Saturday 29 February 2020

Maha MPSC Bharti Recruitment 2020 Combined Preliminary Exam

Apply now – MPSC PSI STI ASO 2020 – 806 Posts

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा- २०२० – ८०६ जागा



एकूण जागा – ८०६ जागा




पदांचे नाव –


सहायक कक्ष अधिकारी – MPSC ASO – 67 जागा
राज्य कर निरीक्षक – MPSC STI – 89 जागा
पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – 650 जागा





संयुक्त पूर्व परीक्षा योजना –

सामान्य क्षमता चाचणी
प्रश्नांची संख्या – १००
एकूण गुण – १००
माध्यम – मराठी व इंग्रजी
परीक्षेचा कालावधी – एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी


शैक्षणिक पात्रता – Qualification

1. विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
2. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वय – Age Limit –

1.सहायक कक्ष अधिकारी – 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
2.राज्य कर निरीक्षक – 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
3.पोलीस उप निरीक्षक – 19 ते 31 [मागासवर्गीय: 03 वर्षे सूट]

पोलीस उपनिरीक्षक (MPSC PSI) पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे –
किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे.

पुरुष –
१) उंची – १६५ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
२) छाती – न फुगविता ७९ से.मी.
फुगविण्याची क्षमता किमान ५ सें. मी.

महिला –
उंची १५७ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)


पगार –

९३००-३४८०० /- ग्रेड पे रुपये
४३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.



अभ्यासक्रम – MPSC PSI STI ASO 2020 Syllabus –


१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

२) नागरिकशाश्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

३) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

४) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश -रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्ज्यन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी
५) अर्थव्यवस्था –
भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी

६) सामान्य विज्ञान – भौतिकीशास्त्र (Physics), रसायनशाश्त्र (Chemistry), प्रमिशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene)

७) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित –
बुद्धिमापण चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी

Details of Exam –

सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील भरतीकरीता सध्या आयोगाकडून स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्व परीक्षा घेतल्या जातात. या तीनही पूर्व परीक्षांसाठी परीक्षा योजना, अभ्यासक्रम, प्रश्‍नसंख्या, गुण, वेळ एकसमान आहेत. तरीही स्वतंत्र पूर्व परीक्षांमुळे प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करणे, परीक्षा शुल्क भरणे, पूर्व/अभ्यास, प्रवास, निवास, व्यवस्था, रजा घेणे अशा बाबींवर उमेदवारांना स्वतंत्रपणे व पुन्हा पुन्हा वेळ व पैसा खर्च करावा लागतो. निवड प्रक्रियेतही विलंब होतो.
या बाबी टाळण्यसाठी सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांवरील भरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा MPSC PSI STI ASO 2020 Combine Exam घेण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.
आता या तीनही पदांकरीता संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन, अर्ज करणार्‍या उमेदवारांकडून ते या पैकी एक, दोन किंवा तीनही पदांसाठी बसू इच्छितात काय, याबाबत विकल्प घेण्यात येईल. संबंधित पदांकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील व त्याच्या आधारे तसेच, भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्‍चित करुन, सामाईक पूर्व परीक्षेच्या आधारे तीनही पदांकरीता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील.
त्यानंतर त्या-त्या पदाच्या मुख्य परीक्षेस पात्र ठरणार्‍या उमेदवारांची विद्यमान मुख्य परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे, स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्‍नसंख्या, गुण, वेळ अशा इतर बाबींमध्ये कोणताही बदल नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...