at Midlife' (प्रौढावस्थेतील दीर्घकालीन वेदना) ही आहे.
◆ श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू माहेला जयवर्धने यांनी मुंबई इंडियन्स (MI) संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे.
◆ श्रीलंकाचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज चामिंडा वास यांची IPL 2027 साठी दिल्ली कॅपिटल्स संघात वेगवान गोलंदाजी कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ भारताची महिला कुस्तीपटू अमृता पुजारीने अमेरिकेतील लास वेगास येथे पार पडलेल्या 23 वर्षांखालील (U23) जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे.
◆ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील "Adani Institute of Higher Education and Research" च्या 17 व्या दीक्षांत सोहळ्यात मानद 'डी. लिट.' (Doctor of Letters) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
◆ पुणे याठिकाणी 24 ऑक्टोबर 2026 रोजी स्त्रीवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. [अध्यक्षा : ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन]
◆ महाराष्ट्रातील पहिले अत्याधुनिक "अन्नपूर्ती धान्य ATM" नाशिक येथील गोरेवाडी येथे सुरू करण्यात आले आहे. [उद्घाटक : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले]
◆ FP-7 टॅक्टिकल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र युक्रेन या देशाने विकसित केले आहे.
◆ भारतीय लष्कराने 'जय से विजय' हा सराव राजस्थान राज्यात आयोजित केला होता.
◆ आंतरराष्ट्रीय व्हेलिंग आयोगाच्या (IWC-70) 70व्या बैठकीचे आयोजन होबार्ट, ऑस्ट्रेलिया येथे करण्यात आले होते.
◆ भारत ऊर्जा सप्ताह (IEW) 2027 चे आयोजन कोलकाता शहरात होणार आहे. [5वी आवृत्ती]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा