२९ सप्टेंबर २०२६

भारतातील कामगार चळवळ

१. कामगार चळवळीचे जनक - ▫️नारायण मेघाजी लोखंडे:

▪️ भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात.
▪️ १८९०: 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' (Bombay Mill Hands Association) ची स्थापना केली. (ही भारतातील पहिली कामगार संघटना).
▪️ रविवारची सुट्टी: २४ एप्रिल १८९० पासून कामगारांना रविवारची सुट्टी अधिकृतपणे मिळाली.
▪️ 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. (रावबहादूर ही पदवी त्यांना मिळाली होती).

📌 २. इतर महत्त्वाचे नेते व संघटना:

▪️ शशिपाद बॅनर्जी: १८७० मध्ये बंगालमध्ये 'वर्किंग मेन्स क्लब' (Working Men's Club) स्थापन केला आणि 'भारत श्रमजीवी' हे मासिक सुरू केले.
▪️ बी. पी. वाडिया: १९१८ मध्ये 'मद्रास लेबर युनियन' ची स्थापना. (ही भारतातील *पहिली आधुनिक आणि संघटित* कामगार संघटना/Trade Union).
▪️ महात्मा गांधी: १९१८ मध्ये 'अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन' (मजूर महाजन संघ) ची स्थापना केली.

📌 ३. 'आयटक' (AITUC - All India Trade Union Congress):
▪️ स्थापना: ३१ ऑक्टोबर १९२० (मुंबई).
▪️ संस्थापक: नारायण मल्हार जोशी, लाला लाजपत राय, जोसेफ बाप्टिस्टा.
▪️ पहिले अध्यक्ष: लाला लाजपत राय.
▪️ उपाध्यक्ष: जोसेफ बाप्टिस्टा.
▪️ पहिले सचिव: दिवाण मल्लाल.
*(१९२९ मध्ये नागपूर अधिवेशनात आयटकमध्ये पहिली फूट पडली, त्यावेळी अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते).*

📌 ४. महत्त्वाचे कायदे व आयोग (Laws & Commissions):
▪️ १८८१ चा पहिला फॅक्टरी कायदा: 'लॉर्ड रिपन'च्या काळात (बालकामगारांसाठी नियम).
▪️ १८९१ चा दुसरा फॅक्टरी कायदा: 'लॉर्ड लॅन्सडाऊन'च्या काळात (महिलांच्या कामाचे तास निश्चित).
▪️ १९२६ ट्रेड युनियन कायदा: कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देण्यात आली (१९२७ मध्ये लागू झाला).
▪️ विटले आयोग (१९२९): भारतातील कामगारांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी 'रॉयल कमिशन ऑन लेबर' (विटले आयोग) नेमण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा