Ads

19 December 2021

विज्ञान : विद्युत चुंबकचे नियम व गुणधर्म

1⃣ जडत्व :

▪ जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.

▪ वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.

2⃣ संतुलित बल :

▪ संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.

▪ दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.

3⃣ असंतुलित बल :

▪ जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.

▪ वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.

4⃣ बल :

▪ बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.

▪ बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.

▪ बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.

▪ वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.

▪ स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.

ध्वनी

'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.
ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.

ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.

प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.

कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.

उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने

ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.

वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.

ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.

ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.

प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.
ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :

जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.

संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.

संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.

विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.

विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.

दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.

त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.

वारंवारता :

घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.

एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.

ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.

त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.

(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )
तरंगकाल :

लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.

माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.

तो 'T'ने दर्शविला जातो.

SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.

u=1/t

ध्वनीचा वेग :

तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.

वेग=अंतर/काल

एका तरंगकालात कापलेले अंतर,

वेग= तरंगलांबी/तरंगकाल

वेग= वारंवारता*तरंगलांबी

मानवी श्रवण मर्यादा :

मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.

पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.

श्रव्यातील ध्वनी :

20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.

निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.

उपयोग :

जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.
ध्वनीचे परिवर्तन :

ध्वनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.

ध्वनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.

प्रतिध्वनी :

मूल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.

अंतर= वेग*काल

निनाद :

एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.

सोनार (SONAR):

Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.

पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.

भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा

नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण.  हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.

सौर-दिन :- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्‍या दोन मध्यान्हीमधील कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण वर्षातील सौर-दिनांच्या कालावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन सर्वसाधारणपणे 24 तासांचा असतो.

प्रकाश वर्ष :– प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3×10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46×10)12 किमी

विस्थापन :- एखाद्या वस्तूने आपल्या स्थानात केलेल्या बदलाला विस्थापन असे म्हणतात.

गती/चाल :- एकक काळात वस्तूने आक्रमिलेल्या अंतराला त्या वस्तूची गती/चाल असे म्हणतात.

वेग :- एकक काळात एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. वेगाचे एकक मीटर/सेकंद हे आहे.

त्वरण :- एकक काळामध्ये वस्तूच्या वेगांत झालेल्या बदलास त्वरण असे म्हणतात.

संवेग :- संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार आघातापूर्वी व नंतर संवेग समान असतो. अनेक वस्तूंचा वेग कायम असेल आणि वस्तुमान भिन्न असेल तर संवेग कायम नसतो. वस्तुमान = वेग x संवेग

कार्य :– वस्तूवर बलाची क्रिया केली असता त्या वस्तूचे बलाच्या रेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही सादिश राशी असून कार्य = बल x वस्तूने आक्रमिलेले अंतर

ऊर्जा :- पदार्थामध्ये असलेल्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

स्थितीज ऊर्जा :- एखाद्या पदार्थात त्याच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे जी ऊर्जा सामाविली जाते. त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात, पदार्थातील स्थितीज ऊर्जा त्याचे भूपृष्ठापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. PE=mgh येथे PE म्हणजे स्थितीजन्य ऊर्जा, = mg म्हणजे वस्तुमान, म्हणजे गुरुत्वाकर्षनीय प्रवेग, =h म्हणजे पदार्थाची उंची.

गतीज ऊर्जा :- पदार्थाला मिळालेल्या गतीमुळे त्याच्या अंगी जी कार्यशक्ती प्राप्त होते तिला गतीजन्य ऊर्जा म्हणतात. KE=1/2 mv², या ठिकाणी KE म्हणजे गतीजन्य ऊर्जा, m म्हणजे वस्तुमान, v² म्हणजे वेग गती जेवढी जास्त तेवढी गतीज ऊर्जा जास्त असते.

