19 November 2019

यशाचा राजमार्ग

कृपया खालील माहिती वेळ काढून अवश्य वाचा अन् इतरांना पाठवा/सांगा आपल्याला गरज नसेल तरीही...कारण आपण पाठवत असलेल्या एका मेसेज मुळे अन् आपण इतरांना सांगत असलेल्या माहिती मुळे जर कोणाचे आयुष्य घडत असेल तर काय हरकत आहे. कारण आम्ही खास आपणासाठी यशाचा राजमार्ग तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांकरीता त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न हे कोणत्याही अडथळ्याविना साकारता यावे व त्यासाठी MPSC परीक्षेचा अभ्यास करता यावा. प्रत्येक वेळी अमुक क्लास लावल्यावरच आम्ही पास होऊ,अमुक शहरात गेल्यावरच चांगले मार्गदर्शन मिळेल हे कधीपर्यंत???
सर्वच विद्यार्थी पुणे सारख्या सी.टी. मध्ये किंवा इतर कोणत्याही मोठ्या सी.टी. मध्ये राहुन अभ्यास करू शकत नाही किंवा क्लास लावु शकत नाहीत.विशेषतः अंध/अपंग/गरीब विद्यार्थी/महाविद्यालयीन विद्यार्थी/गृहिणी तसेच नोकरदार वर्ग क्लास लावु शकत नाहीत.खास त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत MPSC ONLINE COURSE...
या क्लास मार्फत जे पुणे सारख्या ठिकाणी Offline  क्लास मध्ये शिकवले जाते.अन् टेस्ट घेतल्या जातात ते सर्व तर आम्ही करणारच आहोत. पण आमच्या क्लास ची विशेषतः म्हणजे इतर Offline क्लास मध्ये एखाद्या विषयातील घटक-उपघटक एकदाच शिकवला जातो.कोणतीही टेस्ट एकदाच घेतली जाते.पण आमच्या ONLINE क्लास मार्फत एखाद्या घटक-उपघटकांवरील Lectures आपण कितीही वेळा पाहु शकतो कितीही वेळा टेस्ट देऊ शकतो.याचा फायदा असा की,एखाद्या घटक-उपघटक आपणास समजला नाही तर ते Lectures आपण परत-परत पाहु शकतो.आणि एखाद्या टेस्ट मध्ये जर आपणास कमी मार्क मीळाले तर ती टेस्ट आपण पुन्हा देऊ शकतो.आणखी महत्वाचे म्हणजे हा कोर्स आपण केव्हाही,कोठेही आणि कितीही वेळा पाहु शकतो....
चला तर या क्लास मध्ये शिकवले जाणारे विषय -घटक-उपघटकांची नावे पाहुया-

Syllabus:

1)अंकगणित(Maths)

1. संख्या
2. विभाज्यता
3. लसावी मसावी
4. अपूर्णांक
5. दशांश अपूर्णांक
6. घातांक
7. सरासरी
8. समीकरण
9. पदावली
10. गुणोत्तर व प्रमाण
11. काळ काम वेग
12. वेळ वेग अंतर
13. शेकडेवारी
14. नफा तोटा
15. व्याज
16. भागीदारी
17. संकीर्ण गणिते
18. भूमिती

2)बुद्धिमत्ता चाचणी(Reasoning)

1. दिशा
2. नातेसंबंध
3. वयवारी
4. आदान- प्रदान
5. क्रमवार मांडणी
6. फासे
7. वेन आकृत्या
8. कूटप्रश्न
9. आकृत्यांची संख्या
10.मोजणे
11. घड्याळ
12. दिनदर्शिका
13. सांकेतिक तुलना
14. बायनरी लॉजिक
15. निष्कर्ष तर्क पद्धती
16. प्रतिपादन व कारणे
17. विधाने आणि गृहितके
18. विधाने आणि निष्कर्ष
19. विधाने आणि कृती
20.क्रम
21. अंकमालिका
22. वर्ण मालिका
23. सहसंबंध
24. विसंगत घटक
25. संख्या शोधा
26. सांकेतिक भाषा
27. आकृती शृंखला
28. आकृती सहसंबंध
29. विसंगत आकृती
30. आरशातील प्रतिमा
31. पाण्यातील प्रतिमा
32. कागदाची घडी
33. आकृती पूर्ण करा
34. लपलेली आकृती

3)इंग्रजी व्याकरण

1. Parts of speech
2. Noun
3. Pronoun
4. Adjective
5. Verb
6. Adverb
7. Preposition
8. Conjunction
9. Interjection
10. Synthesis
11. Tense
12. Types of sentences
13. Change the voice
14. Direct-indirect speech
15. Degree
16. Clauses
17. Transformation
18. Question tag
19. Articles
20. Punctuation mark
21. Figures of speech

