२९ सप्टेंबर २०२६

गरिबी मोजमापाशी संबंधित समित्यांची आकडेवारी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. खाली फक्त प्रश्न + उत्तर स्वरूपात देत आहे.

1. प्रश्न: भारतात गरिबी मोजमापासाठी प्रथम अधिकृत कार्यगट कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

उत्तर: 1962

2. प्रश्न: 1962 च्या कार्यगटाने ग्रामीण भागासाठी दरडोई दरमहा किती गरिबी रेषा सुचवली?
उत्तर: ₹20

3. प्रश्न: 1962 च्या कार्यगटाने शहरी भागासाठी दरडोई दरमहा किती गरिबी रेषा सुचवली?
उत्तर: ₹25

4. प्रश्न: दांडेकर आणि रथ समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली?
उत्तर: 1971

5. प्रश्न: दांडेकर-रथ समितीने दरडोई दररोज किती कॅलरी गरज आधार मानली?
उत्तर: 2,250 कॅलरी

6. प्रश्न: वाय. के. अलग समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली?
उत्तर: 1979

7. प्रश्न: अलग समितीने ग्रामीण भागासाठी किती कॅलरी प्रतिदिन निकष वापरला?
उत्तर: 2,400 कॅलरी

8. प्रश्न: अलग समितीने शहरी भागासाठी किती कॅलरी प्रतिदिन निकष वापरला?
उत्तर: 2,100 कॅलरी

9. प्रश्न: अलग समितीच्या 1973-74 किंमत पातळीवर ग्रामीण गरिबी रेषा किती होती?
उत्तर: ₹49.09 दरडोई दरमहा

10. प्रश्न: अलग समितीच्या 1973-74 किंमत पातळीवर शहरी गरिबी रेषा किती होती?
उत्तर: ₹56.64 दरडोई दरमहा

11. प्रश्न: लकडावाला समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली?
उत्तर: 1989

12. प्रश्न: लकडावाला समितीने आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला?
उत्तर: 1993

13. प्रश्न: लकडावाला समितीच्या पद्धतीनुसार 2004-05 मध्ये भारतातील गरिबीचे प्रमाण किती होते?
उत्तर: 27.5% — ग्रामीण 28.3% आणि शहरी 25.7%.

14. प्रश्न: तेंडुलकर समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली?
उत्तर: 2005

15. प्रश्न: तेंडुलकर समितीने अहवाल कोणत्या वर्षी सादर केला?
उत्तर: 2009

16. प्रश्न: तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार 2004-05 मध्ये भारतातील गरिबीचे प्रमाण किती होते?
उत्तर: 37.2% — ग्रामीण 41.8% आणि शहरी 25.7%.

17. प्रश्न: तेंडुलकर समितीनुसार 2004-05 मध्ये ग्रामीण गरिबी रेषा किती होती?
उत्तर: ₹446.68 दरडोई दरमहा

18. प्रश्न: तेंडुलकर समितीनुसार 2004-05 मध्ये शहरी गरिबी रेषा किती होती?
उत्तर: ₹578.80 दरडोई दरमहा

19. प्रश्न: रंगराजन समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली आणि अहवाल कोणत्या वर्षी सादर केला?
उत्तर: स्थापना — 2012; अहवाल — 2014.

20. प्रश्न: रंगराजन समितीनुसार 2011-12 मध्ये ग्रामीण व शहरी गरिबी रेषा किती होती?
उत्तर: ग्रामीण — ₹972 आणि शहरी — ₹1,407 दरडोई दरमहा.

✅परीक्षेसाठी क्रम लक्षात ठेवा:
कार्यगट 1962→ दांडेकर-रथ 1971 → अलग 1979 → लकडावाला 1993 → तेंडुलकर 2009 → रंगराजन 2014. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा