10 January 2024

चालू घडामोडी :- 09 जानेवारी 2024

◆ स्वदेशी असॉल्ट रायफल 'उग्रम' पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापनाने (एआरडीई) ही रायफल विकसित केली आहे.

◆ आयर्लंड च्या सिलियन मर्फी ला Oppenheimer चित्रपटात केलेल्या मुख्य भूमिकेसाठी मिळाला गोल्डन ग्लोब सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार.

◆ गोल्डन ग्लोब अवॉर्ड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लीली ग्लॅडस्टोन ला जाहीर.

◆ भारतातील महिला करिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहराच्या निर्देशकांच्या यादीत चेन्नई हे शहर प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारतातील महिला करिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहराच्या निर्देशकांच्या  यादीत पहिल्या टॉप 5 मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे आणि मुंबई शहराचा सामावेश आहे.

◆ भारतात 2003 वर्षापासून 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करतात येतो.

◆ गांधीनगर मध्ये आयोजीत या वर्षीच्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचा मुख्य विषय "गेट वे टू द फ्युचर" आहे.

◆ उग्रम रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरली आहे.

◆ भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम पुणे ठिकाणच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रशिक्षण अस्थपनाने ARDE विकसित केली आहे.

◆ अमेरिका देशाच्या युनायटेड लॉन्च अलायंस कंपनीच्या व्हल्कन या रॉकेट ने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केले आहे.

◆ 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ओपेनहायमर चित्रपटाला मिळाला आहे.

◆ 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये ओपेनहायमर चित्रपटाला एकून 5 पुरस्कार मिळाले आहेत.

◆ 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लिली ग्लॅडस्टोन यांना मिळाला आहे.

◆ 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता चा पुरस्कार सीलियन मर्फी याला मिळाला आहे.

◆ गोल्डन ग्लोब पुरस्कार अमेरिकेत 1944 या वर्षापासून दरवर्षी आयोजीत करण्यात येतात.

◆ शेख हसीना ह्या बांगलादेश देशाच्या पाचव्यांदा पंतप्रधान होणार आहेत.

◆ कोलकता येथे सुरु असलेला 85 व्या आंतरराज्य आणि 19 वर्षाखालील राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सुवर्ण पदक पटकावले आहे.

◆ अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

◆ नवी दिल्ली येथे इंट्सफूड शो 2024 या दक्षिण आशियातील सर्वात मोठया खाद्य पर्दशनाचे उद्घाटन सुनील बर्थवाल यांच्या हस्ते झाले आहे.

◆ अँगर मॅनेजमेंटमध्ये हे पुस्तक अजय बिसारीया यांची भारतीय माजी उच्चआयुक्ताने लिहिले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आजचे महत्वाचे करंट अफेअर्स 09 January - Current Affairs

🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरली आहे?

ANS - उग्रम रायफल

🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पुरव्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय करण्यासाठी जागतीक बँकेने मंजुरी दिली आहे?

ANS - सांगली आणि कोल्हापूर

🔖 प्रश्न - कोणत्या देशाच्या युनायटेड लॉन्च अलायंस कंपनीच्या व्हल्कन या रॉकेट ने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केले आहे?

ANS - अमेरिका - अमेरिका ५० वर्षानंतर हि चंद्रयान मोहिम राबवत आहे.

🔖 प्रश्न - ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

ANS - ओपेनहायमर - या चित्रपटाला एकूण ५ पुरस्कार मिळाले आहेत.

🔖 प्रश्न - शेख हसीना ह्या बांगलादेश देशाच्या कितव्यांदा पंतप्रधान होणार आहेत?

ANS - पाचव्यांदा

🔖 प्रश्न - कोलकता येथे सुरु असलेला ८५ व्या आंतरराज्य आणि १९ वर्षाखालील राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने कोणते पदक पटकावले आहे?

ANS - सुवर्ण पदक

🔖 प्रश्न - भारताच्या वरून तोमर आणि ईशा सिंग यांनी आशिया ऑलिम्पिक पात्रता फेरीत कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकून भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला आहे?

ANS - नेमबाजी मध्ये

🔖 प्रश्न - केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाची एकून निर्यात २०३० पर्यंत किती कोटी डॉलर वर नेण्याचे उद्दीष्ट आहे?

ANS - २ लाख

🔖 प्रश्न - नवी दिल्ली येथे इंट्सफूड शो २०२४ या दक्षिण आशियातील सर्वात मोठया खाद्य पर्दशनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?

ANS - सुनील बर्थवाल यांच्या हस्ते

🔖 प्रश्न - अँगर मॅनेजमेंटमध्ये हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी उच्चआयुक्ताने लिहिले आहे?

ANS - अजय बिसारीया यांनी

🔖 प्रश्न -  देशात प्रवासी भारतीय दीन म्हणुन कोणता दिवस साजरा करण्यात येतो?

ANS - ९ जानेवारी - २००३ पासून हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

🔖 प्रश्न - देशात व्हायब्रंट जागतिक परिषद कोठे आयोजीत करण्यात येते?

ANS - गांधीनगर येथे

09 January 2024

महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 08 January

🔖 प्रश्न - इस्रो ने श्रीहरीकोठा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून आदित्य एल १ यानाचे प्रक्षेपण कधी केले होते?

ANS - २ सप्टेंबर २०२३ ला

🔖 प्रश्न - भारतीय ऑलम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

ANS - रघुराम अय्यर यांची

🔖 प्रश्न - रॉयल कॅरिबियन ने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रुझ ठरली आहे?

ANS - आयकॉन ऑफ दी सिज - या क्रुझची लांबी ११९८ फूट आहे - तसेच या क्रुझचे वजन २,५०,८०० टन आहे

🔖 प्रश्न - देशातील पहिले बीच गेम्स २०२४ चे आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आले आहे?

ANS - घोघला बीच, दीव व दमण

🔖 प्रश्न - भारतात कोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?

ANS - अहमदाबाद येथे

🔖 प्रश्न - केंद्र सरकारच्या फार्मर आयडी या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची निवड झाली आहे?

ANS - बीड जिल्ह्याची

🔖 प्रश्न - ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

ANS - शशी सिंह यांची

🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने नुकताच बिमस्टेक च्या सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारला आहे?

ANS - इंद्रमणी पांडे यांनी - त्यांची ३ वर्षासाठी निवड करण्यात आली आहे

🔖 प्रश्न - १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणाहून झाले आहे?

ANS - पिंपरी चिंचवड येथून - या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार असणार आहेत.

🔖 प्रश्न - सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी कोणत्या राज्यात ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे?

ANS - हिमाचल प्रदेश

श्री राम मंदिर (अयोध्या)

1. मंदिराची रचना:
- पारंपारिक नगर शैलीचे अनुसरण करते.
- परिमाणे: 380 फूट (लांबी), 250 फूट (रुंदी), 161 फूट (उंची).
- 20 फूट उंच मजले, 392 खांब आणि 44 दरवाजे असलेले तीन मजली.
- मुख्य गर्भगृह: भगवान श्री रामाचे बालपण; पहिला मजला: श्री राम दरबार.
- पाच मंडप: नृत्य, रंग, सभा, प्रार्थना आणि कीर्तन मंडप.
- देवतांच्या मूर्तींनी सुशोभित केलेले खांब आणि भिंती.

2. प्रवेश आणि प्रवेशयोग्यता:
- सिंह द्वार मार्गे 32 पायऱ्यांद्वारे पूर्वेकडील प्रवेश.
- दिव्यांग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्ट.
- परकोटा: आयताकृती कंपाऊंड वॉल (732 मीटर लांबी, 14 फूट रुंदी).

3. सहायक संरचना:
- कंपाऊंड कोपऱ्यांवरील मंदिरे: सूर्यदेव, देवी भगवती, गणेश भगवान, भगवान शिव, माँ अन्नपूर्णा, हनुमान जी.
- जवळच ऐतिहासिक विहीर (सीताकूप).
- संकुलातील प्रस्तावित मंदिरे: वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषाद राज, माता शबरी, देवी अहिल्या.
- कुबेर टिळा: जटायू स्थापनेसह भगवान शिव मंदिराचा जीर्णोद्धार.

4. बांधकाम वैशिष्ट्ये:
- लोखंड वापरले नाही.
- पाया: कृत्रिम खडक दिसण्यासाठी 14m-जाड रोलर-कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC).
- संरक्षण: जमिनीतील ओलाव्यापासून ग्रॅनाइटसह 21 फूट-उंच प्लिंथ.