4)मराठी व्याकरण

1. मराठी भाषा ओळख आणि भाषा विज्ञान
2. मराठी वर्णमाला
3. जोडाक्षरे
4. संधी
5. नाम
6. लिंगविचार
7. वचन विचार
8. विभक्ती विचार
9. सामान्य रूप
10. सर्वनाम
11. विशेषण
12. क्रियापद
13. क्रियापद-काळ व अर्थ
14. क्रियाविशेषण अव्यय
15. उभयान्वयी अव्यय
16. केवलप्रयोगी अव्यय
17. प्रयोग
18. वाक्याचे प्रकार व रूपांतर
19. वाक्य पृथ्थकरण
20. समास
21. भाषेचे अलंकार
22. वृत्ते

5)इतिहास

5:1)आधुनिक इतिहास (Modern History)
(भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास )
1.शिक्षण
2.वृत्तपत्रे
3.रेल्वे
4.टपाल व तारे
5.उद्योगधंदे
6.जमीन सुधारणा व खालसा धोरण
7.युद्धे
8.तैनाती फौज धोरण
9.1857 पर्यंतचे ब्रिटिश
10.राज्याची रचना
11.सामाजिक-सांस्कृतिक बदल
12.सामाजिक व आर्थिक जागृती
13.1857 चा उठाव आणि त्यानंतर
14.इंडियन नॅशनल काँग्रेस (1885-1947)
15.भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास
16.गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ
17.स्वातंत्र्यानंतर भारत
18.समाजसुधारक

5:2)मध्ययुगीन इतिहास(Medieval History)
1.गुलाम वंश
2.खिलजी वंश
3.तुगलक वंश
4.सय्यद वंश
5.दिल्ली सल्तनत मधील
6.राज्यव्यवस्था
7.मुघल कालखंड प्रारंभ
8.अकबर कालखंड
9.जहांगीर व शहाजहान जीवनपट
10.औरंगजेब कालीन साम्राज्य
11.उत्तर मुगल कालीन भारत
12.विजयनगर साम्राज्य
13.बहामनी साम्राज्य
14.वाकाटक राष्ट्रकूट व प्रतीहार
15.चोळ चालुक्य व पाल साम्राज्य
16.सूफी आंदोलन
17.भक्ती आंदोलन
18.मराठा साम्राज्य
19.पेशव्याचे कार्य
20.मुघल ई स्थापत्य कला

5:3)प्राचीन इतिहास(Ancient History)
1.हडप्पा संस्कृती
2.वेदिक कालखंड
3.जैन धर्म
4.बौद्ध धर्म
5.सोळा महाजनपद
6.मौर्यकालीन भारत
7.मोर्योत्तर काळ
8.गुप्त घराणे
9.वाकटक घराणे
10.वर्धन साम्राज्य
11.पल्लव घराणे
12.चालुक्य साम्राज्य

6)भूगोल

6:1)जग (World)
1. विश्व व सूर्यकूल
2. जग:प्रमुख खंड
3. भूरूप विकास निर्मिती सिद्धांत
4. प्रमुख भूरूपे
5. पृथ्वीचे अंतरंग आणि खडक खनिजे
6. भुकंप आणि ज्वालामुखी
7. नदीची कार्य
8. हिमनदीचे कार्य
9. वाऱ्याचे कार्य
10. सागरी लाटांचे कार्य
11. वातवरण
12. वायुदाब
13. आद्रता आणि वृष्टी
14. सागरतळ रचना
15. महासागर आणि सागर प्रवाह
16. लोकसंख्या
17. मानवी वस्ती
18. मृदा
19. नैसर्गिक वनस्पती
20. कृषी
21. खनिजे
22. वाहतूक

6:2)भारत
1· भारत सामान्य माहिती
2· भारताची प्राकृतिक रचना
3· भारताची भू-आकृती आणि संरचना
4· नदीप्रणाली भारताचे हवामान
5· नैसर्गीक संपदा आणि वन्यजीवन
6· मृदा भारतीय शेती
7· भारत खनिज संसाधन
8· उद्योगधंदे
9· वाहतूक
10· लोकसंख्या
11· वसाहत आणि स्थलांतरण
12· पर्यटण

6:3)महाराष्ट्र
1.प्राकृतिक भूगोल
2.राजकीय भूगोल
3.हवामान
4.नद्या
5.वने
6.खनिजे
7.मृदा
8.पिके
9.वाहतूक व दळणवळण
10.शहरे
11.उद्योग
12.लोकसंख्या
13.स्थलांतर
14.किल्ले

7)कृषी(Agriculture)

1. कृषी परिस्थितीकी
2. हवामान
3. मृदा
4. जल व्यवस्थापन

8)पर्यावरण(Environment)

