Thursday 14 March 2024

महत्वाचे


🛶(१) सागर म्हणजे काय ?*

---  जमिनीने पूर्णः किंवा अंशतः वेढलेल्या 

     खा-या पाण्याचा जलभाग म्हणजे सागर 

     किंवा समुद्र होय. 


🛶(२) महासागर म्हणजे काय  ?*

---  दोन खंडांदरम्यान पसरलेला खा-या 

     पाण्याचा विस्तीर्ण (मोठा) साठा म्हणजे 

     महासागर होय. 


🛶(३) उपसागर म्हणजे काय  ?*

---  सर्वसाधारणपणे जमिनीने तीन बाजूंनी 

     वेढला गेलेला सागराचा लहान भाग म्हणजे 

    उपसागर होय. उदा. बंगालचा उपसागर. 


🛶(४) आखात म्हणजे काय  ?*

---  जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग,

     म्हणजे आखात होय. 


🛶(५) सरोवर म्हणजे काय  ?*

---  भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरीत्या 

    तयार झालेला जलाशय म्हणजे सरोवर 

    होय. 


🛶(६) जलावरण म्हणजे काय  ?*

---  पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेला भाग, 

     म्हणजे जलावरण होय. 


🛶(७) खाडी म्हणजे काय  ?*

---  समुद्राचे पाणी नदीच्या मुखातून जेथेपर्यंत 

     नदीत शिरते, त्या नदीच्या भागाला खाडी 

     म्हणतात. 


🛶(८) सागरी मैदान म्हणजे काय  ?*

---  सागरतळाचा सपाट व सखल भाग 

     म्हणजे सागरी मैदान होय. 


🛶(९) गर्ता म्हणजे काय  ?*

---  सागरातील अरुंद व अतिखोल भागास 

    गर्ता म्हणतात. 


🛶(१०) सागरी डोह म्हणजे काय  ?*

---  सागरतळावर काही ठिकाणी खोल,अरुंद 

      आणि तीव्र उतारांची सागरी भूरूपे

      आढळतात. त्यातील कमी खोलीच्या 

      अरुंद व तीव्र उतारांची सागरी भूरूपे 

      म्हणजे सागरी डोह होय. 

No comments:

Post a Comment

Latest post

WORLD AIR QUALITY REPORT 2023

🔶जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ • अहवाल जाहीर करणारी संस्था : IQAIR स्वित्झर्लंड (स्थापना 1963) • एकूण देश : 134 ☑️या अहवालानुसार 👇👇 ...