04 December 2019

चालू घडामोडी प्रश्नसंच 4/१२/२०१९

📍 2019 वरिष्ठ कुस्ती राष्ट्रीय स्पर्धेत 55 किलोग्राम वजन गटाचे सुवर्णपदक कोणी जिंकले?

(A) विनेश फोगट✅✅
(B) साक्षी मलिक
(C) अनिता श्योरन
(D) दिव्या काकरान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दरवर्षी ________ या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो.

(A) 30 ऑक्टोबर
(B) 26 नोव्हेंबर
(C) 2 डिसेंबर✅✅
(D) 3 डिसेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने __________  कडून प्राप्त निधीच्या मदतीने “इंटीग्रेटेड रोड अॅक्सिडेंट डेटाबेस (IRDA)” प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

(A) आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक
(B) जागतिक बँक✅✅
(C) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
(D) आशियाई विकास बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 _________ या दिवशी “गुलामीच्या उन्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन” साजरा केला जातो.

(A) 30 नोव्हेंबर
(B) 1 डिसेंबर
(C) 29 सप्टेंबर
(D) 02 डिसेंबर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘हँड इन हँड’ हा चीन आणि __________ या देशादरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे.

(A) पाकिस्तान
(B) नेपाळ
(C) भारत✅✅
(D) भूतान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ____________ या दिवशी “आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन” साजरा केला जातो.

(A) 3 डिसेंबर✅✅
(B) 23 नोव्हेंबर
(C) 25 ऑक्टोबर
(D) 19 नोव्हेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘2019 अबू धाबी ग्रँड प्रिक्स’ ही मोटार शर्यत कोणी जिंकली?

(A) मायकेल शुमाकर
(B) मॅक्स व्हर्स्टपेन
(C) वाल्टेरी बोटास
(D) लुईस हॅमिल्टन✅✅

© संकलन - राम कवले & तुषार शिरगीरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतातील पहिले सागरी संग्रहालय गुजरातमध्ये (लोथल) नियोजित

📌उपयोजन :-

🔰संग्रहालय जहाजाचे बहुआयामी कार्यक्षेत्र

🔰व्यापार केलेल्या साहित्याचा स्वतंत्र शोध

🔰हिंद महासागरातील जहाजांच्या भंगार ठिकाणाहून बचावलेल्या साहित्याचे प्रदर्शन

🔰जहाज बांधणीच्या पुरातत्व विभागासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र

🔰सागरी इतिहासाची पुनर्बांधणी

📌पाण्याखालील पुरातत्व संशोधन :-

🔰पुरातत्व उत्खननातून पाण्यात बुडलेल्या जहाजांचे अवशेष, बंदरे आणि सागरी घडामोडी नोंदींचा समावेश

🔰१९८९: गोव्यातील सांची रीफ मध्ये भारतातील तुकड्यांच्या स्वरूपातील जहाजांचा अभ्यास सुरू

🔰युनेस्कोच्या मते, जगातील सागर पृष्ठभागावर सुमारे ३ दशलक्ष अज्ञात जहाजे उद्ध्वस्त अवस्थेत

📌महत्व :-

🔰समृद्ध सागरी इतिहासाबाबत भारताची अफाट क्षमता

🔰आग्नेय आशिया आणि पर्शियन आखाती प्रदेश येथील पुरातत्व पुराव्यांनुसार उलगडा

🔰४००० वर्षांपूर्वी पूर्व आणि पश्चिम समुद्रात भारतीय समुद्री प्रवास अस्तित्वात असल्याचे संकेत.

🔰बुडलेल्या जहाजांच्या अभ्यासाच्या आधारे भारताचा सागरी इतिहास आणि इतर देशांशी व्यापारिक संबंधातील दुवे शोधणे शक्य

राज्य सरकार मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे मत्स्यालय; मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना..

🔰देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी शहरात बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या प्रमाणे जागतिक दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) राज्य सरकार उभारणार आहे. मत्स्यालयाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

🔰ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

🔰मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देश-विदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्सालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?

   1) अपसरण चिन्ह    2) स्वल्पविराम    3) अपूर्ण विराम    4) संयोग चिन्ह

उत्तर :- 4

2) पुढील रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा.
     भाषेच्या अलंकाराचे ................ हे दोन मुख्य प्रकार आहेत.

   1) यमक – अनुप्रास    2) अनन्वय – दृष्टान्त  3) अन्योक्ती – स्वभावोक्ती  4) शब्दालंकार आणि अर्थालंकार

उत्तर :- 4

3) ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे  ?

   1) अभ्यस्त      2) सामासिक    3) प्रत्ययसाधित    4) यापैकी कोणताही नाही

उत्तर :- 1

4) ‘माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला’
      वरील विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ?
   1) अभिधा      2) लक्षणा    3) व्यंजना    4) धववाणी

उत्तर :- 3

5) ‘चपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
   1) जलद      2) कसर      3) पथ      4) वीज

उत्तर :- 4

6) ............... ! केवढा मोठा हा धबधबा.
 
1) सबब    2) अबब      3) वाहवा      4) यापैकी नाही  

उत्तर :- 2

7) ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीत असे या वाक्यातील काळ ओळखा.

   1) अपूर्ण वर्तमानकाळ  2) पूर्ण वर्तमानकाळ  3) रीति वर्तमानकाळ  4) रीति भूतकाळ

उत्तर :- 4

8) ‘भाऊबहीण’ या शब्दाचे लिंग कोणते ?

   1) पुल्लिंग    2) नपुंसकलिंग    3) स्त्रीलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

9) योग्य जोडया जुळवा.
  विभक्ती      कारक

         a) पंचमी      I) घराशी
         b) तृतीया      II) घरात
         c) षष्ठी      III) घरातून
         d) सप्तमी      IV) घराचा

  a  b  c  d

         1)  II  III  I  IV 
         2)  III  I  IV  II
        3)  I  IV  II  III
         4)  IV  II  III  I

उत्तर :- 2

10) खालील गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा.
     ‘मीनाला नोकरी नाही, रमेशची नोकरी सुटलेली अशा वेळीतिची स्थिती ........................... अशी झाली.’

   1) खाल्ल्या घरचे वासे मोजणारी      2) उघडया डोळयांनी मरणे पाहणे
   3) इकडे आड तिकडे विहीर      4) खुळ लागणे

उत्तर :- 3

चालू घडामोडी प्रश्न 4/12/2019

● ३ डिसेंबर २०१९ रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनाची थीम ------- ही होती.
:- ‘प्रोमोटिंग द पार्टिसिपेशन ऑफ पर्सन्स वीथ डिसअॅबिलिटीज अँड देयर लीडरशिप: टेकिंग अॅक्शन ऑन द 2030 डेव्हलपमेंट अजेंडा’.

●  चीन आणि भारत यांच्या ‘हँड इन हँड 2019’ हा संयुक्त सैन्य सराव ------------- या ठिकणी पार पडला.
:- उमरोई (मेघालय).

●  FSSAI कडून फोर स्टार रेटिंगसह “ईट राईट स्टेशन” प्रमाणपत्र मिळविणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक
- मुंबई सेंट्रल रेलवे स्थानक.).

● 17 डिसेंबर रोजी भरणार्यास तिसर्याट ‘ई-मोबिलिटी सोल्यूशन्स विषयक आंतरराष्ट्रीय परिवहन विद्युतीकरण परिषद २०१९ ही परिषद भारतात कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे
:- बेंगळुरू.

● पीपल फोर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ़ अॅानिमल्स (PETA) द्वारे ‘पर्सन ऑफ द इयर 2019------------ यांना जाहिर करण्यात ला ’
- जोएक्वीन फिनिक्स.

● मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) द्वारे ‘क्रिस्टोफर मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड’ हा पुरस्कार कोणत्या संघाला जाहिर झाला
:- न्युझीलँड

●2019 चा अबू धाबी ग्रँड प्रिक्स’ एफ-1 ही शर्यत -------------- याने जिंकली
:- लुईस हॅमिल्टन.

●  1 डिसेंबर रोजी आदिवासी विश्वास दिवस (Indigenous Faith Day -IFD) ----------- येथे साजरा करण्यात आला
- अरुणाचल प्रदेश.

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 4/12/2019

१) कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते, याची दखल संविधानाच्या .................. या  केलमाखाली घेतली जाऊ शकते.

   1) 30   
   2) 31  
   3) 32  
   4) 34

उत्तर :- 3

२) भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काचे अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतूदी घटनादत्त आहेत ?

   अ) धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो.

   ब) धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याव्दारे नियंत्रित करू शकेल.

   क) सार्वजनिक स्वरुपाच्या हिंदु धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरीकांना खुले करुन देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल.

   ड) कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल.

   1) ब, ड   
   2) अ, ब, क, ड 
  3) अ, ब, क   
  4) कोणतेही अनुज्ञेय नाही

उत्तर :- 1

३) कलम – 23 मधील ‘बिगारी’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणा-या खालील विधानांचा विचार करा.

   अ) सक्तीचे श्रम

   ब) शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणे

   क) अनैच्छिक दास्यत्व

   ड) विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्विकारणे

   1) केवळ अ बरोबर आह 
   2) अ आणि ब बरोबर
   3) अ, ब व क बरोबर   
  4) सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 4

४) भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते विधान अल्पसंख्याकांचे बाबतीत खरे नाही ?

   अ) राज्य घटनेत फक्त धर्म अथवा भाषा यावर आधारित अल्पसंख्याक दर्ज्यास मान्यता आहे.

   ब) भारतात राहणा-या नागरिकांनाच त्यांची वैशिष्टपूर्ण लिपी, भाषा व संस्कृती संवर्धनाचा अधिकार आहे.

   क) फक्त धार्मिक अल्पसंख्याकांनाच त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे.

   ड) कोणत्याही नागरिकाला राज्य निधीतून मदत प्राप्त होणा-या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत वर्ण, धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही.

   1) क    
   2) अ   
   3) अ, क  
   4) ब, ड

उत्तर :- 1

५). मूलभूत अधिकार सामान्यत: राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून नागरिकांना संरक्षण देतात. खालीलपैकी कोणते अधिकार  त्याही पुढे जाऊन व्यक्तीला इतर नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवतात ?

   अ) कलम 14     आ) कलम 15 (1)    ‍इ) कलम 15 (2)    ई) कलम 16
   उ) कलम 17      ऊ) कलम 22 (1)    ए) कलम 23

   1) अ, आ, इ    2) आ, ई, ऊ  
  3) इ, उ, ए    4) उ, ऊ, ए

उत्तर :- 3

६) खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायद्यात होत नाही ?

   1) टाडा    2) नासा 
   3) रासुका    4) मिसा

उत्तर :- 2

७) भारतीय संविधानातील मूलभूत हक्काच्या संदर्भात कलम 19 (2) अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुढीलपैकी  कोणत्या मर्यादा टाकण्यात आल्या आहेत ?

   अ) कोणाची बदनामी, निंदा करणे.

   ब) न्यायालयाचा अवमान करणे.

   क) राज्याची सुरक्षा धोक्यात आणणे.

ड) सभ्यता व नीतिमत्तेच्या मर्यादा भंग करणे.

         वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   1) अ फक्त           2) अ आणि ब फक्त 
3) अ, ब आणि क    4) अ, ब आणि ड

उत्तर :- 3

८) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ............... दिलेले आहेत.

   1) सर्वोच्च न्यायालयास कलम 32 अन्वये   

   2) उच्च न्यायालयास कलम 226 अन्वये

   3) सर्वोच्च न्यायालय कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालय कलम 226 अन्वये असे दोघांनाही

   4) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास

उत्तर :- 3

९) योग्य कथन / कथने ओळखा.

   अ) पृथ्थकरणीयतेचा सिध्दांत निर्धारित करतो की, एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुध्द आहे.

   ब) विकसनशील निर्वचनाचा सिध्दांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक – विधिविषयक संदर्भ  ध्यानात ठेवतो.

   1) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे  

  2) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर

   3) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
   

४) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची

उत्तर :- 3

१०) अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक मुलभूत हक्कासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :

   अ) अल्पसंख्याकांना केवळ शैक्षणिक संस्थांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे.

   ब) अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे.