1.परिस्थितीकी
2.जैवविविधता
3.हवामान बदल

9)भारतीय संविधान(Indian polity)

1. संविधान निर्मिती
2. संविधान वैशिष्ट्ये
3. प्रस्तावना
4. राज्यांची निर्मिती
5. नागरिकत्व
6. मूलभूत हक्क
7. मार्गदर्शक तत्वे
8. मूलभूत कर्तव्ये
9. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती
10. पंतप्रधान व मंत्रिपरिषद
11. संसद
12. संसदेचे पदाधिकारी
13. संसद कार्यपद्धती
14. संसदीय समिती
15. अध्यादेश
16. नियंत्रक व महालेखा परीक्षक
17. सर्वोच्च न्यायालय
18. राज्यपाल
19. मुख्यमंत्री व मंत्रिपरिषद
20. राज्य विधिमंडळ
21. राज्य विधिमंडळाचे पदाधिकारी
22. राज्य विधिमंडळ कार्यपद्धती
23. सचिवालय
24. जिल्हाप्रशासन
25. पंचायत राज
26. महाधिवत्ता
27. केंद्र राज्य संबंध
28. वित्त विषयक तरतुदी
29. घटनादुरुस्ती
30. अनुसूची
31. लोकपाल
32. आयोग (घटनात्मक व बिगर घटनात्मक)
33. प्रशासकीय न्यायाधिकरणे

10)राजकारण व कायदे(politics & Laws)

1. निवडणूक प्रक्रिया व निवडणूक विषयक तरतुदी
2. दबावगट
3. राजकीय पक्ष
4. शिक्षण
5. प्रसारमाध्यमे
6. प्रशासकीय कायदा
7. केंद्र व राज्य शासनाचे विशेषाधिकार
8. काही सुसंबद्ध कायदे
9. समाज कल्याण व सामाजिक विधिविधान
10. सार्वजनिक सेवा
11. सरकारी खर्चावर नियंत्रण

11)अर्थव्यवस्था व कृषी(Economics&Agri)

1. राष्ट्रीय उत्पन्न
2· दारिद्र्य बेरोजगारी व विकास
3· पैसे व चलन
4· चलनवाढ
5· भारतीय वित्तीय बाजार
6· रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
7· सार्वजनिक वित्त
8· भारतीय कररचना
9· कृषी
10· सहकार चळवळ
11· उद्योग
12· सेवाक्षेत्र
13· पायाभूत सुविधा
14· परकीय व्यापार व व्यवहार तोल
15·उदारीकरण,खासगीकरण,जागतिकीकरण
16· आंतरराष्ट्रीय संघटना
17· भारतातील आर्थिक नियोजन
18· लोकसंख्या
19· शाश्वत विकास

12)सामान्य विज्ञान(General Science)

12:1)रसायनशास्त्र(Chemistry)
1.द्रव्याची संकल्पना
2.द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण
3.अनु व त्यांची रचना
4.आवर्तसारणी
5.मूलद्रव्याचे वर्गीकरण
6.खनिजे व धातुके
7.कार्बनची जग
8.आम्ल,आम्लारी व क्षार
9.रासायनिक अभिक्रिया
10)किरणोत्सारीता
11)अंण्विक रसायनशास्त्र

12.2)भौतिकशास्त्र(Physics)
1.मोजमापन
2.गती व गतीचे प्रकार
3.गतीविषयक नियम
4.गुरुत्वाकर्षण
5.कार्य,ऊर्जा व शक्ति
6.ध्वनी
7.प्रकाश
8.दाब
9.चुंबकत्व
10.विद्युत धारा
11)विद्युत चुंबकीय पट्टा
12)तारे व आपली सूर्यमाला

12:3)जीवशास्त्र(Biology)
1.रक्ताभिसरण संस्था
2.उत्सर्जन संस्था
3.पचन संस्था
4.अस्थिसंस्था
5.प्रजनन संस्था
6.मानवातील समन्वय
7.मानवातील ग्रंथी,संप्रेरके व विकरे
8.पेशी-सजीवांचे एकक
9.ऊती-ऊती चे प्रकार
10.जैवविविधता
11.वनस्पतीचे वर्गीकरण
12.प्राण्यांचे वर्गीकरण
13.पोषण
14.उत्क्रांती

12:4)आरोग्यशास्त्र
1.रोग,लक्षणे व चिन्हे
2.जीवाणू व जीवाणूजन्य रोग
3.विषाणू व विषाणूजन्य रोग
4. कवके,आदिजीव आणि कृमी
5.असंसर्गजन्य रोग
6.रक्तगट व संबंधित रोग

13)तंत्रज्ञान(Technology)

