Monday 10 February 2020

ऑस्कर पुरस्कार 2020

अमेरिकी प्रमाणवेळेनुसार ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी होईल.

Que: ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार किती वाजता बघता येईल?
भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजता हा पुरस्कार सोहळा सुरु होईल.

Que: ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा कुठल्या वाहिनीवर लाइव्ह बघता येईल?
स्टार मुव्हीज आणि स्टार मुव्हीज सिलेक्ट एचडी या वाहिन्यांवर तुम्हाला हा पुरस्कार सोहळा लाइव्ह पाहाता येईल. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. शिवाय हॉटस्टार आणि हुलू या ऑनलाईन अ‍ॅपवर देखील ऑस्कर पाहाता येईल.

Que: ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा कुठे होतो?
कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा होईल. ‘अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो.

Que: ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन कोण करणार?
जगभरातील कलाकारांच्या नजरा लागून राहिलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन यंदाच्या वर्षात कोणताही व्यक्ती करणार नाही. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या मदतीने यंदाचे सूत्रसंचालन केले जाणार आहे.

Que: ऑस्कर पुस्कार कोणाच्या हस्ते दिला जाणार?
लिओनार्डो दीकॅप्रिओ, अ‍ॅमी अ‍ॅडम्स, सॅम्युअल एल जॅक्सन, स्कार्लेट जॉन्सन, ड्वाइन जॉन्सन, ब्री लार्सन, हॅले बेरी, जॅमी डोर्नन, डकोटा जॉन्सन, एमा स्टोन, चार्लीझ थेरॉन यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या हस्ते ऑस्कर पुरस्काराचे वितरण केले जाईल.

Que: यंदाच्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याचे वैशिष्टय काय?
यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे 'जोकर'. या कॉमिक बूक खलनायकाला एक, दोन नव्हे तर तब्बल ११ विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. त्याआधी हा पराक्रम १९६९ साली ‘ऑल अबाउट इव्ह’ आणि १९९७ साली ‘टायटॅनिक’ या चित्रपटांनी केला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...