5. पायाभूत सुविधा आणि सुविधा:
- सांडपाणी प्रक्रिया, पाणी प्रक्रिया, अग्निसुरक्षा पाणीपुरवठा, स्वतंत्र वीज केंद्र.
- पिलग्रिम्स फॅसिलिटी सेंटर (PFC): 25,000 लोकांसाठी क्षमता, वैद्यकीय आणि लॉकर सुविधा.
- आंघोळीसाठी जागा, वॉशरूम, वॉशबेसिन, उघडे नळ इत्यादीसह अतिरिक्त ब्लॉक.

6. पर्यावरणीय फोकस:
- भारताच्या पारंपारिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले.
- 70-एकर क्षेत्रापैकी 70% क्षेत्र हिरवे राहिले.

स्रोत: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र❤️

प्रश्न मंजुषा

 🔰मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते..?

1} सेल्युलेज ✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज



🔰आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.?

1} अवअणू

2} अणू

3} रेणू ✅

4} पदार्थ



🔰डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५ ✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७


🔰कोणत्या आम्लाच्या रेणूंच्या एकत्रीकरणातून प्रोटिन्स तयार होतात. ?

(1) आयोडीक आम्ल

(2) फाॅरमिक आम्ल 

(3) अमिनो आम्ल ☑️

(4) नायट्रस आम्ल



🔰 वस्तूंच्या किंमती नियमित करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रभावी साधन म्हणजे  ?

(1) नैतिक समजावणी

(2) व्याजांच्या दरात बदल करणे 

(3) खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी -विक्री करणे ☑️

(4) राखीव निधीच्या प्रमाणात बदल करणे



🔰 राज्य अल्पसंख्यांक आयोगास कायदेशीर अधिकार देणारे देशातील पहिले राज्य कोणते  ?

(1) महाराष्ट्र 

(2) गुजरात 

(3) राजस्थान 

(4) बिहार ☑️



🔰  जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा (सचिवालय) दर्जा देण्यात यावा ही शिफारस कोणत्या समितीची आहे ?*

(1) अशोक मेहता ☑️

(2) एल एम.संघवी

(3) पी.के थुंगन 

(4) जे.के.व्ही.राव समिती

भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

1. सनदी कायदा 1813

2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका

3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम

4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835

5. चार्ल्स वुडचा खलिता (1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा

6. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर

7. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा

8. भारतीय विद्यापीठ कायदा (1904)

9. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी

10. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे

11. सार्जंट योजना (1944) 

12. राधाकृष्णन आयोग (1948)

13. कोठारी आयोग (1964)

गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती



1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)
- 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात
- 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था

2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)
- कमी गुणसूत्रामुळे
- स्त्रीयांमध्ये आढळतो

3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)
- जास्त गुणसूत्रामुळे
- पुरूषांमध्ये आढळतो

● एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती

1. वर्णकहीनता (Albinism)
- मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे

2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)
- गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.
- आनुवांशिक आजार

मार्गदर्शक तत्वे आणि घटनादुरुस्त्या

मार्गदर्शक तत्वांमध्ये आजपर्यंत एकूण 5 घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


A) 42 वी घटनादुरुस्ती 1976 : 

42 व्या घटनादुरुस्तीने एकूण 4 दुरुस्त्या करण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे - 

1) कलम 39f - "बालकांना व युवकांना" शोषणापासून संरक्षण ठेऊन आरोग्य पूर्ण विकासाची संधी उपलब्ध  करून द्यावी.

2) 39A - राज्य," सामान्य न्याय व निःशुल्क कायदे सहाय्य" समान संधीच्या तत्वावर न्यायास प्रोत्साहन देईल व  आर्थिक बाबीमुळे नागरिकाला न्याय मिळण्याची संधी नाकारली जाऊ नये यासाठी मोफत कायदे विषयक सहाय्य देईल

3) 43A - औद्योगिक व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य कायद्याने उपाययोजना करेल.

4) 48A - पर्यावरण संरक्षण व संवर्धन आणि वन्य व वन्यजीवांचे रक्षण करणे.