   क) हा अधिकार निरंकुश असून त्यावर कोणतीही बंधने नाहीत.

   ड) कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने शासन घालू शकते.

        वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ, ब आणि क    2) ब आणि ड  
3) ब, क आणि ड    4) अ आणि क

उत्तर :- 2

पोलीस भरती प्रश्नसंच

1) भारतीय अन्नपदार्थ महामंडळाचे (FCI) अधिकृत भांडवल किती रुपयांपर्यंत पर्यंत वाढविण्यात आले आहे?
उत्तर : 10,000 कोटी रुपये

2) 15 वी उच्च शिक्षण शिखर परिषद कोणातर्फे भरविण्यात आली?
उत्तर : FICCI

3) “ISROने ‘कार्टोसॅट-3’ उपग्रह कोणत्या केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला?
उत्तर : सतीश धवन अंतराळ केंद्र

4) भारत-श्रीलंका यांच्यादरम्यान ‘मित्र शक्ती’ नावाचा संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम कुठे होणार आहे?
उत्तर : पुणे

5) नागालँडमध्ये कितव्या ‘हॉर्नबिल महोत्सव’चा शुभारंभ झाला?
उत्तर : 20 व्या

6) पहिली ‘भारत-जापान 2+2 परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री बैठक’ कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

7) "सेल इंडिया 2019" हा नौकानयन कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : मुंबई

8) कामगार मंत्रालयाद्वारे कोणत्या काळात निवृत्तीवेतन आठवडा पाळला जात आहे?
उत्तर : 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर

9) फास्टॅगची सक्ती करण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीसाठी वाढीव मुदत किती आहे?
उत्तर : 15 डिसेंबर 2019

10) कोणत्या दिवशी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो?
उत्तर : 1 डिसेंबर

03 December 2019

झटपट चालु घडामोडी प्रश्न उत्तरे


1) ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ कोणत्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे?
उत्तर : इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस

2) ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार

3) यावर्षी ‘इंडिया फॉर ह्युमॅनिटी - जयपूर फूट’ कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

4) "अरुंधती सुवर्ण योजना" कोणत्या राज्यसरकारद्वारे लागू केली जाणार आहे?
उत्तर : आसाम सरकार

5) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोणत्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले?
उत्तर : किरण मजुमदार-शॉ

6) नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड प्रकल्प कधीपासून कार्यरत केला जाणार आहे?
उत्तर : 31 डिसेंबर 2020

7) राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था (NISR) याची स्थापना कोठे होणार आहे?
उत्तर : लडाख

8) ‘मिस्टर युनिव्हर्स 2019’ हा किताब कोणी जिंकला?
उत्तर : चित्रेश नतेसन

9) "डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट" महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : वाराणसी

10) ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?
उत्तर : Climate Emergency

📍 कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार’ जिंकणारा पहिला भारतीय आहे?

(A) सुदर्शन पटनाईक✅✅
(B) एम. एफ. हुसेन
(C) राजा रवी वर्मा
(D) नंदालाल बोस

📍 कोणत्या देशाच्या नागरिकांना भारत सरकारने व्हिसा-ऑन-अराईव्हल सुविधा प्रदान केली आहे?

(A) कॅनडा
(B) ऑस्ट्रेलिया
(C) संयुक्त अरब अमिराती✅✅
(D) कुवैत

📍 कोणत्या न्यायमूर्तींनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली?

(A) न्या. अपरेश कुमार सिंग
(B) न्या. एस. चंद्रशेखर
(C) न्या. सुजित नारायण प्रसाद
(D) न्या. डॉ. रवी रंजन✅✅

📍 कोणत्या तेल कंपनीने हिमाच्छादित प्रदेशात सुद्धा वापरले जाऊ शकणारे विशेष हिवाळी डिझेल तयार केले?

(A) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड✅✅
(B) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(C) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(D) गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड

📍 कोणत्या मंत्रालयाच्या वतीने दुसऱ्या दक्षिण आशियाई सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले?