1. ऊर्जा
2. संगणक व माहिती तंत्रज्ञान
3. तंत्रज्ञान
4. जैव तंत्रज्ञान
5. भारताचे आण्विक धोरण
6. आपत्ती व्यवस्थापन

14) मानव संसाधन विकास(HRD)

1. भारतातील मानव संसाधन विकास
2. शिक्षण
3. व्यावसायिक शिक्षण
4. आरोग्य
5. ग्रामीण विकास

15)मानवी हक्क(HR)

1. जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र
2. बाल विकास
3. महिला विकास
4. युवकांचा विकास
5. आदिवासी विकास
6. सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास
7. वयोवृद्ध लोकांचे कल्याण
8. कामगार कल्याण
9. विकलांग लोकांचे कल्याण
10. लोकांचे पुनर्वसन
11.आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना
12.ग्राहक संरक्षण
13.मूल्ये व नितितत्व

विडिओ लेक्चर + आणि चालु घडामोडीसाठी Additional Video Lectures+Test...

यशाचा राजमार्ग च्या MPSC ONLINE COURSE मध्ये वरील सर्व विषय-घटक व उपघटकांवर डेली लेक्चर असेल अन् डेली टेस्टही असेल...तसेच इतर काही घटक उपघटकांवर लेक्चर असेल कारण येथे आपण सर्वच घटकांची नावे देऊ शकत नाही. त्यामुळे मुख्य घटकांचीच नावे दिली आहे. अन् लेक्चर बनवण्या मागचा उद्देश हा होता की अंध मुलांना ही MPSC परीक्षेचा अभ्यास करता यावा.त्यामुळे हे लेक्चर अशाप्रकारे बनवले आहे की त्या मुलांना इतर कोणतेही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही.जर हे लेक्चर अंध मुलांना समजत असेल तर एखाद्या डोळस मुलास समजण्यास काहीच हरकत नसावी तसेच चालू घडामोडी लेक्चर आणि त्यावर टेस्ट असेल आणि आयोगाच्या टेस्ट प्रमाणे 100 Full Length टेस्ट असेल तसेच MPSC साठी लागणारे  मार्गदर्शनही वेळोवेळी उपलब्ध असेल.खास आपणासाठी काही DEMO LECTURE VIDEO आणि टेस्ट दिल्या आहे.त्या एकदा आवश्य पहा कारण पुढील सर्व लेक्चर आणि टेस्ट याच पद्धतीने असेल त्यामुळे अवश्य पहा म्हणजे आपणास कळेल...

अधिक माहितीसाठी संपर्क करा:
यशाचा राजमार्ग
Website: www.yashacharajmarg.com
What'sApp No:7798653068
यशाचा राजमार्ग ला जॉईन होण्यासाठी :- click here
खास आपणास आव्हान आहे की हे सर्व मेसेज/व्हिडिओ लेक्चर आपल्या Contact मधील सर्वांना पाठवा अन् आपल्या WhatsApp/Facebook/Messenger/Instagram/Telegram group वर टाकायला विसरू नका...म्हणजे गरजु पर्यंत पोहचेल...आणि माझा 7798653068 हा नंबर आपल्या शैक्षणिक ग्रुप मध्ये अॅड करा आणि आपण ज्या शैक्षणिक ग्रुप मध्ये अॅड आहात त्या सर्व ग्रुप मध्ये माझा नंबर अॅड करायला सांगा. म्हणजे मी पण त्यावर शैक्षणिक माहिती टाकेल...अन् त्याचा फायदा इतरांना होईल....धन्यवाद
आम्ही वाट पाहत आहोत
आपल्या यशाची;
आपले अधिकारी होण्याचे
स्वप्न पूर्ण होण्याची!!!

18 November 2019

चला जाणून घेऊ - महत्त्वाच्या घडामोडी

● आजपासून (दि.18) संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार सुरु; वादग्रस्त नागरिकत्व विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न

● निर्भया खटला अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्याची पालकांची मागणी; आजपर्यंत 'निर्भया'ची सुनावणी घेणाऱ्या दोन न्यायाधीशांची झाली बदली

● एअर इंडिया, भारत पेट्रोलिअम चार महिन्यांत विकणार; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

● नागरी सहकारी बँकांच्या नियंत्रणाचे अधिकार रिझव्‍‌र्ह बँकेला द्यावेत; रिझव्‍‌र्ह बँके चे संचालक सतीश मराठे यांची सरकारला सूचना

● थंडीमुळे श्रीनगरमध्ये राजकीय कैद्यांना हलविण्याची कसरत; सेंटॉर हॉटेलऐवजी आता आमदार निवासात मुक्काम

● ओवेसी आणि इसिसचा दहशतवादी अल बगदादीमध्ये काहीही फरक नाही : शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी

● लुसिआनाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना राजकीय धक्का; पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचा गव्हर्नर आला निवडून 

● “मुस्लिमांना बेदखल करण्यासाठी भारताने केला ‘एनआरसी’च्या हत्याराचा वापर”; अमेरिकी धार्मिक स्वातंत्र्य आयोगाची टीका

● कसोटी क्रमवारीत गोलंदाज मोहंमद शमी 7 व्या स्थानी तर मयंक अग्रवाल 11 व्या स्थानावर

●  विश्वसुंदरी मानुषी छिल्लर करणार 'पृथ्वीराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री; अक्षय कुमार असणार मुख्य भूमिकेत

जनरल नॉलेज : चालू घडामोडी

1) जीनोम सिक्वेंसींगसाठी CSIR द्वारे कोणता प्रकल्प राबवविला जात आहे?
उत्तर : इंडिजेन

2) यावर्षीचा ‘भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI), गोवा’ या कार्यक्रमाची कितवी आवृत्ती असेल?
उत्तर : 50 वी

3) बीरेंदर सिंग यादव हे कोणत्या देशासाठी नवनियुक्त भारतीय राजदूत आहेत?
उत्तर : इराक

4) यावर्षीचा ‘दक्षता जागृती सप्ताह’ कोणत्या कालावधीत पाळला जाणार आहे?
उत्तर : 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019

5) भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त कोण आहेत?
उत्तर : शरद कुमार

6) लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली?
उत्तर : राधाकृष्ण माथूर

7) कोणत्या राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’ जाहीर केली?
उत्तर : उत्तरप्रदेश

8) “सखरोव्ह मानवाधिकार पारितोषिक 2019’ हा पुरस्कार कुणाला भेटला?
उत्तर : इलहम तोहती

9) ‘भारत-भुटान-नेपाळ ट्रान्स-बॉर्डर कंजर्व्हेशन पीस पार्क’ हा कोणत्या उद्यानाचा विस्तार आहे?
उत्तर : मानस राष्ट्रीय उद्यान

10) जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) भारत केव्हा पोलिओमुक्त म्हणून घोषित झाला?
उत्तर : सन 2014

अर्थव्यवस्था वाढीचा दर ४.२ टक्क्य़ांवर

दुसऱ्या तिमाहीबाबत स्टेट बँकेच्या अहवालाचा अंदाज.

पहिल्या तिमाहीत सहा वर्षांच्या  तळात पोहोचलेल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराची दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीची घटिका समीप असतानाच, हा वेग आणखी खालावण्याचा अंदाज आघाडीच्या बँकांनी व्यक्त केले आहे.

स्टेट बँकेचा संशोधनात्मक अहवाल तसेच सिंगापूरस्थित डीबीएस बँकेच्या मंगळवारच्या अभ्यास-अंदाज अहवालात भारताचा जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यानचा विकास दर ५ टक्क्यांच्या खूप खाली असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या तिमाहीत ४.२ टक्के तर संपूर्ण विद्यमान वित्त वर्षांत विकास दर ५ टक्के असेल, असे स्टेट बँकेने म्हटले आहे. वाहन विक्रीतील घसरण, विमानातून प्रवासी वाहतुकीतील घसरण तसेच बांधकाम व पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक घसरण याचा विपरित परिणाम देशाच्या विकास दरावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत, एप्रिल ते जूनदरम्यान भारताने ५ टक्के असा गेल्या सहा वर्षांतील तळ दाखविणारा विकास दर नोंदविला होता. तर दुसऱ्या तिमाहीतील स्थिती येत्या २९ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

सप्टेंबरमधील सात महिन्यांच्या तळातील औद्योगिक उत्पादन दर सोमवारीच स्पष्ट पुढे आला आहे.

विद्यमान २०१९-२० या संपूर्ण आर्थिक वर्षांत  ५ टक्के विकास दरानंतर पुढील वित्त वर्षांत देशाच्या अर्थप्रगतीचा दर ६.२ टक्के असेल, असा विश्वास स्टेट बँकेने तिच्या अहवालातून व्यक्त केला गेला आहे. परिणामी, डिसेंबरमधील पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँक अधिक प्रमाणात व्याजदर कपात करेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्याच्या अंदाजाबाबत मूडीजने व्यक्त केलेल्या पतदर्जाचा मोठा परिणाम जाणवणार नाही, असा दिलासाही स्टेट बँकेने दिला आहे. देशाच्या वित्तीय तुटीबाबतही चिंता करण्यासारखी स्थिती नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आली आहे.

