Sunday 24 April 2022

1 भारताचे स्थान 2 भारताचा विस्तार 3 भारताची सीमा


1 भारताचे स्थान
2 भारताचा विस्तार
3 भारताची सीमा

भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात आहे.  ते  आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे.  उत्तरेकडे उंच हिमालय पर्वत व दक्षिणेकडील हिंदी महासागर या नैसर्गिक सीमांमध्ये भारतीय उपखंड आहे. भारत हा आशिया खंडातील एक प्रमुख राष्ट्र व जगातील सर्वात मोठा  प्रजासत्ताक देश आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडील भूभागात भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका व मालदीव  या देशांचा समावेश होतो. या सर्वांनी मिळून तयार होणाऱ्या प्रदेशास दक्षिण आशिया म्हणतात.  या दक्षिण आशियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी बहुतांश क्षेत्रफळ 98%  भारताने व्यापलेली आहे म्हणून दक्षिण आशियाला भारतीय उपखंड असेही म्हणतात.

भारताचे स्थान
भारताचा मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार 8° 4′ 28” उत्तर ते 37° 6′ 53′ ‘उत्तर असा आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 29° 2’ 25”  इतका आहे.  भारताच्या अति दक्षिणेकडे इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावरील ठिकाण असून ते 60° 45′ 15”  उत्तर अक्षवृत्तावर आहे.  अक्षवृत्तीय विचाराचा प्रभाव तापमान, पर्जन्य दिवस-रात्रीच्या कालावधीवर पडतो.

भारताचा  रेखावृत्तीय विस्तार 68° 7′ 33”  पूर्व ते  97° 24′ 47” पूर्व इतका आहे त्यानुसार भारताचा रेखावृत्तीय विस्तार 29° 17′ 14” इतका आहे.

रेखावृत्तीय विस्तारामुळे सुर्योदय, सुर्यास्त व स्थानिक वेळ इत्यादी ठरतात.

भारताची प्रमाणवेळ 80° 30′  पूर्व रेखावृत्तावर आहे ती उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरावर निश्चित करण्यात आलेली आहे.  हे रेखावृत्त भारताच्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा व आंध्र प्रदेश या राज्यांतून जाते. या रेखावृत्त मुळे भारताचे दोन समान भाग पडतात.  पूर्व भारत व पश्चिम भारत.  तसेच भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त 23° 30′ उत्तर  हे अक्षवृत्त पूर्व -पश्चिम दिशेने जाते. यामुळे भारताचे उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे दोन समान भाग पडतात. हे अक्षवृत्त भारताच्या गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम या 8 राज्यांतून जाते.

भारताचा विस्तार
हिंदी महासागर हा जगातील एकमेव असा  महासागर आहे की ज्याचे नाव हिंदुस्तान वरून ठेवले गेले आहे.  क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका,  ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया नंतर सातवा क्रमांक लागतो.  भारताचे क्षेत्रफळ 32, 87, 263 चौरस किमी आहे. हे जगाच्या 2.42 टक्के आहे.  भारताची पूर्व-पश्चिम लांबी 2993 किमी तर दक्षिण उत्तर लांबी 3214 किमी आहे.  तसेच 2011 नुसार भारताची लोकसंख्या 1, 21, 08, 55, 000 इतकी असून ती जगाच्या 17.50 टक्के इतकी आहे.  त्यानुसार भारताचा जगात चीन खालोखाल दुसरा क्रमांक लागतो.

भारताची सीमा
भारताला दक्षिणेकडील तिन्ही बाजूंनी महासागराची सीमा लागलेली आहे. भारताच्या पश्‍चिम आणि नैऋत्य दिशेला अरबी सागर,  दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्व व आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागराचा सीमा लागलेली आहे. भारतीय द्विकल्पाचे दक्षिण टोक कन्याकुमारी आहे तर अती दक्षिणेकडील टोक अंदमान-निकोबार बेटावरील इंदिरा पॉईंट आहे.  भारताला एकूण 7517 किमी लांबीची सागरी सीमा लागलेली आहे.  त्यापैकी मुख्य भूमीला 6100 किमी ही सीमा भारतातील 9 राज्यांना लागलेली आहे.  त्यापैकी सर्वाधिक सागरी सीमा गुजरात राज्याला तर सर्वात कमी सागरी सीमा गोवा राज्याला लागलेली आहे.  महासागरातील बेटांना 1417 किमी लांबीची सागरी सीमा लागलेली आहे.  त्यापैकी सर्वाधिक सागरी सीमा अंदमान निकोबार बेटांना तर सर्वात कमी सागरी सीमा लक्षद्वीप बेटाला लागलेली आहे.