16 December 2021

विज्ञान

💐विज्ञान 💐
 
➡️ हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
👉 मंदावते

➡️ शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
👉 साखर

➡️ सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
👉 नसते

➡️ प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
👉 पाणी

➡️ निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात ?
👉 हिरव्या वनस्पती

➡️ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
👉 बुरशी

➡️ क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
👉 विरंजक चुर्ण

➡️  ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
👉 असंतृप्त

➡️ अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
👉 सुक्ष्मजीव

➡️ कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
👉 त्वचा

➡️ समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
👉 ऊती

➡️ १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
👉 जंतूपासून रोगोद्भव

ज्ञानेंद्रिये (Sensory Organs):-

◆ प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात-
डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.

■ डोळे (Eyes):
◆ ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.
◆ पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.
◆ अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.
========================
■ बुबुळ (Cornea):-
◆ नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.
◆ बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.
========================
■ दृष्टिपटल (Retina):
◆ हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.
========================
■ दृष्टीसातत्य :
◆ वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.
========================
■ दृष्टिदोष (Defects Of Vision):
◆ दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.
१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Near-sightedness):
◆ जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते.
◆ प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.
उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा
========================
२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):
◆ दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.
उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा.
========================
३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):
◆ बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो.
◆ त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.
उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.
========================
४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):
◆ वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.
उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.
========================

Chemistry Questions

✍️1.तरंग चलती हैं, तो वे अपने साथ ले जाती हैं
Ans : - -ऊर्जा

2.: - सूर्य ग्रहण के समय सूर्य का कौन-सा भाग दिखाई देता है?
Ans : - किरीट

3.: - कपड़ों से जंग के धब्बे हटाने के लिये प्रयोग किया
Ans : - -ऑक्ज़ैलिक अम्ल

4.: - गन्ने में ‘लाल सड़न रोग’ किसके कारण उत्पन्न होता है?
Ans : - कवकों द्वारा

5.: - टेलीविजन का आविष्कार किसने किया था?
Ans : - जे. एल. बेयर्ड

6.: - किस प्रकार के ऊतक शरीर के सुरक्षा कवच का कार्य करते हैं?
Ans : - एपिथीलियम ऊतक

7.: - मनुष्य ने सर्वप्रथम किस जन्तु को अपना पालतू बनाया?
Ans : - कुत्ता

8.: - किस वैज्ञानिक ने सर्वप्रथम बर्फ़ के दो टुकड़ों को आपस में घिसकर पिघला दिया?
Ans : - डेवी

9: - हीरा चमकदार क्यों दिखाई देता है?
Ans : - सामूहिक आंतरिक परावर्तन के कारण

10.: - ‘गोबर गैस’ में मुख्य रूप से क्या पाया जाता है।
Ans : - मिथेन

11.: - निम्न में से कौन-सा आहार मानव शरीर में नये ऊतकों की वृद्धि के लिए पोषक तत्व प्रदान करता है?
Ans : - पनीर

12.: - निम्न में से कौन एक उड़ने वाली छिपकली है?
Ans : - ड्रेको

13.: - अंगूर में कौन-सा अम्ल पाया जाता है?
Ans : - टार्टरिक अम्ल

14.: - कैंसर सम्बन्धी रोगों का अध्ययन कहलाता है
Ans : - oncology

15.: - घोंसला बनाने वाला एकमात्र साँप कौन-सा है?
Ans : - किंग कोबरा

16.: - भारत में पायी जाने वाली सबसे बड़ी मछली कौन-सी है?
Ans : - ह्वेल शार्क

17.: - दालें किसका एक अच्छा स्रोत होती हैं?
Ans : - प्रोटीन

18.: - देशी घी में से सुगन्ध क्यों आती है?
Ans : - डाइएसिटिल के कारण

19.: - इन्द्रधनुष में किस रंग का विक्षेपण अधिक होता है?
Ans : - लाल रंग

20.: - सूर्य की किरण में कितने रंग होते हैं?
Ans : - 7

21.: - ‘टाइपराइटर’ (टंकण मशीन) के आविष्कारक कौन हैं?
Ans : - शोल्स

22.: - सिरका को लैटिन भाषा में क्या कहा जाता है।
Ans : - ऐसीटम

23.: - दूध की शुद्धता का मापन किस यन्त्र से किया जाता है?
Ans : - लैक्टोमीट

24.: - पृथ्वी पर सबसे अधिक मात्रा में पाया जाने वाला धातु तत्त्व कौन-सा है?
Ans : - ऐलुमिनियम

