Monday 2 May 2022

वाहतुकीचे फायदे व तोटे|वाहतुकीचे प्रदूषण

वाहतुकीचे फायदे व तोटे|वाहतुकीचे प्रदूषण
थोर विचारवंत प्राध्यापक माटे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की,”विज्ञान एक कामधेनु आहे, तिचे तुम्ही जितके दोहन कराल तेवढा तुम्हाला तिचा लाभ होईल”.

खरेच विज्ञान हि माणसाला लाभलेली दिव्य शक्ती आहे. मानवाने विज्ञानाची उपासना केली नसती तर त्याची आदिमानवाच्या अवस्थेपासून आजवर झालेली प्रगती होऊ शकली नसतील. विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने केलेली प्रगती हे मानवाच्या अखंड प्रखर साधनेचे फळ आहे. विज्ञान हा मानवाला लाभलेला परिस आहे.

पण वाहतुकीचे फायदे व तोटे हे आहेतच. तर आपण बघूया वाहतुकीचे फायदे जास्त आहेत का तोटे जास्त आहेत?

वाहतुकीचे फायदे व तोटे, वाहतुकीचे प्रदूषण
समजा, माणसाला विज्ञानाची संगत लाभली नसती तर माणूस कायमचाच ‘कंदमुळे व वल्कले’यांच्यावर जीवन कंठत राहिला असता पण सुदैवाने असे काही घडले नाही. म्हणूनच ,आज मानवी जीवनात असे एकही क्षेत्र आढळणार नाही की जेथे विज्ञानाने प्रवेश केलेला नाही आणि ते समृद्ध केले नाही.

आजचे युग हे अविष्कार आणि चमत्काराचे युग आहे.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाने एक प्रकारची क्रांती केली आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणतात, ”सर्व प्राण्यात माणूस हा दुबळा प्राणी, पण यंत्रांनी त्याची शक्ती वाढवली आहे आणि तो सर्व प्राण्यांत प्रबळ झाला”.

जसे, मानवाने यंत्रयुग अंगीकारले तस- तशी त्याची ज्ञानाची क्षितिजे रुंदावली नवनवीन शोध लागले एकोणिसावे शतक हे प्रमुख प्रबोधनाचे शतक होते तर विसावे शतक हे विज्ञानाचे शतक आहे .

वाहतुकीचे फायदे व तोटे
वाहतुकीचे फायदे
यंत्रही मानवी विज्ञानातील एक भाग आहे.आज विज्ञान क्षेत्रात जी प्रगती झाली आहे ज्यामुळे आज आपण अल्पावधीत इच्छित स्थळी जाऊ शकतो. अंतराळ व समुद्राच्या अंतर्भागात माणूस जावून पोहोचला. अंतराळात जाऊन चंद्राचे फोटो काढून आणू शकतो ते सुद्धा पृथ्वीच्या माणसाने नियंत्रण यंत्राद्वारे केली आहे .

पूर्वी एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचे असल्यास अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास बैलगाडीने अथवा कधी पायीच केला जात असे. प्रवास म्हणजे दोन-तीन किंवा त्याहून अधिक दिवस उन्हातून, जंगलातून, दिवस-रात्र केला जात असे. कोठेही मुक्काम करावा लागत असे.

पूर्वी यंत्राचा, वाहनाचा शोध लागला नव्हता. परंतु, मानवाने विज्ञानात प्रचंड प्रगती करून तो कमी तासात अथवा कमी दिवसात रेल्वे, मोटार, बस, विमान, पानबुडी यांच्या सहायाने आज आपण शेकडो मैल अंतर अगदी बोलता-बोलता पूर्ण करू शकतो हा खूप मोठा वाहतुकीचा फायदा आहे ना…..!

परंतु दैनंदिन जीवनात असे आढळते की, माणूस आता पूर्णपणे यंत्रावर अवलंबून आहे.

माणसाने स्वतःच्या सुखासाठी यंत्रे तयार केली आहे, पण आज ही यंत्रेच माणसावर आधिपत्य गाजवित आहेत.