भारताच्या उत्तरेकडून तिन्ही बाजूने 15,200 किमीची भूसीमा लागलेली आहेत.  भूसीमा वायव्येला पाकिस्तान व अफगाणिस्तान ला लागलेली आहे, उत्तरेला चीन, नेपाळ आणि भूतान या देशाला लागलेली आहे तसेच  पूर्वेला म्यानमार आणि बांगलादेश या देशाला लागलेली आहे. यापैकी सर्वाधिक भूसीमा बांगलादेशाला (4096 किमी) तर सर्वात कमी भूसीमा अफगाणिस्तानला (80 किमी) लागलेली आहे.

भारत-चीन दरम्यानच्या सीमेला मॅक्मोहन रेषा असे नाव आहे ही सीमा लॉर्ड कर्झनच्या काळात 1905 मध्ये निर्माण करण्यात आलेली आहे . तर भारत-भूतान, भारत-नेपाळ, भारत-म्यानमार यांच्यादरम्यानची सीमा हिमालय पर्वतांनी विभागलेली आहे, भारत – अफगाणिस्तान दरम्यान ची सीमा1892 मध्ये ड्युरँड या नावाने निर्माण करण्यात आलेली आहे तर भारत – पाकिस्तान व भारत-बांगलादेश यांची सीमा 1947 मध्ये रॅडक्लिफ  नावाने निर्माण करण्यात आलेली आहे.

क्रमांकसीमावर्ती देश सीमेवर असलेले भारतीय राज्य सर्वात लांब राज्याची सीमा सीमा विस्तार संयुक्त राष्ट्रात सामील
1)पाकिस्तान गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू – काश्मीर राजस्थान 3310ऑक्टोबर
2)अफगाणिस्तान जम्मू काश्मीर (पाक अधिकृत)जम्मू काश्मीर 80नोव्हेंबर
3)चीन जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर 3917डिसेंबर
4)नेपाळ उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम बिहार 1752डिसेंबर
5)भूतान सिक्कीम, पं. बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेशआसाम 587एप्रिल
6)म्यानमार अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराममिझोराम 1458सप्टेंबर
7)बांग्लादेश पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम पश्चिम बंगाल 4096ऑक्टोबर
सीमेवर असलेले भारतीय राज्य

क्रमांकनावेठिकाणे
1)8° चैनल मालदीव व मिनीकॉयच्या मध्ये
2)9° चॅनल लक्षद्वीप व मिनीकॉयच्या मध्ये
3)10° चॅनल छोटा अंदमान व कार निकोबारचा मध्ये
4)ग्रँड सामुद्रधुनी सुमात्रा (इंडोनेशिया ) व निकोबारच्या मध्ये
5)सर आणि कोरी खाडी पश्चिम गुजरात
6)डुंकंन पास दक्षिण अंदमान व लघु अंदमानच्या मध्ये
7)कोको सामुद्रधुनी कोको द्वीप (म्यानमार) व उत्तरी अंदमानच्या मध्ये
8)पाल्क खाडी तामिळनाडू व श्रीलंकेच्या मध्ये
9)मन्नारचे आखात दक्षिण पूर्व तामिळनाडू व श्रीलंका
10)लक्षद्वीप समुद्र लक्षद्वीप व मलबार चा किनारा
11)खंबायत चे आखात पूर्व गुजरात, नर्मदा आणि तापी
12)कच्छचे आखात पश्चिमी गुजरात
13)माहिमची खाडी एक पातळ सी निवेशिका, मुंबई
फ्रान्सच्या अधीन क्षेत्र

क्रमांकफ्रान्सच्या अधीन क्षेत्र क्षेत्रफळ (चौरस किमी)सामील वर्ष
1)चंद्रनगर2619 जून, 1946
2)पॉंडिचेरी2801 नोव्हेंबर, 1954
3)कारिकल1351 नोव्हेंबर, 1954
4)माहे591 नोव्हेंबर, 1954
5)यानम151 नोव्हेंबर, 1954
फ्रान्सच्या अधीन क्षेत्र
पोर्तुगालच्या अधीन क्षेत्र

क्रमांकपोर्तुगालच्या अधीन क्षेत्र क्षेत्रफळ (चौ. किमी)सामील वर्ष
1)दादर–21 जुलै, 1954
2)नगर हवेली 5542 ऑगस्ट, 1954
3)दमण आणि दीव 3519 डिसेंबर, 1961
4)गोवा3,09021 डिसेंबर, 1961
पोर्तुगालच्या अधीन क्षेत्र

भारतातील प्रमुख बंदरे : पश्चिम किनारपट्टी
राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य

No comments:

Post a Comment

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...