विकासदर ५ टक्क्य़ांखाली घसरणार : डीबीएस

जूनअखेरच्या पहिल्या तिमाहीतील ५ टक्के अशा सहा वर्षांच्या तळातील विकास दराचा उल्लेख करतानाच सप्टेंबरमधील घसरत्या औद्योगिक उत्पादन दराची आठवण करून देताना डीबीएस बँकेने सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या तिमाहीतील विकास दर ५ टक्क्यांपेक्षाही कमी असेल, असे नमूद केले आहे.

औद्योगिक उत्पादन सात वर्षांच्या तळात

📌कमकुवत अर्थव्यवस्थेचा फटका ऐन दिवाळीपूर्वीच्या महिन्यातही बसला आहे. सप्टेंबरमधील देशाच्या औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक गेल्या सात वर्षांच्या तळात विसावला आहे.

📌केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने नव्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी, भांडवली बाजार व्यवहारादरम्यानच जाहीर केलेल्या देशाच्या औद्योगिक स्थितीबाबत चिंताजनक स्थिती कायम असल्याचे स्पष्ट झाले.

📌निर्मिती, कोळसा व पोलाद उत्पादन तसेच ऊर्जा क्षेत्रातील कमी निर्मितीमुळे सप्टेंबरमधील देशातील औद्योगिक उत्पादन ४.३ टक्क्य़ांपर्यंत घसरले. यापूर्वी एप्रिल २०१२ मध्ये, सात वर्षांपूर्वी औद्योगिक उत्पादन दर ०.७ अशा किमान स्तरावर होता. तर वर्षभरापूर्वी, सप्टेंबर २०१८ मध्ये हा दर ४.६ टक्के होता.

📌गेल्या महिन्यात निर्मिती क्षेत्राचा प्रवास ३.९ टक्क्य़ांपर्यंत घसरता राहिला आहे. वर्षभरापूर्वी तो ४.८ टक्के होता. तर ऊर्जानिर्मिती सप्टेंबर २०१८ मधील ८.२ टक्क्य़ांच्या तुलनेत यंदा २.६ टक्क्य़ांपर्यंत येऊन ठेपली आहे. कोळसा व पोलाद उत्पादन ८.५ टक्क्य़ांपर्यंत घसरले आहे. भांडवली वस्तू उत्पादन ६.९ टक्क्य़ांच्या तुलनेत थेट २०.७ टक्क्य़ांनी रोडावले आहे.

📌प्रमुख औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील एकूण २३ पैकी १७ क्षेत्रांची कामगिरी नकारात्मक राहिली आहे.

📌एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत देशाचा औद्योगिक उत्पादन दर १.३ टक्के असा राहिला आहे. वर्षभरापूर्वी, याच दरम्यान तो ४.८ टक्के होता.

📌देशाच्या विकास दराने गेल्या सहा वर्षांतील ५ टक्के असा सुमार तळ नोंदविला असतानाच निर्मिती, उद्योग अद्याप मंदीतून बाहेर निघालेले नाहीत.

10 सराव महत्त्वाचे प्रश्न उत्तरे 18/11/2019

1. सन 1996 हे लिपवर्ष आहे. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार येईल?

 शुक्रवार

 मंगळवार

 गुरुवार

 बुधवार

उत्तर : बुधवार

 2. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमला ही राधाची कोण?

 मावस बहीण

 पुतणी

 भाची

 आत्या

उत्तर :भाची

 3. K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?

 K

 J

 N

 S

उत्तर :K

 4. आर्या याच जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी गांधी जयंतीचा वार शनिवार होता. तर आर्याचा आठव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल?

 गुरुवार

 बुधवार

 सोमवार

 रविवार

उत्तर :गुरुवार

 5. खालील मालिकेत 8 नंतर 18 ही संख्या किती वेळा आली आहे?

 818881881811818181881888111818181181881

 9 वेळा

 10 वेळा

 11 वेळा

 8 वेळा

उत्तर :10 वेळा

 6. खालील गटामध्ये जोड अक्षरे शब्द किती आहेत?

 ग्रह, कृपा, कृषी, तंत्र, गृह, क्रम, कृती, क्षमा.

 पाच

 सात

 आठ

 वरील सर्व

उत्तर :पाच

 7. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?

 लाकूड

 हात

 बैठक

 पॉलिश

उत्तर :बैठक

 8. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती?

 आंबा

 गुळ

 बटाटा

 गवत

उत्तर :आंबा

 9. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25, 19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?

 E

 W

 S

 R

उत्तर :S

 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 7497:5255:111:?

 312

 121

 393

 101

उत्तर :393

महापरीक्षा ने विचारलेले प्रश्न


1)मेकलओडगंज हे ठिकाण कोठे आहे ?

👉हिमाचल प्रदेश

2)राजस्थान ,हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात कोणत्या वाळवंटाचा प्रदेश आहे ?

