Thursday 14 March 2024

प्लासीची लढाई : 23 जून 1757


◾️बगालचा नबाब सिराजउद्दौला व ईस्ट इंडिया कंपनी यांत 23 जून 1757 रोजी बंगालमधील हुगळी (भागीरथी) नदीकाठी प्लासी (पलास) या गावाजवळ झालेली ऐतिहासिक महत्त्वाची लढाई.


◾️ इग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढमूल करावयाची होती. 


◾️तयात सिराजउद्दौला हा मोठा अडसर होता. म्हणून त्यांनी काहीतरी निमित्त शोधून सिराजउद्दौलावर हे युद्ध लादले.


◾️अलीवर्दीखान याचा नातू (मुलीचा मुलगा) वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो बंगालचा (ओरिसा, बंगाल व बिहारचा सुभेदार) नबाब झाला.


◾️अधारकोठडी नंतर रॉबर्ट क्लाइव्ह व ॲडमिरल चार्ल्स वॉट्सन यांनी तयारी करून कलकत्ता काबीज केले.


◾️सिराजउद्दौलाचा सरसेनापती मीर जाफर यास बंगालचा नबाब बनविण्याचे अभिवचन दिले.


◾️ तयाबद्दल त्याच्याकडून काही रक्कम स्वतःस व काही कंपनीस घेण्याचे ठरले. शिवाय राय दुर्लभराम व मीर मादन या दुसऱ्या सेनापतींनाही फितूर करण्याचा प्रयत्न झाला.


◾️इग्रजांच्या बाजूने ३,००० सैनिक व आठ तोफा होत्या आणि नेतृत्व क्लाइव्हकडे होते. शिवाय सर आयर कुट वगैरे काही चांगले लढवय्ये होते, तर सिराजउद्दौलाकडे ६०,००० सैन्य, ५३ मोठ्या तोफा आणि सेंट फ्रेअसच्या हाताखाली फ्रेंचांचा तोफखाना होता. सैन्याचे नेतृत्व मीर जाफरकडे होते. 


◾️मीर मादन हा केवळ एकच निष्ठावान सेनापती सिराजच्या बाजूने विश्वासाने लढला पण तो मारला गेला


◾️इग्रजांचे फक्त ६५ सैनिक मारले गेले.


◾️इग्रजांनी मीर जाफरला घेऊन मुर्शिदाबाद ही सिराजची राजधानी जिंकली आणि मीर जाफरला नबाब केले.


◾️या विजयामुळे पुढे क्लाइव्हला काही उच्च पदे-बंगालचे गव्हर्नरपद व सरदारकी-मिळाली. 


◾️तयामुळे साहजिकच इंग्रज बंगालचे अप्रत्यक्ष रीत्या राज्यकर्ते बनले. 


◾️यांतून पुढे भारतभर इंग्रजांना आपल्या सत्तेचा विस्तार करणे सोपे झाले.


No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...