(A) वित्त मंत्रालय
(B) पर्यटन मंत्रालय
(C) महिला आणि बाल विकास मंत्रालय✅✅
(D) गृह मंत्रालय

📍 कोणत्या शहरात ‘मुख्यमंत्री सेप्टिक टँक सफाई योजना’ सुरू करण्यात आली?

(A) जयपूर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) गुरुग्राम
(D) झुंझुनू

📍 कोणता राज्य क्रिकेट संघ त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडूंसाठी करार पद्धतिची घोषणा करणारा पहिला राज्य क्रिकेट संघ ठरला?

(A) उत्तरप्रदेश
(B) कर्नाटक
(C) महाराष्ट्र
(D) उत्तराखंड✅✅

📍 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मते, 2019 या वर्षाच्या द्वितीय तिमाहीत शहरी बेरोजगारीचा दर किती आहे?

(A) 9.5%
(B) 10%
(C) 11.6%
(D) 9.3%✅✅

📍 बेंगळुरूच्या झेंडूच्या फुलांचा वापर करून "फ्लावर्स ऑफ टॉलरन्स" या नावाने तयार केलेले कार्पेट ___ येथे प्रदर्शनास ठेवले गेले.

(A) दुबई✅✅
(B) कतार
(C) इस्त्राएल
(D) मेक्सिको

📍 कोणत्या देशाने 21 व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाऊंड मिश्र जोडी प्रकारात सुवर्णपदक पटकवले?

(A) भारत✅✅
(B) चीन
(C) जापान
(D) इंडोनेशिया

महत्त्वाचे 10 चालुघडामोडी प्रश्न उत्तरे


1) भारतीय अन्नपदार्थ महामंडळाचे (FCI) अधिकृत भांडवल किती रुपयांपर्यंत पर्यंत वाढविण्यात आले आहे?
उत्तर : 10,000 कोटी रुपये

2) 15 वी उच्च शिक्षण शिखर परिषद कोणातर्फे भरविण्यात आली?
उत्तर : FICCI

3) “ISROने ‘कार्टोसॅट-3’ उपग्रह कोणत्या केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला?
उत्तर : सतीश धवन अंतराळ केंद्र

4) भारत-श्रीलंका यांच्यादरम्यान ‘मित्र शक्ती’ नावाचा संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम कुठे होणार आहे?
उत्तर : पुणे

5) नागालँडमध्ये कितव्या ‘हॉर्नबिल महोत्सव’चा शुभारंभ झाला?
उत्तर : 20 व्या

6) पहिली ‘भारत-जापान 2+2 परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री बैठक’ कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

7) "सेल इंडिया 2019" हा नौकानयन कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : मुंबई

8) कामगार मंत्रालयाद्वारे कोणत्या काळात निवृत्तीवेतन आठवडा पाळला जात आहे?
उत्तर : 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर

9) फास्टॅगची सक्ती करण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीसाठी वाढीव मुदत किती आहे?
उत्तर : 15 डिसेंबर 2019

10) कोणत्या दिवशी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो?
उत्तर : 1 डिसेंबर

चालू घडामोडी प्रश्न

• जुलैमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने या दलाला संघटीत गट ‘ए’ चा दर्जा देण्यास मंजुरी दिली
- भारतीय रेल्वे सुरक्षा दल (RPF)

• 2 ते 13 सप्टेंबर 2019 या काळात संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (UNCCD) याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन या ठिकाणी होणार
- ग्रेटर नोएडा, दिल्ली, भारत.

• इटलीमध्ये 30 व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावणारी भारताची धावपटू
- द्युती चंद

•  महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिल्याप्रमाणे, शेतकऱ्यांना शाश्वत व संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने राज्यातल्या अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणारी योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.

• रानीदुगमा (गम्पाहा येथे)'---------- हे भारताच्या साहाय्याने बनविलेले पहिले मॉडेल गाव या देशात आहे
- श्रीलंका.

• एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 100 बळी टिपण्याचा टप्पा पार करणारा दुसरा खेळाडू
- भारताचा जसप्रित बूमरा (57 सामने).

• हेनली पासपोर्ट निर्देशांक 2019’ याच्यानुसार जगातला सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेला देश
- जपान आणि सिंगापूर (संयुक्तपणे)

• भारतीय विशिष्ट  ओळख प्राधिकरण (UIDAI) याचे पहिले आधार सेवा केंद्र (ASK) उघडण्यात आले ते ठिकाण
- दिल्ली आणि विजयवाडा.