B) 44 वी घटनादुरुस्ती 1978 : 

या घटनादुरुस्ती नुसार 1 च कलम समाविष्ट करण्यात आले. तो पुढीलप्रमाणे- 

1) कलम 38(2) - राज्य, उत्पन्न, दर्जा, संधी यांच्या बाबतीतील विषमता कमी करेल.


C)97 वी घटनादुरुस्ती 2011 : 

या घटनादुरुस्ती नुसार 1 च कलम समाविष्ट करण्यात आले.तो पुढीलप्रमाणे - 

1) कलम 43B - राज्य, "सहकारी सोसायट्यांच्या निर्मिती व व्यवस्थापन" यास प्रोत्साहन देईल.


D) 7 वी घटना दुरुस्ती 1956 :

या घटनादुरुस्ती नुसार कलम 49 मध्ये "कायद्याने घोषित ऐतिहासिक" असा बदल केला गेला.


E) 86 वी घटनादुरुस्ती 2002 :

या घटनादुरुस्ती नुसार नवीन कलम समाविष्ट केलेले नसून फक्त कलमात बदल करण्यात आला. तो पुढीलप्रमाणे - 

1) कलम 45 मध्ये पूर्वी 6 ते 14 वयोगटातील मुलांना राज्य हे निःशुल्क शिक्षण देईल अशी तरतूद होती मात्र 86 व्या घटनादुरुस्ती नुसार 0 ते 6 वयोगटातील मूलांच्या शिक्षणाची व बालसंगोपन करण्याची जबाबदारी राज्याची असेल अशी तरतूद आहे.

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. 


🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.


📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश📚


▪️ मूलभूत हक्क : अमेरिका

▪️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪️ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪️ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪️ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪️ शेष अधिकार : कॅनडा'

▪️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪️ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

मार्गदर्शक तत्वे

भाग 4 : – राज्याचे मार्गदर्शक तत्वे  (कलम 36 ते 51 )

राज्याचे मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतले. राज्याने कसे वागावे हे यामध्ये सांगितलेले आहे. आयर्लंडने हे स्पेन कडून घेतले आहे.

मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येत नाही.


मार्गदर्शक तत्वे आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेले आहे व हे भारतीय संविधानाच्या भाग ४ मध्ये कलम 36 ते 51 मध्ये देण्यात आलेले आहे.


हे तत्व सामाजिक न्याय घटनेशी निगडित आहे व कार्यपालिकेत कार्य करण्यासाठी हे तत्व मार्गदर्शन देतात.


कलम 36 :-

यात राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे व ही तीच व्याख्या आहे जी कलम 12 मध्ये देण्यात आलेली आहे.
यामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती चा उल्लेख केला आहे. आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे, प्रास्ताविकेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेचे आदर्श साध्य करणे.

कलम 37:- मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. जर मार्गदर्शक तत्व मिळाले नाही तर तुम्ही कोर्टमधे जाऊ शकत नाही.

कलम 38: – कल्याणकारी राज्याची व्याख्या

ज्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय दिला जाईल व यात वाढ करण्याचे प्रयत्न केले जातील.

कलम 39 -1 :- राज्य (सरकार) सर्व व्यक्तींना जीवनउपयोगी किंवा जीवनाकरिता सर्व साधन उपलब्ध करून देईल.

कलम 39 -2: – राज्य समान कार्यासाठी समान वेतन देईल.

कलम 39 -3:- राज्य आर्थिक शोषणाच्या विरुद्ध अधिकार करून देईल.

कलम 39 -4:- यानुसार पालक अल्पवयीन व्यक्ती यांचे शोषणाचे संरक्षण करेल. व त्यांना स्वतंत्र आयुष्य जगण्याचे संधी उपलब्ध करून देईल. तसेच आरोग्य सुविधाकरिता कार्य योजना लागू करेल. (पोलिओ, अंगणवाडी)

कलम 39 -5:- समान न्याय व निःशुल्क न्यायव्यवस्था

कलम 39 -6:- यानुसार आर्थिक व्यवस्था राज्य निर्माण करेल म्हणजे खूप गरीब आणि खूप श्रीमंत होणार नाही म्हणजे समाजवादी न्यायव्यवस्था निर्माण करायची आहे.