👉 थरचे वाळवंट

3) जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे ?

👉 कर्नाटक

4)सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

👉 दुसरा

5) कुल्लू, सोलन आणि मंडी ठिकाण कोठे आहेत ?

👉 हिमाचल प्रदेश

6)2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्ये पैकी हिंदू धर्माची लोकसंख्या किती टक्के आहे ?

👉 79.8

7)सध्या भारतातील स्व देशांतर्गत ची सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी कोणती आहे ?

👉 इंडिगो

8) कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

👉उत्तराखंड

9)भारतात बॉक्साइट धातूचा मोठा साठा ॲल्युमिनियम बनवण्यासाठी वापरला जातो तो साठा देशाच्या कोणत्या भागात सर्वात जास्त प्रमाणात आहे ?

👉 ओडिसा

10)भारतात खाऱ्या पाण्याचा तलाव कोठे आहे ?

👉 सांभर तलाव

11) गिर वन्यजीव अभयारण्य कोठे आहे ?

👉गुजरात

12) लोटस टेम्पल कोठे आहे ?

👉 दिल्ली

13) पायर्‍यांच्या विहिरी म्हणजे मानवनिर्मित तलाव आहेत ज्यामध्ये पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोहोचता येते जगात सर्वात खोल असलेली अशी विहीर कोठे आहे ?

👉 चांद बाओरी राजस्थान

14) भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील दोन तृतीयांश एक शिंगाच्या गेंड्यांच्या  संख्येचे गेंडे आहेत ?

👉 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

15) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठी वनक्षेत्र आहे ?

👉 मध्य प्रदेश

16)महाराष्ट्र मधील एक असे सुप्रसिद्ध गाव आहे कारण गावात कोणत्याही घरांना दरवाजे नाहीत केवळ दरवाज्याची फ्रेम बसवलेली आढळते ?

👉 शनि शिंगणापूर

भूगोल प्रश्नसंच 19/11/2019

🔹 1. मुंबई बंगलोर NH-4 हा कोणता मार्ग आहे.
राष्ट्रीय महामार्ग ✅
राज्य मार्ग
जिल्हा मार्ग
ग्रामीण मार्ग

🔹 2. खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभजक आहे.
अरवली
विंध्य
सहयाद्री
सातपुडा ✅

🔹 3. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात?
पश्चिमी घाट ✅
निलगिरी पर्वत
अरवली पर्वत
सातपूडा पर्वत

🔹 4. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र ………… आहे
श्रीहरीकोटा ✅
कोचीन
हसन
बेंगलोर

🔹 5. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
कॄष्णा
दामोदर
अलमाटी
सतलज ✅

🔹 6. ........... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
जोग ✅
नायगारा
कपिलधारा
शिवसमुद्र

🔹 7. पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्ष वृत्तवर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो.
९०° अक्षांश
६०° अक्षांश
१८०° अक्षांश ✅
३८०° अक्षांश

🔹 8. आठव्या पंचवार्षिक योजनेत रेल्वेच्या कशावर अधिक भर देण्यात आला आहे.
विद्युतीकरणावर ✅
रूंदीकरणावर
संगणकीकरणावर
खासगीकरणावर

🔹 9. ............... हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.
श्रीलंका
आयर्लंड
ग्रीनलंड ✅
ऑस्ट्रेलिया

🔹 10. नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?
पाणी
तापमान
वातावरण ✅
वरील सर्व

भूगोल प्रश्नसंच 18/11/2019

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र

३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला

४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी

४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा

४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.

४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

● आजचे प्रश्न 18/11/2019

📌फिट इंडिया चळवळ आणि महिला सशक्तीकरणाच्या मोहिमेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 16 महिला सदस्यांच्या चमूने कोणते पर्वतशिखर यशस्वीरित्या सर केले?

(A) नंदादेवी
(B) चौखंबा
(C) सतोपंथ✅✅✅
(D) पंचचुली

📌कोणाला प्रशिक्षण देण्याकरिता आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC) आणि ‘वित्त उद्योग विकास परिषद (FIDC)’ सोबत सामंजस्य करार झाला?

(A) ब्रेथवेट अँड कंपनी
(B) बिगर-बँकिंग वित्त कंपनी✅✅✅
(C) भारतीय निर्यात पत हमी महामंडळ
(D) हेवी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन

📌खालीलपैकी कोणते विधान सम-विषम वाहतूक योजनेबद्दल खरे नाही?

(A) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना जाहीर केली

(B) ही योजना सात-कलमी कृती योजनेचा एक भाग आहे

(C) शेजारी राज्यांमध्ये कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळण्यामुळे होणार्‍या हानिकारक परिणामांचा प्रतिकार करण्याच्या उद्देशाने ही योजना आहे.