• 2020 सालापर्यंत विजेवर चालणार्या  वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनसह विकसित केली जाणारी भारताचा पहिला महामार्ग (ई-कॉरिडॉर)
- दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा महामार्ग (500 किमी).

• 2050 सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कायदा करणारे जी-7 समुहामधील पहिला देश
– ब्रिटन.

• तामिळनाडूचे राज्य फुलपाखरू------------ हे आहेत
- तामिळ योमन (सिरोक्रोआ थेइस).

* IIT मद्रासने विकसित केलेले RISC-C इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरवर आधारीत असलेली भारताची प्रथम स्वदेशी इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर चीप
– शक्ती प्रोसेसर.

* 'गगनयान' अंतराळ मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याकरिता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) या देशाच्या कंपनीसोबत करार केला
– रशिया (ग्लॅवकोसमोस कंपनी).

*  या कंपनीने भारतात 'डिजिटल उडान' नावाचा डिजिटल साक्षरता उपक्रम जाहीर केला
- जियो.

*  नासाची कोणती अंतराळ दुर्बीण २० जानेवारी २०२० रोजी बंद पडणार आहे
- स्पीटझर

*  इस्रोच्या चांद्रयान २ या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या महिला शास्रज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे
- रितू करीधल व मुथय्या वनिथा

*  जगातील सर्वात लांब पूल कोणता
-हाॅगकाॅग-झुहाई पूल

* रुस्तम काय आहे
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले मानवरहित हवाई वाहन आहे

*  दस्तक अभियान काय आहे
- उत्तर प्रदेश राज्य शासनाने युनिसेफच्या सहकार्याने घरोघरी पोहचणारे दस्तक नामक अभियान आहे. त्याचे उद्दिष्टे हे जपानी मेंदुज्वाराचे राज्यातून उच्चाटन करणे हा आहे.

* मंत्रालयातील महिला कर्मचारी तसेच मंत्रालयात स्तनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान करणे सुलभ व्हावे यासाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षाचे नाव काय आहे
- हिरकणी कक्ष

एड्स ची संपूर्ण माहिती (AIDS)Aquired Immuno Dfficiency Syndrome

🎆 एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus)

🎆 एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला.

🎆 जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला.

🎆 भारतामध्ये 1986 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. ➕ रुग्ण आढळला.

🎆 भारतामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.

🎆 जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – भारत

🎆 भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – महाराष्ट्र

🎆 महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुंग – सांगली

🎆 जागतिक एड्स दिन – 1 डिसेंबर

   ‼️ 🦠 रोगप्रसाराचे मार्ग 🦠 ‼️

📌 H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध.

📌 H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास..

📌 H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्‍या बाळाला (नाळेमार्फत) .

📍 H.I.V.बाधित व्यक्तीशी चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोगाचा प्रसार होत नाही.

            ‼️ 🦠 लक्षणे 🦠 ‼️

💉 वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.

💉 सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे.

💉 तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.

💉 नुमोनिया

💉 मेंदूज्वर

💉 हरपीस

💉 विविध प्रकारचे कर्करोग

💉 क्षयरोग .

🎆 वेस्टर्न ब्लॉट (Westrn Blot) हमखास 100% खात्रीशीर चाचणी.

🎆 इलायझा चाचणी होकारात्मक आल्यास H.I.V. संसर्गाची खात्री या चाचणीने करता येते..

🎆 मार्च 1985 – एलयाझा तपासणीची उपलब्धता.

🎆 जुलै 1987 – ‘झिडोव्ह्युडीन’ हे औषध एड्स उपचारासाठी उपलब्ध.

🎆 एड्सवरील औषधे – झिडोव्ह्युडीन (Zidovudine), (नेव्हरॅपिन) ही सर्व औषधे फक्त विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णाचे आयुष्मान वाढवितात.

📍 एड्स प्रतिबंधाकत्मक लस अध्याप उपलब्ध नाही.(संशोधन चालू आहे)