कलम 40:- गांधीवादी तत्व (73वी घ. दु. 1992)

राज्य पंचायत राज निर्माण करण्याचे प्रयन्त करेल. पहिली ग्रामपंचायत 2 Oct 1959 रोजी नागौर जिल्हा राजस्थानमध्ये स्थापन करण्यात आली.

कलम 41:- शिक्षण रोजगार (कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ठ बाबींचा सार्वजनिक सहाय्याचा अधिकार )

राज्य हे आपले आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक साहाय्य हक्क उपलब्ध करून देणार.

बरेचश्या राज्यात या अंतर्गतच बेरोजगारी भत्ता, निराधार योजना, जीवनदायी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना इत्यादी लागू केले आहे.

कलम 42:- Maternity Leave

कामाची परिस्थिती आणि मातृत्व साहाय्य याबाबतीत न्याय्य आणि सहृदयी व्यवस्था.
राज्य महिलांच्या प्रसूतीच्या वेळी विविध आरोग्य सुविधा निर्माण करून देईल.

उदा:- जसे की आर्थिक साहाय्य्य, वैद्यकीय साहाय्य्य

कलम 43:- कामगारांना निर्वाह वेतन

राज्य सर्व कामगारांना योग्य रीतीने निर्वाह वेतन देण्याची परिस्थिती निर्माण करेल.

कलम 43A:- 42 वी घ. दु. 1976 अनुसार संविधानात टाकण्यात आली. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग

कलम 43B:- राज्य सहकारी सोसायटींकरिता प्रोत्साहन देण्यास प्रयन्तशील असेल. 97 वी घ. दु. 2011 अनुसार यांचा समावेश करण्यात आला.

कलम 44:- आचारसंहिता (Uniform Civil Code) लागू करण्याचा प्रयत्न राज्यांनी नेहमी करावा. नागरिकांना एकरूप नागरी संहिता. वैयक्तिक कायदे एकत्र करून सर्व नागरिकांना समान वागणूक प्रस्थापित करणे. संपूर्ण भारतीय राज्यक्षेत्रात सर्व नागरिकांना एकरूप नागरी संहिता प्राप्त करून देण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील. 

कलम 45:- 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद.
राज्य ६ वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद करेल.

पूर्वीच्या कलम ४५ ची तरतूद खालीलप्रमाणे होती.
राज्यसंस्था घटनेचा अंमल सुरु झाल्यापासून १० वर्षाच्या आत १४ वर्षाखालील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी प्रयन्तशील राहील. हे एकच असे कलम आहे ज्याला कालमर्यादा दिली होती.

कलम 46:- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन सरकार करेल.
राज्यसंस्था दुर्बल घटकांचे विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे विशेष काळजीपूर्वक हितसंवर्धन करेल.
राज्यसंस्था त्यांचे सामाजिक अन्याय व इतर सर्व प्रकारच्या शोषणापासून संरंक्षण करेल.

कलम 47:- पोषणमान व राहणीमान उंचावणे, दारूबंदी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्त्यव्य असेल.
नागरिकांचे पोषणमान, राहणीमान तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारणे. ह्या गोष्टी राज्यसंस्थेच्या प्राथमिक कर्तव्यांपैकी एक असल्याचे मानले जाईल.
विशेषतः मादक पेय तसेच आरोग्यास घातक असलेले अंमली पेये यांच्यावर बंदी आणण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.

अपवाद : औषधी तयार करण्यास वापरली जाणारी पेये.

कलम 48:- कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन (गौहत्या)

याअंतर्गतच गाई व वासरे व इतर जनावरे यांच्या जातीचे जतन व सुधारणा करने व त्यांच्या कत्तलला मनाई करणे याकरिता उपाययोजना करेल.

कलम 48 (A) :- राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यांचा विकास त्याचबरोबर वने, नैसर्गिक संसाधने जशे नद्या, तलाव, समुद्र व त्यामधील असणारे जीव यांचे संरक्षण करेल व त्यांच्या वाढीसाठी योग्य प्रणाल्या विकसित करेल.

टीप :- ही कलम 42 वी घ. दु. 1976 मध्ये संविधानात टाकण्यात आली.