25.: - मोती मुख्य रूप से किस पदार्थ का बना होता है?
Ans : - कैल्सियम कार्बोनेट

26.: - मानव शरीर में सबसे अधिक मात्रा में कौन-सा तत्व पाया जाता है?
Ans : - ऑक्सीजन

27.: - आम का वानस्पतिक नाम क्या है?
Ans : - मेंगीफ़ेरा इण्डिका

28.: - कॉफी पाउडर के साथ मिलाया जाने वाला ‘चिकोरी चूर्ण’ प्राप्त होता है
Ans : - -जड़ों से

29.: - ‘विटामिन-सी’ का सबसे अच्छा स्त्रोत क्या है?
Ans : - आंवला

30.: - सबसे अधिक तीव्रता की ध्वनि कौन उत्पन्न करता है?
Ans : - बाघ

31.: - मानव शरीर में सबसे लम्बी कोशिका कौन-सी होती है?
Ans : - तंत्रिका कोशिका

32.: - दाँत मुख्य रूप से किस पदार्थ के बने होते हैं?
Ans : - डेंटाइन के

33.: - किस जंतु की आकृति पैर की चप्पल के समान होती है?
Ans : - पैरामीशियम

34.: - निम्न में से किस पदार्थ में प्रोटीन नहीं पाया जाता है?
Ans : - चावल

35.: - मानव का मस्तिष्क लगभग कितने ग्राम का होता है?
Ans : - 1350

36.: - रक्त में पायी जाने वाली धातु है
Ans : - -लोहा

37.: - मांसपेशियों में किस अम्ल के एकत्रित होने से थकावट आती है?
Ans : - लैक्टिक अम्ल

38.: - किण्वन का उदाहरण है
Ans : - -दूध का खट्टा होना,खाने की ब्रेड का बनना,गीले आटे का खट्टा होना

39.: - केंचुए की कितनी आँखें होती हैं?
Ans : - एक भी नहीं

40.: - गाजर किस विटामिन का समृद्ध स्रोत है?
Ans : - विटामिन A

सौरऊर्जा

❇️ सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात.

▪️सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात.

▪️सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्ज मिळते. यातली सुमारे ३०% परावर्तित होते त उरलेली वातावरणात शोषली जाते.

▪️ या ऊर्जेमुळे वातावरण व जमीन तापते. वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो व पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते.

▪️सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे.

▪️सौर ऊर्जेचा उपयोग माणसे रोजच्या व्यवहारांमध्ये नेमाने करत नसल्याने तिला अपारंपरिक ऊर्जा म्हणतात. असे असले तरी, सौर ऊर्जा हे अक्षय ऊर्जाचा एक मोलाचा स्रोत आहे.

▪️सौर ऊर्जा मिळवण्याचाठी फोटोव्होल्टेइक सिस्टिम, केंद्रीकृत सौर ऊर्जा आणि सौर वॉटर हीटरचा वापर होतो.

विज्ञान : धातू व त्यांचे उपयोग


1⃣ *तांबे :*

▪ भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.
▪ विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

2⃣ *लोखंड :*

▪ ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता
▪ ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता

3⃣ *अॅल्युमिनीअम :*

▪ घरातील भांडी, विमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता
▪ चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता
▪ विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.

4⃣ *जस्त :*

▪ लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.
▪ विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.
▪ धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.