उद्योगधंदे कारखाने आणि वाहतुकीच्या साधनात त्याने वाहतुकीचा फायदा घेवून  प्रचंड प्रगती केली आहे. कोणी म्हणतात की, ’आज हा माणूस यंत्राचा गुलाम झाला आहे’. एकंदरीत त्याचे हे म्हणणे सत्यच आहे.

प्रत्येक नागरिकाला कामावर जाण्यास कुठल्या ना कुठल्यातरी यंत्र रुपी वाहनाची मदत घ्यावी लागते. रेल्वे, गाडी, बस, स्कूटर व मोटार या सारख्या वाहनांचा फायदा घेवू लागला .ही साधने माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून राहिलेली आहे व वाहतुकीची साधने (यंत्रे) नसली तर तो ऑफिसात जाऊच शकत नाही.

वाहतुकीचे तोटे
आजच्या तरुण पिढीला तर मोटार, स्कूटर ही वाहने एक फॅशन वाटते; या फॅशन चे रूपांतर व्यसनात होते. परंतु वाहतुकीचा तोटा असा की ,आजची तरुण मंडळी हायवे ट्रॅफिक वर रस्त्यावर बेफाम वेगाने वाहने चालवितात ही वाहने जणू माणसाच्या जीवनाचा घटक आहे.

वाहने आली की अपघात आलेच या बेभान वेगाने जाणाऱ्या वाहणांमुळे अनेक निष्पाप जीव विनाकारण बळी पडतात.

आजकाल तर मुले 18 वर्षे वयाची पूर्ण व्हायच्या आधीच त्यांच्यासाठी पालक दुचाकी वाहन घेऊन देतात. तसेच घरातील प्रत्येकाला वाहन घेतले जाते. आज आपण जर एक दृष्टिक्षेप टाकला तर, प्रत्येक घरा समोर दोन-तीन वाहने दिसतात.

वाहतुकीचा तोटा किंवा नुकसान म्हणजे  वाहने असल्याने प्रत्येक जण हा आळशी बनत चाललेला आहे. आपल्या घरापासून दोन घरे सोडून पुढे जायचे असल्यास मानव वाहनांचा उपयोग करू लागला आहे. त्यामुळे शारीरिक व्यायाम होत नाही, त्यामुळे मानवाला अनेक विकार संभवतात. व्यायाम न झाल्याने व शरीराची योग्य ती हालचाल न झाल्याने मानवाला वयाच्या आधी सांधेदुखी ,रक्तदाब तसेच शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, त्यामुळे हृदयविकार संभवतात.

लोकसंख्येच्या बाबतीत तर आज भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दर शतकास ही लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. विचार केल्यास अशा कित्येक भारतवासीयांकडे वाहनाची उपलब्धता झाली असेल तर अशा वाहनातून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणारा काळा वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साइड ,कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन्स ,सल्फर डायॉक्साईड अशी अनेक घातक वायूंची निर्मिती होते, त्यालाच वायू प्रदूषण असे संबोधतात.

पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि मानवी आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या घटकास प्रदूषके म्हणतात. वाहनाच्या प्रचंड वापरामुळे बाहेर पडणाऱ्या असा प्रदूषकांचे प्रमाण वाढते व हवेचे प्रदूषण होते अशा प्रदूषणापासून मानवाला अधिक धोका आहे; कारण श्वाशोस्वासा साठी मानवाला शुद्ध हवेची गरज असते.

श्वाशोस्वासा साठी वापरल्या जाणाऱ्या हवेचे माणसाला नियंत्रण करता येत नाही .श्वाशोस्वास हा अविरत चालू असतो. हवा प्रदुषित झाली कि ती श्वासोच्छ्वासा बरोबर शरीरात जाऊन दुष्परिणाम घडवून आणते. त्याचप्रमाणे हवेतील अतिरिक्त सल्फर डायॉक्साईड मुळे खोकला ,श्वसन मार्ग दाह, श्वसन क्रिया संबंधीचे विकार होतात.

स्वयंचलित वाहनातून इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे कार्बन-डाय-ऑक्‍साईड, पाण्याची वाफ, कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईड अतिक्रमण करत आहे आणि या हल्ल्यात ओझोन नष्ट झाला तर सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर येतील व येथील सजीव सृष्टी पार नष्ट होईल अशी भीती वाटते.