कलम 49:- राष्ट्रीय महत्वाचे संस्थाने, वास्तू, स्मारक यांचे संरंक्षण राज्य करेल. संसदीय कायद्याअंतर्गत राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे म्हणून घोषित केले कलात्मक व ऐतिहासिक महत्वाची असणारे स्मारके, ठिकाणे व वस्तूंची लूट, विद्रुपीकरण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट आणि निर्यातीपासून संरक्षण करण्याची राज्यसंस्थेची जबाबदारी असेल .

कलम 50:- राज्य न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचे पृथ्थकरण करेल.
लोकसेवामध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवण्याकरिता राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.
मात्र सध्या राज्यसंस्थेअंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी, कलेक्टर, प्रांत तहसीलदार, यांचा समावेश होतो.

कलम 51:- राज्य आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण करण्याचा प्रयन्त करेल.

राज्यसंस्था खालील बाबींसाठी प्रोत्साहन देईल.
अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन
ब. राष्ट्रराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे
क. एकमेकांमध्ये व्यवहार करतांना आंतरराष्ट्रीय कायदा व तहांचा आदर करणे. 

प्रश्न मंजुषा

♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

1) ६

२) ४

३) ५

४) ९

उत्तर :१


♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान

उत्तर : २



♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?

१) सांगली २) सातारा

३) रायगड ४) रत्नागिरी

उत्तर : ३


महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?

१) पुणे

२) अहमदनगर

3) औरंगावाद

४) लातूर

उतर : ३


पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.

1) नाशिक

2) पुणे

3) कोल्हापूर

4) सोतापूर

उतर:3



देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.

1) गगनबावडा

2) कुंडी

3) कोळंबा

4) वरंध

उतर: 2


महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.

1) विदर्भ

2) कोकण

3) मराठवाडा✅✅

4) नाशिक


महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

1) भीमा

2) गोदावरी

3) क्रष्णा

4) वर्धा

उतर: २



भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)

1) 04

2) 03

3) 02✅✅

4) 05


भाषा म्हणजे काय?

1) बोलणे

2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅

3) लिहिणे

4) संभाषणाची कला


पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)

1) य्

2) र्

3) अ✅✅

4) व्


विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)

1) हातवारे

2) लिपी

3) भाषा✅✅

4) संवाद


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२



गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने

या साप्ताहिकातून लिखाण केले ?

१) दर्पण

२) सुधाकर

३) दिनमित्र

४) प्रभाकर✅✅


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

1) नामदेव ढसाळ

2) लक्ष्मण माने ✅✅

3) केशव मेश्राम

4 ) नरेंद्र जाध


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

1) शिवाजीराव भोसले

2) रणजित देसाई

3) विश्वास पाटिल

4)शिवाजी सावंत✅✅


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे

प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.

1. अमेरिका

2. फ्रान्स

3. ब्राझील✅✅

4. ऑस्ट्रेलिया


♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?

1) इच

2) इंग्रज✅✅

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच


♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?

1) अमेरिका

2) इंग्लंड✅✅

3) फ्रांन्स

4) रशिया


♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

1) सुषमा स्वराज✅✅

2) सुचेता कृपलानी

3) शिला दिक्षीत

4) मिरा कुमार


♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .

1) बेळगाव

2) फैजपूर✅✅

3) वर्धा

4) नागपूर


♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?


1) आसाम✅✅

2) अरूणालच प्रदेश

3) मध्यप्रदेश

4) उत्तराखंड


♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?

1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅

2) सिलिका व मॅग्नेशियम

3) सिलीका व फेरस

4) फेरस व निकेल


♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.

1) पाच

2) सात

3) सहा

4) आठ✅✅


♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?

1) विभागीय आयुक्त

2) महालेखापाल

3) वित्त लेखा अधिकारी

4) जिल्हाधिकारी✅✅


♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

1) 11

2) 14✅✅

3) 9

4) 8


सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?

1) केशवचंद्र सेन

2) स्वामी दयानंद

3) अॅनी बेझंट✅✅

4)स्वामी विवेकानंद


मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?

1) अलिगड

2)ढाका✅✅

3) इस्लामाबाद

4)अलाहाबाद


सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता

करण्यात आली होती?

1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅

2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन

करण्यासाठी.

3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या

सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.

4) वरीलपैकी कशासाठीही नाही.


महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

1) पुणे

2)गोरखपुर

3) खेडा✅✅

4)सोलापुर


चालू घडामोडी :- 08 जानेवारी 2024

◆ श्रीकांत शिंदे, अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार तर सुप्रिया सुळे(16 व्या लोकसभेसाठी) यांना 'संसद महारत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ सोळाव्या लोकसभेसाठी सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस), श्रीरंग बारणे (शिवसेना), भर्तृहरि महताब (बिजू जनता दल) यांना 'संसद महारत्न' पुरस्कार देण्यात येणार असल्याचे पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रियदर्शनी राहुल यांनी सांगितले.

◆ सतराव्या लोकसभेसाठी 'संसद महारत्न' पुरस्कार एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी), अधीररंजन चौधरी (काँग्रेस), विद्युत महातो आणि हीना गावित (भाजप) यांना जाहीर झाले आहेत.

◆ भारताचे आदित्य एल 1 यान पोहचलेल्या लांग्रेज पॉइंट चे पृथ्वी पासून अंतर 15 लाख किलोमीटर आहे.

◆ भारतीय ऑलम्पिक संघटनेच्या सीईओ पदी रघुराम अय्यर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रॉयल कॅरिबियन ने तयार केलेली "आयकॉन ऑफ दी सिज" जगातील सर्वात मोठी क्रुझ ठरली आहे.

◆ देशातील पहिले बीच गेम्स 2024 चे आयोजन "घोघला बीच, दीव व दमण' बीचवर करण्यात आले आहे.

◆ प्राईम फाउंडेशन चेन्नई कडून देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार यंदा देशातील 5 खासदाराना जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील "डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे" खासदारांना यावर्षीचा संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ भारतात अहमदाबाद येथे अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी या राजकीय पक्षाने बहिष्कार घातला आहे.

◆ केंद्र सरकारच्या फार्मर आयडी या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याची निवड झाली आहे.

◆ ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये 3000 धावा पूर्ण करणारी स्मृती मानधना ही दुसरी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे.

◆ भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नविन प्रवक्ता पदी रणधीर जैस्वाल यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ इंद्रमणी पांडे(3 वर्षासाठी) या भारतीय अधिकाऱ्याने नुकताच बिमस्टेक च्या सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारला आहे.

◆ 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून झाले आहे.

◆ 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार हे आहेत.

◆ सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश या राज्यात ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

◆ आयर्लंड च्या सिलियन मर्फी ला Oppenheimer चित्रपटात केलेल्या मुख्य भूमिकेसाठी मिळाला गोल्डन ग्लोब सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

08 January 2024

चालू घडामोडी :- 07 जानेवारी 2024

◆ रॉकफेलर फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी यूएस एड प्रमुख डॉ. राजीव शाह यांचा फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला.

◆ पी. संतोष यांची ‘नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी’ (NARCL) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ 'प्रोफेसर एड्रियन मायकल क्रूझ' यांना त्यांच्या अंतराळ सेवेतील योगदानाबद्दल 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ Adidas कंपनी कर्नाटक राज्यात आपले 'ग्लोबल कॉम्पिटन्स सेंटर' (GCC) स्थापन करणार आहे.

◆ पश्चिम बंगाल राज्य सरकारने ‘पोइला बैशाख’ हा राज्य दिन म्हणून घोषित केला आहे.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी ‘तुर डाळ खरेदी पोर्टल’ सुरू केले आहे.

◆ गोवा राज्यात 10व्या शतकातील कन्नड आणि संस्कृत भाषेत लिहिलेला 'कदंब शिलालेख' सापडला आहे.

◆ वरिष्ठ IAS अधिकारी 'श्री विकास शील' यांनी 'Asia Development Bank' (ADB) चे कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ भारताचा महान फलंदाज 'विराट कोहली' याला 'प्युबर्टी ॲथलीट ऑफ द इयर 2023' साठी नामांकन मिळाले आहे.

◆ वरिष्ठ IFS अधिकारी 'इंद्रमणी पांडे' यांनी BIMSTEC चे महासचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ ‘नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेड’ (NIIFL) द्वारे ‘संजीव अग्रवाल’ यांची नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ‘शशी सिंग’ यांची ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशन (AIRIA) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━