5⃣ *चांदी :*

▪ दागिने तयार करण्याकरिता
▪ दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता
▪ छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता
▪ विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता

नेत्ररोग (Eye Disease):-


१) रंग आंधळेपणा (Colour Blindness):
◆ अनुवांशिक व बरा न होणारा रोग सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही.
◆ विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही .
◆ फक्त पुरुषांनाच होतो.
========================
२) मोतीबिंदू (Cataract):
◆ डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते.
उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते.
◆ मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.
========================
३) काचबिंदू (Glaucoma):
◆ हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.
◆ नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात.
◆ काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते.
◆ डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.
========================
४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):
◆ व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.
========================
५) डोळे येणे (Conjuctivitis):
◆ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग. डोळे लाल होऊन खूप दुखू लागतात व चिकट पाणी येते.
========================
६) खुपरी (Trachoma):
◆ संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो.
◆ प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात.डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.
७) रांजणवाडी (Meibomian Cyst):
◆ पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.
◆ या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.
◆ मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाश -संवेदी (Lightsensitive) पेशींनी बनलेले असते. या पेशी दोन प्रकार / आकाराच्या असतात. (दंडाकार व शंकाकार.)
◆ प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची/ अंधुकतेची माहिती पुरवितात.
◆ दंडाकार पेशी अंधुक प्रकाशाससुद्धा प्रतिसाद देतात परंतु शंकाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते.
◆ कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे. मात्र, त्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्वाचे कार्य कानामार्फत केले जाते.
◆ त्वचा हे स्पर्शाचे इंद्रिय असून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे. त्वचेच्या वरील थरामधून मेलॅनिन नावाचा द्रव स्त्रवत असतो, जो अतिनील किरणांना अपारदर्शी असतो. त्यामुळे त्वचेचा कँसर होण्याचे टळते.
◆ जिभेला पाच प्रक्रारच्या चवी कळतात. गोड, खारट, आंबट, कडू व तुरट.
◆ तिखट ही खरी चव नसून तो केवळ प्रतिसाद असतो.
◆ जिभेच्या शेंडयावर गोड चवीचे आकलन होते. तर, जिभेच्या सर्वात आतील भागावर कडू चवीचे आकलन होत असते.जिभेचे व नाकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी जस्त या खनिजक्षाराची आवश्यकता असते.
◆ मानवी शरीर कमी केसाळ असल्याने त्वचेतून उष्णतेचा ऱ्हास जलद होतो.
◆ मानवाचे वासाचे ज्ञान कुत्रा, मांजर, हरीण यांच्या तुलनेने फारच कमी आहे. तसेच नाकातील चेतांची टोके बराच काळ एकाच वासाची संवेदना ग्रहण करीत राहिल्यास त्या विशिष्ट वासासाठी ती बधिर होतात.
◆ मानवी डोळ्यांना विधुतचुंबकीय किरणांचा फारच थोडा भाग दिसू शकतो. मानव अतिनील किरण बघू शकत नाही. मात्र फलमाशी सारखे कीटक ते बघू शकतात.
◆ पीट वायपर जातीचा साप इन्फ्रारेड किरण बघू शकतो, म्हणूनच तो गडद अंधारातही उंदरासारखे भक्ष्य टिपू शकतो.
◆ मानवी डोळ्यातील दृष्टिपटलात फारच कमी दंडपेशी असल्याने त्याची रात्रीची दृष्टी कमकुवत आहे. मांजर, हरीण, घुबड यांसारख्या अनेक प्राण्याच्या डोळ्यात मात्र मोठया प्रमाणात दंडपेशी असल्याने त्यांची रात्रीची दृष्टी चांगली असते.
◆ ससा, घोडा, गुरे ही आवाजाच्या दिशेने त्यांचा बाह्यकर्ण वळवू शकतात, मात्र मानव आपला बाह्यकर्ण हलवू शकत नसल्याने त्याला कमी ध्वनिलहरी संकलित करता येतात.