(D) हा शाश्वत विकास लक्ष्यांचा एक भाग आहे, ज्याचा सर्वांसाठी एक शाश्वत आणि निरोगी भविष्य साध्य करण्यासाठी रोगींची संख्या आणि मृत्यूचे प्रमुख कारण ठरणार्‍या हवेच्या संदर्भात सर्व आवश्यक कृती करणे आवश्यक आहे हा हेतू आहे.✅✅✅

📌13 सप्टेंबरला कोणत्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाची 166 वी जयंती साजरी करण्यात आली?

(A) हान्स ख्रिश्चन जोएचिम ग्राम✅✅✅
(B) मार्टिनस बेन्जेरिन्क
(C) सेलमॅन वाक्समन रोनाल्ड रॉस
(D) फॅनी हेसे

📌ARIIA याचे पूर्ण नाव काय आहे?

(A) अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स✅✅✅
(B) एव्रेज रँक्स ऑफ इंस्टीट्यूशन्स इनोव्हेशन अचिव्हमेंट्स
(C) एव्रेज रँकिंग ऑफ इंडियन इंस्टीट्यूट्स ऑफ एव्हिएशन
(D) अटल रँकिंग ऑफ इंडियन इंस्टीट्यूट्स ऑफ एस्ट्रॉनॉमी

📌भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) जाहीर केले आहे की संस्था ‘SpaceIL’ या संस्थेसोबत करार करणार आहे.; ‘SpaceIL’ कोणत्या देशाचे अवकाश केंद्र आहे?

(A) जर्मनी
(B) ब्रिटन
(C) इस्त्राएल✅✅✅
(D) स्लोव्हेनिया

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) धातू ओळखण्याचे अक्षर कोणते?
   1) नी      2) णा      3) ने      4) णे

उत्तर :- 4

2) इकडे, मध्ये, रातोरात, आज इ. ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत ?

   अ) स्थलवाचक विशेषण      ब) कालवाचक क्रियाविशेषण
   क) संख्यावाचक क्रियाविशेषण    ड) रीतिवाचक क्रियाविशेषण

   1) अ व ब बरोबर  2) अ, क बरोबर    3) ब, ड बरोबर    4) अ, ड बरोबर

उत्तर :- 1

3) खालीलपैकी चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय ओळखा.

   अ) प्रती    ब) स्तव      क) समोर      ड) सह
   1) अ आणि ब    2) क आणि ड    3) ब आणि ड    4) अ आणि क

उत्तर :- 1

4) ‘उभयान्वयी अव्ययाचा’ विचार करताना पुढील बाबींचा विचार करावा लागेल.

   अ) दोन किंवा अधिक वाक्ये जोडणा-या विकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये म्हणतात.
   ब) प्रधानसुचक व गौणत्वसूचक असे दोन मुख्य प्रकार उभयान्वयी अव्ययात आहेत.
   क) ‘अन’, ‘आणखी’, ‘आणि’ हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे आहेत.
   ड) ‘विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले.’
        या वाक्यातून न्यूनत्वबोधक उभयान्वयी वाक्य आहे.

   1) फक्त अ    2) अ, ब, क    3) ब, क      4) ब, क, ड

उत्तर :- 3

5) छे, छट्, ऊ:, छेछे, च
     वरीलपैकी किती विरोधीदर्शक अव्यये आहेत.
   1) वरील सर्व    2) चार      3) पाच      4) तीन

उत्तर :- 1

6) ‘सुरेश गीत गात होता’ काळ ओळखा.

   1) पूर्ण भूतकाळ      2) अपूर्ण भूतकाळ   
   3) चालू भूतकाळ    4) सामान्य भूतकाळ

उत्तर :- 2

7) पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ‍दिली आहेत.

      पती-पत्नी, दीर-जाऊ, रेडा-म्हैस, तर खोंड ?
   1) कालवड    2) भाटी      3) लांडोर    4) गाय

उत्तर :- 1

8) खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.

   1) लाटा    2) झरा      3) धारा      4) गारा

उत्तर :- 2

9) खालील विधानातील अधोरेखित शब्दाचा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता ?

     ‘लाठीच्या एकेका तडाक्यास त्याने एकेक इसम लोळविला.’
   1) कर्ता    2) कर्म      3) कारण      4) अपादान

उत्तर :- 3

10) तू काही आता लहान नाहीस. यासाठी खालील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा.

   1) तू आता मोठा झाला आहेस    2) तू आता लहान उरला नाहीस
   3) तू केव्हा मोठा होणार आहेस    4) मोठा हो जरा आता तरी

उत्तर :- 1