Vehicle Pollution
तसेच वाहनांमधून बाहेर पडणारा धूर व वातावरणातील धुके यांच्या मिश्रणाने धुर्के तयार होते व यात ध्र्क्यात असलेल्या सूक्ष्म कार्बन यांचा समावेश असतो. यामुळे वाहनचालकाला रस्त्यावरचे अंधूक दिसते म्हणून धुक्यामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढते. अशा अपघातांचे प्रमाण दिल्लीमध्ये अधिक असल्याचे दिसून येते.

तसेच रेल्वे, विमानांच्या द्वारे निघणाऱ्या ध्वनी मोटार, स्कूटर, ट्रक, बस अशा वाहनांच्या सतत वाजणारे होर्न यामुळे कानाला कानठळ्या बसतात . मानवी श्रवण संवेदनक्षमता 0 ते 180 डेसिबल (ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक) एवढ्या पल्ल्याची असते. सामान्यतः 140 डेसिबल पुढील आवाज गोंगाट ठरतो. अशा आवाजामुळे ऐकू येण्यात दोष निर्माण होतो.

बराच काळ मोठा ध्वनी म्हणजेच ध्वनी प्रदूषण कानावर पडत राहिलास कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. मोठ्या आवाजाने मेंदू, यकृत, हृदय यांवर विपरीत परिणाम होतो. मोठ्या आवाजाने मानसिक संतुलन बिघाड होते म्हणून सतत मोठा आवाज हितकारक नसतो .

मानवास होणाऱ्या हानी टाळण्यासाठी मुख्य उपाय पुढीलप्रमाणे:
जवळ जाण्यासाठी वाहनाचा  वापर न करता, चालत जाणे योग्य; त्यामुळे शरीरालाही थोडा व्यायाम मिळतो.
प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल ऐवजी शिसे विरहित पेट्रोलचा वापर करावा.
शुद्ध इंधन वापरावे . इंधन व ऑईल यांचे योग्य प्रमाण घ्यावे. इंधन व त्यांचे प्रमाण वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असते.
वाहनांची नियमितपणे तपासणी करून इंजिन कार्यक्षम ठेवणे .वाहनांची तपासणी तज्ञ वाहन यांत्रिकी कडूनच करून घ्यावी. काही कमतरता आढळल्यास त्याची त्वरित पूर्तता करून घ्यावी. सल्फर डायॉक्साइड वायू ,स्मोक व लेडचे कण बाहेर पडत असतात. या वायूच्या हवेत होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या व बालकांच्या आरोग्यावर परिणाम होतात. कार्बन मोनॉक्साईड हा सर्वात घातक वायू आहे. हा वायू रंगहीन व वासिना असतो. या वायूचे हवेत प्रदूषण झाल्यास हा वायू श्वासोच्छ्वास द्वारे फुफ्फुसात शिरतो व रक्तात असलेल्या हिमोग्लोबीनशी संयोग पावतो व कार्बोक्सीहिमोग्लोबिन तयार होतो. CO + Hb  -> COHb कार्बन मोनॉक्साईड ची  संयोग क्षमता ऑक्सिजन पेक्षा दोनशे पटीने जास्त आहे. रक्तात कार्बोक्सीहिमोग्लोबिन चे प्रमाण वाढल्यास ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते व त्यामुळे नागरिकांना डोकेदुखी ,डोके गरगरणे,मूर्छी येणे, ग्लानी येणे इत्यादी त्रास होतात. जास्त प्रमाणातील CO मुळे प्राणघातक ठरू शकतो. नायट्रोजन डायॉक्साइड NO सुद्धा CO सारखाच घातक वायू आहे. नायट्रोजन डायॉक्साइड याची प्रकाशाच्या सानिध्यात एकमेकांची प्रकाश रासायनिक प्रक्रिया घडून Ozone व Peroxy Acitil Nitrate रोज तयार होतात. NO2 -> NO + O  O2 + O -> O3 यामुळे नागरिकांना खाज, खोकला, थकवा, सूज इत्यादी विकार होतात. सल्फर डायॉक्साईडचे हवेतील प्रमाणात वाढ झाल्यास डोळ्यांची व घशाची जळजळ होते. खोकला, श्वास मार्ग दाह आणि तत्सम श्वसनक्रिया संबंधित विकार उद्भवतात .हायड्रोजन सल्फाईडचा कुजका अंड्यासारखा वास येतो .या वायूमुळे फुफ्फुसांचा दाह होतो व श्वसनाचे रोग होतात. तसेच CO2 मुळे ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. पृथ्वीच्या पर्यावरणाच्या बाहेर सर्वत्र ओझोन वायू आहे. पृथ्वीचे जीवनसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी हा वायू आवश्यक आहे. वाढत्या प्रदूषणामुळे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढत आहे. हा विषारी घातक वायू आहे.
वाहनाचा कार्बोरेटर नेहमी साफ ठेवल्याने इंधन पूर्णतः ज्वलन होऊन विषारी वायू बाहेर पडत नाही; म्हणून कार्बोरेटर नेहमी साफ ठेवावे.
टू  स्ट्रोक (2 STROKE)  च्या ऐवजी फोर स्ट्रोक (4 STROKE) चा वापर करावा.
ध्वनी नियंत्रणासाठी सायलेन्सर बसवावे.वेगवेगळे कर्णकर्कश हॉर्न वाजवण्यास बंदी असावी.
वसाहती, शिक्षण संस्था, तसेच रुग्णालयांचे परिसरात ध्वनी वर्जित म्हणून घोषित करावे व तश्या  पाट्या त्या भागात लावावे.
वाहनात charcoal canister बसविल्यास  प्रदूषण करणारे वायू यात शोषले जातात व त्यामधून कमीत कमी हानिकारक वायू बाहेर पडतो.
सौर ऊर्जेचा वाहनासाठी उपयोग केल्यास प्रदूषण कमी होईल.
रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत, कारण झाडे CO2 वायू शोषून घेतात, झाडे ध्वनी रोधक म्हणून काम करतात.
पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे आता बिकट झाली आहे. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी आता धोक्याचा इशारा दिला आहे.

दिवसेंदिवस या वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढत असून ऑक्सिजन प्रमाण घटत चाललेले आहे. याच गतीने जर  प्रदूषण वाढू लागले तर लवकरात पृथ्वीवरील वातावरण तप्त होईल व अशा वातावरणात कुठल्याही सजीव प्राण्याला जगणे केवळ अशक्य होईल.

प्रदूषण समस्येकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखे नाही. असे अजूनही आज माणूस याबाबत असावा तेवढा जागरूक नाही.

save tree
स्वतःच्या स्वल्प फायद्यासाठी जंगल रक्षक व ठेकेदार यांच्याकडून बेकायदेशीर जंगलतोड होत असते. समाजातील कोणालाही त्यांच्या गंभीर परिणामांची दखल घ्यावीशी वाटत नाही.

जंगले वाचवण्याची जबाबदारी फक्त शासनाची नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे, याची जाणीव कुणालाही झालेली दिसत नाही.

झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्यांना त्याहूनही ते वाढवणे महत्त्वाचे आहे .यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड दत्तक घेतले पाहिजे झाडे लावणे आणि त्याची काळजी न घेणे याचा काही उपयोग नाही.

निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात व त्यांना पाणी मिळत नाही, कधी भुकेली  जनावरे नवीन रोपटे खाऊन टाकतात त्यामुळे लावलेल्या झाडांन पैकी  फारच थोडी झाडे जगतात, मोठी होतात. यासाठी मोहीम सुरू केली पाहिजे ,”झाडे लावा झाडे जगवा”, “एक मूल एक झाड”, लग्न मुंजी वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटी देखील एकमेकांना पुष्पगुच्छ देतो  त्या ऐवजी 1-1 रोपे भेटद्यावे .नवीन बालक जन्माला आले की त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व काळाबरोबर बाळासारखे ममतेने त्यालाही वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने शाळेच्या आवारात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी .

No comments:

Post a Comment

Latest post

भूगोल

  5th  भूगोल :- Click Here 6th भूगोल :- Click Here 7th भूगोल :- Click Here 8th भूगोल :- Click Here 9th भूगोल :- Click Here 10th भूगोल :- ...